settings icon
share icon
प्रश्नः

माझा घटस्फोट झाला आहे. मी बायबलनुसार पुनर्विवाह करू शकतो काय?

उत्तरः


आम्हाला यासारखी प्रश्ने बरेचदा प्राप्त होत असतात "माझा अमुक-अमुक कारणाने घटस्फोट झाला आहे. मी पुनर्विवाह करू शकतो काय?" "माझा दोनदा घटस्फोट झाला आहे — पहिल्यांदा माझ्या जोडीदाराच्या व्यभिचारामुळे, दुसरे आपसात जुळवून घेता न आल्यामुळे. मी एका पुरुषासोबत डेटिंग करीत आहे ज्याचा तीनदा घटस्फोट झाला आहे — पहिले म्हणजे जुळवून घेता आले नाही म्हणून, दुसर्यांदा त्याने व्यभिचार केला म्हणून, तिसर्यांदा त्याच्या पत्नीने व्यभिचार केला म्हणून. आम्ही एकमेकांशी विवाह करू शकतो काय?" अशाप्रकारच्या प्रश्नांची उत्तर देणे कठीण जाते कारण घटस्फोटानंतर पुनर्विवाहासाठी वेगवेगळ्या परिस्थितींसंबंधाने बायबल सविस्तर सांगत नाही.

आम्ही निश्चितपणे हे जाणू शकतो की विवाहित दाम्पत्त्यासाठी देवाची योजना ही आहे की जोवर दोन्ही जोडीदार जिवंत आहेत तोवर त्यांनी विवाहित राहावे (उत्पत्ति 2:24; मत्तय 19:6). पुनर्विवाहासाठी एकमेव विशिष्ट मुभा देण्यात आली आहे ती म्हणजे व्यभिचाराच्या कारणाने देण्यात आलेल्या घटस्फोटानंतर (मत्तय 19:9), आणि याविषयी देखील ख्रिस्ती लोकांत वाद केला जातो. दुसरी शक्यता आहे त्याग करणे — जेव्हा विश्वास न करणारा जोडीदार विश्वासणार्‍या जोडीदारास सोडतो (करिंथकरांस 1 ले पत्र 7:12-15). परंतु, हा परिच्छेद, विशिष्टपणे पुनर्विवाहास उद्देशून नाही, केवळ वैवाहिक जीवनात टिकून राहाण्यास बंधनकारक असण्यासंबंधी आहे. शारीरिक, लैगिंक, अथवा अत्यंत कठोर भावनात्मक गैरवर्तनाच्या घटना वेगळे राहण्याचे पुरेसे कारण आहे, पण बायबल घटस्फोट अथवा पुनर्विवाहाच्या संदर्भात ह्या पापांविषयी बोलत नाही.

आम्हास दोन गोष्टी निश्चित माहीत आहेत. देवाला घटस्फोटाचा वीट आहे (मलाखी 2:16), आणि देव दयाळू व क्षमाशील आहे. प्रत्येक घटस्फोट हा पापाचा परिणाम आहे, एका जोडीदाराच्या वतीने असो वा दोन्ही जोडीदार्यांच्या वतीने. देव घटस्फोटासाठी क्षमा करतो काय? अवश्य! इतर कुठल्याही पापापेक्षा घटस्फोट कमी क्षम्य नाही. सर्व पापांची क्षमा येशू ख्रिस्ताठायी विश्वासाद्वारे उपलब्ध आहे (मत्तय 26:28; इफिसकरांस पत्र 1:7). जर देव घटस्फोटाच्या पापाची क्षमा करतो, तर याचा अर्थ हा आहे का की आपण पुनर्विवाह करावयास स्वतंत्र आहा? जरूरी नाही. देव कधी कधी लोकांस अविवाहित दशेत राहण्यास पाचारण करतो (करिंथकरांस 1 ले पत्र 7:7-8). अविवाहित दशेत राहण्यास शाप अथवा शिक्षेच्या दृष्टीने पाहता कामा नये, पण संपूर्ण अंतःकरणाने देवाची सेवा करण्याची संधी म्हणून पाहावे (करिंथकरांस 1 ले पत्र 7:32-36). तरीही, देवाचे वचन आम्हास हे सांगते की, वासनेत जळण्याऐवजी विवाह करणे उत्तम आहे (करिंथकरांस 1 ले पत्र 7:9). कदाचित हे कधी कधी घटस्फोटानंतर पुनर्विवाहास लागू पडते.

म्हणून, आपण पुनर्विवाह करू शकता काय अथवा केला पाहिजे काय? आम्ही त्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकत नाही. शेवटी, हे आपल्या, आपल्या भावी जोडीदाराच्या मध्ये आहे, आणि, सर्वात महत्वाचे म्हणजे देवाच्या मध्ये आहे. आपणास आम्ही केवळ एकमेव सल्ला हा देऊ शकतो की आपण काय करावे असे देवाला वाटते यासंबंधी त्याने आपणास बुद्धी द्यावी म्हणून आपण त्याच्याजवळ प्रार्थना करावी (याकोबाचे पत्र 1:5). मोकळ्या अंतःकरणाने प्रार्थना करा आणि मनापासून प्रभूला विनंती करा की त्याने त्याची इच्छा आपल्या अंतःकरणात टाकावी (स्तोत्र 37:4). प्रभूची इच्छा जाणून घ्या (नीतिसूत्रे 3:5-6) आणि त्याच्या मार्गदर्शनाचे अनुसरण करा.

English



मराठीच्या पहिल्या पानावर वापस या

माझा घटस्फोट झाला आहे. मी बायबलनुसार पुनर्विवाह करू शकतो काय?
© Copyright Got Questions Ministries