settings icon
share icon
प्रश्नः

दुरात्मे पतीत देवदूत आहेत का?

उत्तरः


देवाने देवदूतांना केव्हा निर्मिले हा वादविवादासाठी खुला विषय आहे, परंतु जे निश्चितपणे ज्ञात आहे ते हे की त्याने सर्व काही चांगले निर्माण केले कारण देव, त्याच्या पवित्रतेने, पापमय असे काहीही उत्पन्न करू शकत नाही. म्हणून जेव्हा सैतान, जो एकेकाळी ल्यूसिफर देवदूत होता, त्याने देवाविरुद्ध बंड केले आणि तो स्वर्गातून पडला (यशया 14 यहेज्केल 28), देवदूतांचा एक तृतीयांश भाग त्याच्या विद्रोहात सामील झाला (प्रकटीकरण 12: 3-4,9). यात शंका नाही की या पतीत देवदूतांना आता दुरात्मे म्हणून ओळखले जाते.

मत्तय 25:41 नुसार सैतान आणि त्याच्या देवदूतांसाठी नरक तयार करण्यात आले आहे हे आपल्याला ठाऊक आहे: “मग डावीकडच्यांनाही तो म्हणेल, ‘अहो शापग्रस्तहो, माझ्यापुढून निघा आणि सैतान व त्याचे दूत ह्यांच्यासाठी जो सार्वकालिक अग्नी सिद्ध केला आहे त्यात जा.“ “त्याच्या” या स्वामित्ववाचक शब्दाचा उपयोग करून, येशू हे स्पष्ट करतो की हे दूत सैतानाचे आहेत. प्रकटीकरण 12:9 मध्ये मीखाएल व “त्याचे दूत” आणि सैतान व “त्याचे दूत” यांच्यात शेवटच्या काळी युद्ध होईल असे वर्णन केले आहे. या आणि तत्सम वचनांवरून हे स्पष्ट आहे की दुरात्मे आणि पतीत देवदूत समान आहेत.

दुरात्मे हे पतीत देवदूत आहेत या कल्पनेचा काही जण नाकार करतात कारण यहूदा वचन 6 हे घोषित करते की ज्या देवदूतांनी बंड केले त्यांना “निरंतरच्या बंधनात” ठेवण्यात आले आहे. तथापि, हे स्पष्ट आहे की ज्यांनी पाप केले ते सर्व देवदूत “बंधनात” नाहीत कारण सैतान अजूनही मुक्त आहे (1 पेत्र 5:8). बाकीच्या पतीत दूतांना देव कैदेत घालतो, परंतु बंड करणार्या नेत्याला मोकळे राहू देईल असे का? असे दिसते की यहूदाच्या 6 व्या वचनात देवाने त्या पतीत दूतांना बंधनात ठेवले ज्यांनी अतिरिक्त बंड केले, जसे उत्पत्तीच्या 6 व्या अध्यायातील “देवाच्या पुत्रांची“ घटना.

दुरात्म्यांच्या उत्पत्तीचे सर्वात सामान्य पर्यायी स्पष्टीकरण असे आहे की जेव्हा उत्पत्ती 6 मधील नेफिलिम जलप्रलयात नष्ट झाले तेव्हा त्यांचे देहरहित शरीर आत्मे दुरात्मे बनले. जेव्हा ते मारले गेले तेव्हा नेफिलीमच्या आत्म्यास काय घडले हे ते स्पष्टपणे सांगत नाही, परंतु हे अशक्य आहे की परमेश्वराने नेफिलीमचा जलप्रलायात यासाठी नाश केला त्यांच्या प्राणांनी दुरात्मे म्हणून आणखी वाईट करावे. दुरात्म्यांच्या उत्पत्तीचे सर्वात बायबल आधारित सुसंगत स्पष्टीकरण असे आहे की ते पतीत दूत आहेत आणि ते दूत आहेत ज्यांनी सैतानाबरोबर देवाविरुद्ध बंड केले.

English



मराठीच्या पहिल्या पानावर वापस या

दुरात्मे पतीत देवदूत आहेत का?
© Copyright Got Questions Ministries