settings icon
share icon
प्रश्नः

पापासाठी सार्वकालिक नरक ही शिक्षा कितपत रास्त आहे?

उत्तरः


सार्वकालिक नरकाच्या संकल्पने बरोबर, कमीतकमी हे बोलण्यासाठी, अनेक लोक अस्वस्थ आहेत. ही अस्वस्थता, बऱ्याचदा या तीन गोष्टींना अपूर्णपणे समजण्याचा परिणाम आहे: देवाचे स्वरूप, मनुष्याचे स्वरूप, आणि पापाचे स्वरूप. पडलेला, पापमय मनुष्य प्राणी म्हणून, देवाच्या स्वरूपाच्या संकल्पनेचा आपल्यासाठी अर्थ लावणे कठीण आहे. आपली देवाकडे बघण्याची वृत्ती तो दयाळू, कृपाळू, म्हणून आहे, ज्याचे आपल्यासाठीचे प्रेम हे त्याच्या इतर सर्व विशेषणांना अधिलिखित करते आणि त्यावर छाया पाडते. नक्कीच, देव प्रेमळ, दयाळू, आणि कृपाळू आहे, परंतु पहिल्यांदा आणि महत्वाचे म्हणजे तो पवित्र आणि नीतिमान देव आहे. तो इतका पवित्र आहे की तो पाप सहन करू शकत नाही. तो देव आहे ज्याचा क्रोध पापी आणि अवज्ञा करणाऱ्यांच्या विरोधमध्ये पेटतो (यशया 5:25; होशेय 8:5; जखऱ्या 10:3). तो फक्त प्रेमळ देव नाही—तो स्वतः प्रेम आहे! परंतु पवित्र शास्त्र आपल्याला हे सुद्धा सांगते की तो प्रत्येक प्रकारच्या पापाचा तिरस्कार करतो (नितीसुत्रे 6:16-19). आणि जरी तो कृपाळू असला तरी त्याच्या कृपा करण्याला काही मर्यादा आहेत. “परमेश्वरप्राप्तीचा काळ आहे तोवर त्याला शोधा; तो जवळ आहे तोच त्याचा धावा करा, दुर्जन आपला मार्ग सोडो, अधर्मी आपल्या कल्पनांचा त्याग करो आणि परमेश्वराकडे वळो म्हणजे तो त्याजवर दया करील; तो आमच्या देवाकडे वळो, कारण तो त्याला भरपूर क्षमा करील” (यशया 55:6-7).

पापामुळे मानवता भ्रष्ट झाली आहे, आणि हे पाप नेहमी थेट देवाच्या विरोधमध्ये आहे. जेंव्हा दावीदाने बथशेबाबरोबर व्यभिचार केला आणि उरिया याला मारले, तेंव्हा त्याने चित्तवेधक प्रार्थनेने प्रतिसाद दिला: “तुझ्याविरुद्ध, तुझ्याविरूद्धच मी पाप केले आहे, तुझ्या दृष्टीने जे वाईट ते मी केले आहे...” (स्तोत्र 51:4). जेणेकरून दावीदाने बथशेबा आणि उरिया यांच्याविरुद्ध पाप केले होते, तर तो असा कसा दावा करू शकतो की त्याने फक्त देवाविरुद्ध पाप केले आहे? दाविदाला हे समजले होते की, सर्व पाप हे शेवटी देवाच्या विरुद्ध आहेत. देव हा सार्वकालिक आणि अमर्याद अस्तित्व आहे (स्तोत्र 90:2). त्याचा परिणाम म्हणून सर्व पापांसाठी सार्वकालिक शिक्षा गरजेची आहे. देवाचे पवित्र, परिपूर्ण, आणि अमर्यादित चरित्र आपल्या पापामुळे दुखावले जाते. जरी आपल्या मर्यादित मनासाठी आपले पाप हे वेळेमध्ये मर्यादित आहे, परंतु देवासाठी—जो वेळेच्या मार्यादेच्या बाहेर आहे—पाप ज्याची तो घृणा करतो ते चालूच राहते. आपले पाप हे सार्वकाळासाठी त्याच्यापुढे आहे आणि त्याचे पवित्र न्यायीत्व संतुष्ट करण्यासाठी पापाला सार्वकाळासाठी शिक्षा करावी लागेल.

