settings icon
share icon
प्रश्नः

ख्रिस्ती व्यक्तीने व्यायाम करावा काय? बायबल आपल्या आरोग्याविषयी काय म्हणते?

उत्तरः


जीवनातील अनेक गोष्टींप्रमाणेच, व्यायामाच्या क्षेत्रातही अतिरेक आहेत. काही लोक पूर्णपणे आध्यात्मिकतेवर लक्ष देतात, पण आपल्या भौतिक शरीरांकडे दुर्लक्ष करतात. इतर लोक आपल्या शरीराचे रूप व आकार याकडे इतके लक्ष देतात की ते आध्यात्मिक वाढीकडे आणि परिपक्वतेकडे दुर्लक्ष करतात. यापैकी कोणतीही गोष्ट बायबलचा समतोल दाखवीत नाही. तीमथ्याचे 1ले पत्र 4:8 आम्हाला सांगते, "कारण शारीरिक कसरत थोडक्या बाबतीत उपयोगी आहे; सुभक्ती तर सर्व बाबतीत उपयोगी आहे; तिला आतांच्या व पुढच्याही जीवनाचे अभिवचन मिळाले आहे." लक्ष द्या की हे वचन व्यायामाच्या गरजेचा नाकार करीत नाही. तर, ते म्हणते की व्यायाम हा मोलाचा आहे, पण नीतिमत्व हे त्याहीपेक्षा अधिक मौल्यवान आहे असे म्हणण्याद्वारे ते व्यायामास योग्य प्राधान्य देते.

प्रेषित पौल करिंथकरांस 1ले पत्र 9:24-27 या वचनांत आध्यात्मिक सत्य समजाविण्यासाठी शारीरिक प्रशिक्षणाचा उल्लेख करतो. तो ख्रिस्ती जीवनाची तुलना "बक्षीस मिळविण्यासाठी" आम्ही धावत असलेल्या शर्यतीशी करतो. पण ज्या बक्षिसाच्या आपण शोधात आहोत तो एक सार्वकालिक मुगुट आहे जो नाश होणार नाही अथवा कोमेजणार नाही. तीमथ्याला 2रे पत्र 2:5 मध्ये, पौल म्हणतो, "जर कोणी मल्लयुद्ध करितो, तर ते नियमांप्रमाणं केल्यावाचून त्याला मुकुट घालीत नाहीत." पौल पुन्हा तीमथ्याला 2रे पत्र 4:7 मध्ये खेळाडूचे उदाहरण देतो: "जे सुयुद्ध ते मीं केले आहे, धाव संपविली आहे, विश्वास राखिला आहे." पवित्र शास्त्राचा जोर शारीरिक व्यायामावर नाही, पण पौल खेळाडूस शोभेल अशा शब्दाचा उपयोग आम्हास आध्यात्मिक सत्ये शिकविण्यासाठी करतो ज्यावरून असे दिसून येते की पौल शारीरिक व्यायामाकडे, आणि स्पर्धेकडेसुद्धा, सकारात्मक प्रकाशात पाहतो. आपण शारीरिक आणि आध्यात्मिक प्राणी आहोत. आमच्या अस्तित्वाचा आध्यात्मिक पैलू, बायबलच्या दृष्टीने पाहता, अधिक महत्वाचा असला तरीही, आम्ही आमच्या आरोग्याच्या आध्यात्मिक अथवा शारीरिक पैलूकडे दुर्लक्ष करता कामा नये.

म्हणून, स्पष्टपणे, ख्रिस्ती व्यक्तीच्या व्यायाम करण्यात चुकीचे काहीच नाही. खरे म्हणजे, बायबल स्पष्टपणे सांगते की आपण आपल्या शरीरांची योग्य काळजी घेतली पाहिजे (करिंथकरांस 1 ले पत्र 6:19-20). त्याचवेळी, बायबल व्यर्थ गोष्टींविरुद्ध ताकीद देते (1 शमुवेल 16:7; नीतिसूत्रे 31:30; पेत्राचे 1ले पत्र 3:3-4). व्यायाम करण्यात आमचे ध्येय इतर लोकांनी आमच्याकडे पाहावे आणि आमची वाखाणणी करावी म्हणून आमच्या शरीरांची गुणवत्ता सुधारणे नसले पाहिजे. तर, व्यायामाचे ध्येय आमचे भौतिक आरोग्य सुधारणे असावे यासाठी की आध्यात्मिक ध्येयाप्रत समर्पित राहावे म्हणून आमच्याजवळ अधिक शारीरिक बळ असले पाहिजे.

English



मराठीच्या पहिल्या पानावर वापस या

ख्रिस्ती व्यक्तीने व्यायाम करावा काय? बायबल आपल्या आरोग्याविषयी काय म्हणते?
© Copyright Got Questions Ministries