प्रश्नः
ख्रिस्ती लोकांनी डॉक्टरांकडे जावे काय?
उत्तरः
काही ख्रिस्ती लोकांचा असा विश्वास आहे की डॉ क्टरांकडे जाणे हे देवावरील विश्वासाची उणीव दाखविते. वचन-विश्वास चळवळीत डॉक्टरांचा सल्ला घेणे हे बहुधा विश्वासाची उणीव मानले जाते जी खरे म्हणजे आपणास बरे करण्यापासून देवास रोखून ठेवील. ख्रिश्चन सायन्स सारख्या गटांत, डॉक्टरांची मदत घेण्यास कधी कधी आम्हास आरोग्य देण्यासाठी देवाने दिलेल्या आध्यात्मिक ऊर्जेचा उपयोग करण्याच्या मार्गात अडखळण म्हणून पाहिले जाते. ह्या दृष्टिकोनाचा तर्क अत्यंत अपूरा आहे. आपली कार बिघडल्यास, आपण ती मेक्यानिककडे घेऊन जाता की देवाने चमत्कार करावा व आपली कार ठीक करावी म्हणून देवाची वाट बघता? जर आपल्या घरातील नळ बिघडले, तर आपण देवाने ती गळती ठीक करावी म्हणून वाट पाहता, की आपल्या नळ सुधारणार्यास बोलाविता? देव जसे आमच्या शरीरांस आरोग्य देण्यास समर्थ आहे तसाच तो आमची कार दुरूस्त करण्यास व नळ सुधारण्यासही समर्थ आहे. वस्तुस्थिती ही आहे की देव आरोग्यदानाचे चमत्कार करू शकतो आणि करतो याचा अर्थ हा नाही की आपण आम्हास मदत करण्यासाठी ज्ञान व कौशल असलेल्या लोकांची मदत घेण्याऐवजी नेहमीच चमत्काराची अपेक्षा करावी.
बायबलमध्ये अनेकदा वैद्यांचा उल्लेख आला आहे. आपण वै़द्यांकडे जाऊ नये हे शिकविण्यासाठी संदर्भाबाहेर काढता येईल असे केवळ एकच वचन आहे 2 इतिहास 16:12. "आसाच्या पायास त्याच्या कारकीर्दीच्या एकोणचाळिसाव्या वर्षी व्याधी झाला; तो व्याधी बरांच वाढला; तथापि त्या रोगांत तो परमेश्वरास शरण न जाता वैद्यांस शरण गेला." समस्या ही नव्हती की आसाने वैद्याचा सल्ला घेतला, पण समस्या ही होती की त्याने "प्रभुची मदत घेतली नाही." डॉक्टरांची भेट घेत असतांनाही, आमचा अंतिम विश्वास देवावर असला पाहिजे, डॉक्टरांवर नव्हे.
"वैद्यकीय उपचारांचा" उपयोग करण्याविषयी सांगणारी अनेक वचने आहेत जसे पट्टी बांधणे (यशया 1:6), तेल (याकोब 5:14), तेल व द्राक्षरस (लूक 10:34), पाने (यहेजकेल 47:12), द्राक्षरस (तीमथ्याला 1 ले पत्र 5:23), आणि लेप, विशेषेकरून "गिलादातील मलम" (यिर्मया 8:22). तसेच, प्रेषितांच्या कृत्यांचा आणि लूककृत शुभवर्तमानाचा लेखक, लूक याचा उल्लेख पौलाने "प्रिय वैद्य" (कलस्सैकरांस पत्र 4:14) असा केला आहे.
मार्क 5:25-30 एका स्त्रीची गोष्ट सांगते जिला सतत रक्तस्त्रावाचा त्रास होता, ती अनेक वैद्यांकडे गेली होती आणि तिने आपला सर्व पैसा खर्च केला होता तरी ही अशी समस्या होती जी वैद्यांनाही बरी करता आली नाही. येशूजवळ येऊन तिने असा विचार केला की ती जरी त्याच्या वस्त्राच्या काठास स्पर्श केला, तरी ती बरी होईल; तिने त्याच्या वस्त्राच्या काठास स्पर्श केला, आणि ती बरी झाली. तो पापी लोकांसोबत वेळ का घालवितो ह्या परूशी लोकांच्या प्रश्नाचे उत्तर देतांना, येशूने, त्यांस म्हटले, "निरोग्यांना वैद्याची गरज नाही, तर दुखणाइतांना आहे" (मत्तय 9:12). या वचनांवरून आपण खालील सिद्धांत प्राप्त करू शकतो:
1) वैद्य देव नाहीत आणि त्यांच्याकडे त्या दृष्टीने पाहता कामा नये. ते कधी कधी मदत करू शकतात, पण इतर वेळा ते केवळ पैसा झटकून घेण्याचे काम करतील.
2) वैद्यांकडे जाण्यास आणि "जगीक" उपचारांचा उपयोग करण्यास पवित्र शास्त्रात दोष दिलेला नाही. खरे म्हणजे, वैद्यकीय उपचाराकडे अनुकूल दृष्टीने पाहण्यात आले आहे.
3) कोणत्याही शारीरिक समस्येत देवाच्या हस्तक्षेपासाठी त्याची मदत घेतली पाहिजे (याकोब 4:2; 5:13). तो असे अभिवचन देत नाही की आम्हास जसे नेहमीच हवे असते तसे तो उत्तर देईल (यशया 55:8-9), पण आमच्याजवळ हे आश्वासन आहे की जे काही तो करील तो प्रेमाने करील व ते आमच्या हिताचे असेल (स्तोत्र 145:8-9).
म्हणून, ख्रिस्ती लोकांनी डाक्टरांकडे जावे काय? देवाने आम्हाला बुद्धिमान प्राणी म्हणून बनविले आहे आणि त्याने आम्हाला औषधी निर्माण करण्याची पात्रता दिली आहे आणि आम्ही शिकू शकतो की आमच्या शरीरांस कसे बरे करावे. ह्या ज्ञानाचा व योग्यतेचा भौतिक आरोग्यासाठी उपयोग करण्यात काहीच वावगे नाही. डॉक्टरांकडे देवाने आम्हाला दिलेली देणगी म्हणून पाहता येते, असे माध्यम ज्याद्वारे देव आरोग्य व स्वास्थ्य आणू शकतो. त्याचवेळी, आमचा अंतिम विश्वास व भरवंसा देवाठायी असला पाहिजे, डॉक्टरांमध्ये अथवा औषधांत नव्हे. जसे सर्व कठीण निर्णयांबाबत असते, त्याचप्रमाणे आपण देवाचा धावा केला पाहिजे जो मागितल्यावर आम्हाला बुद्धी देण्याचे अभिवचन देतो (याकोब 1:5).
English
ख्रिस्ती लोकांनी डॉक्टरांकडे जावे काय?