मी माझ्या मित्रांस व कुटुंबास न दुखाविता व त्यांस दूर न सारता सुवार्ता कशी सांगू शकतो?


प्रश्नः मी माझ्या मित्रांस व कुटुंबास न दुखाविता व त्यांस दूर न सारता सुवार्ता कशी सांगू शकतो?

उत्तरः
कधी न कधी, प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीजवळ असा कौटुंबिक सदस्य, मित्र, सहकारी, अथवा ओळखीचा व्यक्ती असतो जो ख्रिस्ती नसतो. इतरांस सुवार्ता सांगणे कठीण असू शकते, आणि जेव्हा व्यक्ती अशा व्यक्तीसोबत सहभागी असतो ज्याच्याशी आमचे जवळचे भावनात्मक नाते जुळलेले असते तेव्हा हे आणखीच कठीण होऊ शकते.बायबल आम्हास सांगते की काही लोग सुवार्तेस अडखळतील (लूक 12:51-53). परंतु, आम्हास सुवार्ता सांगण्याची आज्ञा देण्यात आली आहे, आणि असे न करण्यासाठी कुठलीच सबब नाही (मत्तय 28:19-20; प्रेषितांची कृत्ये 1:8; पेत्राचे 1ले पत्र 3:15).

म्हणून, आपण आपल्या कौटुंबिक सदस्यांस, मित्रांस, सहकार्‍यास, आणि परिचितांस कशी सुवार्ता सांगू शकतो? सर्वात महत्वाची गोष्ट जी आपण करू शकतो ती म्हणजे त्यांच्यासाठी प्रार्थना करणे होय. प्रार्थना करा की देव त्यांचे अंतःकरण बदलील आणि सुवार्तेच्या सत्यासाठी त्यांचे डोळे उघडील (करिंथकरांस 2रे पत्र 4:4). प्रार्थना करा की देव त्यांस त्यांच्याप्रीत्यर्थ त्याच्या प्रीतीविषयी आणि येशू ख्रिस्ताद्वारे तारणाच्या त्यांच्या गरजेविषयी त्यांस जाणीव करून देईल (योहान 3:16). त्यांची उत्तमप्रकारे कशी सेवा करावी यासाठी बुद्धी प्राप्त व्हावी म्हणून प्रार्थना करा (याकोबाचे पत्र 1:5).

सुवार्ता सांगण्यास आम्ही इच्छुक आणि धैर्यवान असले पाहिजे. आपल्या मित्रांस आणि कुटुंंबास येशू खिस्ताद्वारे लाभणार्या तारणाच्या संदेशाची घोषणा करा (रोमकरांस पत्र 10:9-10). नेहमी आपल्या विश्वासासंबंधाने बोलावयास तत्पर असा (पेत्राचे 1ले पत्र 3:15), असे सौम्यपणे व आदरभावाने करा. व्यक्तिगतरित्या सुवार्ता सांगण्याचे स्थान दूसरी कोणतीही गोष्ट घेऊ शकत नाही : "ह्याप्रमाणें विश्वास वार्तेनें व वार्ता ख्रिस्ताच्या वचनाच्या द्वारें होते" (रोमकरांस पत्र 10:17).

प्रार्थना करणे आणि आपल्या विश्वासाविषयी सांगणे याशिवाय, आम्ही आपल्या मित्रांसमोर आणि कुटुंबातील सदस्यांसमोर नीतिमान जीवन देखील जगले पाहिजे यासाठी की आमच्यात देवाने घडविलेला बदल त्यांस दिसून यावा (पेत्राचे 1ले पत्र 3:1-2). शेवटी, आम्ही आपल्या प्रियजनांचे तारण देवाच्या हाती सोडावे. लोकांस तारण देणारे देवाचे सामर्थ्य आणि कृपा आहे, आमचे प्रयत्न नव्हेत. आम्ही त्यांच्यासाठी फक्त प्रार्थना करू शकतो, त्यांस साक्ष देऊ शकतो, आणि त्यांच्यासमोर नीतिमान जीवन जगू शकतो. वाढ देणारा देव आहे (करिंथकरांस 1ले पत्र 3:6),

English
मराठीच्या पहिल्या पानावर वापस या
मी माझ्या मित्रांस व कुटुंबास न दुखाविता व त्यांस दूर न सारता सुवार्ता कशी सांगू शकतो?