settings icon
share icon
प्रश्नः

अनेक ख्रिस्ती पुढारी घोटाळ्यांत का गुंतलेले असतात?

उत्तरः


सर्वप्रथम, हे सांगणे महत्वाचे आहे की “अनेक” योग्य वर्णन नाही. असे वाटते की अनेक इव्हॅजेलिकल ख्रिस्ती पुढारी घोटाळ्यांमध्ये अडकले आहेत, परंतु अशा घोटाळ्यांकडे मोठ्या प्रमाणात लक्ष वेधल्यामुळे हे घडते. असे हजारो इव्हॅजेलिकल ख्रिस्ती पुढारी, पाळक, प्राध्यापक, मिशनरी, लेखक आणि सुवार्तिक असे लोक आहेत जे कधीच कोणत्याच “घोटाळ्यात“ पडले नाहीत. बहुसंख्य इव्हॅन्जेलिकल खिस्ती पुढारी असे पुरुष आणि स्त्रिया आहेत ज्यांना देवावर प्रेम आहे, ते आपल्या साथीदाराबरोबर आणि कुटूंबियांशी विश्वासू आहेत आणि त्यांचे कार्य अत्यंत प्रामाणिकपणाने आणि सचोटीने हाताळतात. काहींच्या अपयशाचा उपयोग सर्वांच्या चरित्रांवर हल्ला करण्यासाठी केला जाऊ नये.

इतके म्हटल्यानंतर, अजूनही इव्हॅन्जेलिकल ख्रिस्ती असल्याचा दावा करणार्‍यामध्ये घोटाळे कधीकधी घडतात ही समस्या आहे. प्रख्यात ख्रिस्ती पुढार्‍यानी व्यभिचार केल्याबद्दल किंवा वेश्याव्यवसायात भाग घेतल्यामुळे त्यांचा पर्दाफाश झाला आहे. काही इव्हॅन्जेलिकल ख्रिस्ती लोकांना कर घोटाळा आणि इतर आर्थिक हेराफेरीबद्दल दोषी ठरविण्यात आले आहे. हे का होते? कमीतकमी तीन प्राथमिक स्पष्टीकरणे आहेत: 1) इव्हॅन्जेलिकल खिस्ती असल्याचा दावा करणारे काही अविश्वासू पाखंडी आहेत, 2) काही इव्हॅन्जेलिकल खिस्ती पुढारी आपल्या पदाचा अहंकार बाळगतात, आणि)) सैतान आणि त्याचे दुरात्मे जास्त आक्रमकपणे ख्रिस्ती नेतृत्वाचा पदावर असणार्‍यावर आक्रमण करतात आणि त्यांस परीक्षेत पाडण्याचा प्रयत्न करतात कारण त्यांना माहित आहे की पुढाÚयाच्या घोटाळ्याचे खिस्ती आणि बिगर खिस्ती दोघांवरही विनाशकारी परिणाम होऊ शकतात.

1) घोटाळ्यांमध्ये अडकलेले काही “इव्हॅन्जेलिकल ख्रिस्ती“ अविश्वासू पाखंडी आणि खोटे संदेष्टे आहेत. येशू म्हणाला, “खोट्या संदेष्ट्यांविषयी जपून राहा. ते मेंढरांच्या वेषाने तुमच्याकडे येतात, पण ते अंतरी क्रूर लांडगे आहेत. ह्यास्तव तुम्ही त्यांच्या फळांवरून त्यांना ओळखाल” (मत्तय 7:15-20). खोट्या संदेष्टे भक्तिमान पुरुष आणि स्त्रिया असल्याचे भासवतात आणि असे दाखवतात की ते सुदृढ ख्रिस्ती पुढारी आहेत. तथापि, त्यांचे “फळ” (घोटाळे) अखेरीस ते जे सांगतात त्यापेक्षा विपरीत असल्याचे प्रकट करते. यामध्ये, ते सैतानाच्या उदाहरणाचे अनुसरण करतात, “ह्यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. कारण सैतानही स्वतः तेजस्वी देवदूताचे सोंग घेतो. म्हणून त्याच्या सेवकांनीही नीतिमत्त्वाच्या सेवकांचे सोंग घेतले तर ती मोठीशी गोष्ट नाही; त्यांचा शेवट त्यांच्या कर्मांप्रमाणे होईल.”(२ करिंथ 11:14-15)