नरकामधील कोणाएकापेक्षा हे कोणीही अधिक चांगल्या प्रकारे समजू शकत नाही. श्रीमंत मनुष्य आणि दरिद्री लाजर यांची कथा एक परिपूर्ण उदाहरण आहे. दोघे मेले, आणि श्रीमंत मनुष्य नरकात गेला आणि लाजर स्वर्गात (लूक 16). नक्कीच, श्रीमंत मनुष्याला माहित होते की, आयुष्यभर त्याने फक्त पापच केले. परंतु, विशेष म्हणजे, तो कधीही हे बोलला नाहीं की, “माझा शेवट इथे कसा झाला?” हा प्रश्न नरकामध्ये कधीही विचारला जात नाही. तो असे नाही बोलला, “मी खरच याच्या पात्र आहे काय? तुला नाही वाटत का हे थोडे अति आहे? थोडे अतिवरचढ आहे?” त्याने फक्त एवढेच सांगितले की कोणीतरी माझ्या भावांकडे जे अजून जिवंत आहेत त्यांच्याकडे जा आणि त्यांना माझ्या विनाशाबद्दल इशारा द्या.

श्रीमंत मनुष्यासारखे, नरकामधील प्रत्येक पाप्याला या गोष्टीची परिपूर्ती होते की, तो तेथे असण्यासाठी पात्र आहे. प्रत्येक पाप्याकडे संपूर्ण सचेत, तीव्र जागरूक, आणि संवेदनशील अंतःकरण असते, जे नरकामध्ये, त्याला स्वतःला छळणारे बनते. हा नरकामधील छळाचा अनुभव आहे—एक मनुष्य जो त्याच्या किंवा तिच्या पापाबद्दल पूर्णपणे जाणून आहे त्याबरोबर अथकपणे दोष लावणारे अंतःकरण, ज्यामध्ये एक क्षणाचाही आराम नाही. पापाच्या अपराधीपणाची भावना लाज आणि सार्वकाळासाठी स्वतःबद्दल घृणा निर्माण करते. श्रीमंत मनुष्याला माहित होते की, आयुष्यभराच्या पापासाठी सर्वाकाळची शिक्षा ही उचित आणि यथायोग्य आहे. म्हणूनच त्याने कधीही निषेध केला नाही किंवा नरकामध्ये असण्याबद्दल प्रश्न केला नाही.

सार्वकालिक नाश, सार्वकालिक नरक, आणि सार्वकालिक शिक्षा यांची वस्तुस्थिती ही भयप्रद आणि त्रासदायक आहे. म्हणून आपण कदाचित, निश्चितच, घाबरलेले असू शकतो हे चांगले आहे. जरी हे कठोर असे भासू शकते, तरी आपल्यासाठी एक चांगली बातमी आहे. देव आपल्यावर प्रेम करतो (योहान 3:16) आणि नरकापासून आपल्याला वाचवण्याची इच्छा करतो (2 पेत्र 3:9). परंतु देव न्यायी आणि नीतिमान सुद्धा आहे म्हणून, तो आपल्या पापांना शिक्षा केल्याविना जाऊ देऊ शकत नाही. कोणीतरी याच्यासाठी किंमत भरली पाहिजे. त्याच्या अपार दया आणि प्रेमामुळे, त्याने आपल्या पापासाठी स्वतःची किंमत उपलब्ध करून दिली. त्याने त्याचा मुलगा येशू ख्रिस्त याला वधस्तंभावर आपल्यासाठी मरून आपल्या पापाचा दंड भरण्यासाठी पाठवले. येशूचे मरण हे अमर्याद मरण होते कारण तो अमर्याद देव/मनुष्य आहे, ज्याने आपल्या अमर्याद पापाच्या कर्जाची परतफेड केली, जेणेकरून आपल्याला नरकामध्ये सार्वकाळासाठी परतफेड करण्याची गरज नाही (2 करिंथ 5:21).जर आपण आपल्या पापांना कबूल करू आणि आपला विश्वास ख्रिस्तावर ठेवून, देवाकडे ख्रिस्ताच्या बलीदानावर आधारित क्षमेची याचना करू, तर आपण वाचवले, क्षमा केले, धुतले, आणि स्वर्गामध्ये सार्वकालिक घराचे अभिवचन असलेले होऊ. देवाने आपल्यावर एवढी प्रीती केली की त्याने आपल्या तारणासाठी माध्यम उपलब्ध करून दिले, परंतु जर आपण त्याची सार्वकालिक जीवनाची भेट नाकारू, तर आपण त्या निर्णयाच्या सार्वकालिक परिणामांचा सामना करू.

Englishमराठीच्या पहिल्या पानावर वापस या

पापासाठी सार्वकालिक नरक ही शिक्षा कितपत रास्त आहे?
© Copyright Got Questions Ministries