2) बायबल स्पष्ट करते की “गर्व झाला की नाश ठेवलेला; मनाचा ताठा अधरूपाताचे मूळ होय” (नीतिसूत्रे 16:18). याकोब 4:6 आम्हाला आठवण करून देतो की “देव गर्विष्ठांना विरोध करतो, आणि लीनांवर कृपा करतो”. बायबल वारंवार अभिमानाविरुद्ध इशारा देते. बरेच ख्रिस्ती नेते देवावर नम्रतेने आणि विश्वासाच्या भावनेने सेवा सुरू करतात, परंतु हे सेवाकार्य जसजसे वाढते आणि वाढत जाते तसतसे त्यांना स्वतःसाठी या वैभवातून काही घेण्याचा मोह येतो. काही इव्हॅन्जेलिकल ख्रिस्ती नेते, देवाची तोंडाने स्तुती करतात, स्वतःच्या सामथ्र्याने आणि बुद्धिमत्तेने सेवेचे व्यवस्थापन व बांधणी करण्याचा प्रयत्न करतात. या प्रकारच्या अभिमानामुळे अधोपतन घडून येते. संदेष्टा होशेय याच्यामार्फत देव ताकीद देतो, “जसा त्यांना चारा मिळाला तसे ते चरून तृप्त झालेय ते तृप्त झाले तेव्हा त्यांचे हृदय उन्मत्त झाले आणि ते मला विसरले” (होशेय 13:6).

3) सैतानाला हे ठाऊक आहे की इव्हॅजेलिकल ख्रिस्ती पुढार्‍याविषयी घोटाळा उत्पन्न करून तो मोठा प्रभाव पाडू शकतो. राजा दाविदाने बथशेबाशी व्यभिचार केल्यामुळे आणि उरीयाचा खून करविल्यामुळे दाविदाच्या कुटुंबाचे आणि संपूर्ण इस्राएलचे मोठे नुकसान झाले, त्याचप्रमाणे त्यांच्या नेत्याच्या नैतिक पतनामुळे बर्‍याच मंडळ्यांचे किवा सेवासंस्थाचे नुकसान झाले आहे. नेता पडल्यामुळे अनेक खिस्ती लोकांचा विश्वास कमकुवत झाला आहे. गैर ख्रिस्ती लोका “खिस्ती“ पुढार्यांच्या चुकांचा उपयोग ख्रिस्ती धर्म नाकारण्याचे कारण म्हणून करतात. सैतान आणि त्याच्या दुरात्म्यांना हे माहित आहे आणि म्हणूनच पुढार्यांच्या भूमिकांवर असलेल्यांविरुद्ध तो अधिक हल्ले करतो. बायबल आपल्या सर्वांना इशारा देते, “सावध असा, जागे राहा; तुमचा शत्रू सैतान हा गर्जणाÚया सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधत फिरतो” (1 पेत्र 5:8).

एखाद्या इव्हॅन्जेलिकल ख्रिस्ती नेत्यावर आरोप आहे किंवा तो एखाद्या घोटाळ्यात पकडला जातो तेव्हा आपण काय करावे? 1) निराधार आणि अकारण आरोप ऐकू किंवा स्वीकारू नका (नीतिसूत्रे 18:8; 1 तीमथ्य 5:19). 2) पाप करणार्‍यास फटकारण्यासाठी बायबलनुसार योग्य ती उपाय हाती घ्यावे (मत्तय 18:15-17; 1 तीमथ्य. 5:20). जर पाप सिद्ध झाले आणि गंभीर असले, तर त्या व्यक्तीस सेवेच्या पुढारीपणातून कायमचे काढून टाकावे (1 तीमथ्य. 3:1-13). 3) पाप करणार्‍यास क्षमा करावी (इफिस. 4:32; कलस्सै. 3:13), आणि जेव्हा पश्चाताप सिद्ध होतो, तेव्हा त्यांस पुन्हा सहभागित्वात परत घ्यावे (गलती. 6:1; 1 पेत्र 4:8) पण पुढाÚयास नव्हे. 4) आपल्या पुढार्‍यासाठी प्रार्थना करण्याबाबत विश्वासू असा. ते ज्या समस्यांना तोंड देतात, ज्या परीक्षा सहन करतात, ज्या तनावातून जातात, ते जाणून त्यांच्यासाठी प्रार्थना केली पाहिजे, परमेश्वरास विनंती केली पाहिजे की त्याने त्यांस दृढ करावे, त्यांचे रक्षण करावे, आणि त्यांस प्रोत्साहन द्यावे. 5) सर्वात महत्वाचे हे की, इव्हेन्जिलिकल ख्रिस्ती पुढाÚयाचे पतन या गोष्टीचे स्मरण करून देणारे असावे की आपण आपला पूर्ण विश्वास केवळ परमेश्वरात आणि परमेश्वरात ठेवावा. परमेश्वर कधी चुकत नाही, कधी पाप करीत नाही, आणि कधी खोटे बोलत नाही. “पवित्र! पवित्र! पवित्र सेनाधीश परमेश्वर! अखिल पृथ्वीची समृद्धी त्याचे वैभव आहे” (यशायाह 6:3).

Englishमराठीच्या पहिल्या पानावर वापस या

अनेक ख्रिस्ती पुढारी घोटाळ्यांत का गुंतलेले असतात?
© Copyright Got Questions Ministries