ख्रिस्ती लोकांनी त्यांच्या मुलांस कशी शिस्त लावावी? मुलांस शिस्त लावण्याविषयी बायबल काय म्हणते?


प्रश्नः ख्रिस्ती लोकांनी त्यांच्या मुलांस कशी शिस्त लावावी? मुलांस शिस्त लावण्याविषयी बायबल काय म्हणते?

उत्तरः
मुलांस उत्तमप्रकारे शिस्त कशी लावावी हे शिकणे कठीण कार्य ठरू शकते, पण ते अत्यंत महत्वाचे आहे. काही लोकांचे म्हणणे असे आहे की भौतिक शिस्त (शारीरिक शिक्षा) जसे मारणे ही एकमेव पद्धत आहे जिचे बायबल समर्थन करते. इतरांचा आग्रह आहे की "टाईम-आऊट्स" आणि इतर शिक्षा ज्यात शारीरिक शिस्तीचा समावेश नाही अधिक प्रभावी ठरतात. बायबल काय म्हणते? बायबल शिकविते की शारीरिक शिस्त योग्य, लाभदायक, आणि आवश्यक आहे.

गैरसमज करून घेऊ नका — आम्ही मुलांसोबत गैरवर्तनाचे मुळीच समर्थक नाही. मुलास कधीही इतका शारीरिक दंड देता कामा नये ज्यामुळे त्याला खरोखर शारीरिक इजा होईल. तरी, बायबलनुसार, मुलांची योग्य आणि संयमित शारीरिक शिस्त उत्तम गोष्ट आहे आणि ती त्यांच्या हिताची आहे आणि मुलाच्या योग्य संगोपनासाठी आहे.

अनेक शास्त्रवचने खरोखर भौतिक शिस्तीस प्रोत्साहन देत नाहीत. "मुलास शिक्षा करण्यास अनमान करू नको, कारण त्याला छडी मारल्याने तो मरणार नाही" (नीतिसूत्रे 23ः13-14; तसेच 13ः24; 22ः15; 20ः30 ही वचने पाहा). बायबल ठामपणे शिस्तीच्या महत्वावर जोर देते; उपयुक्त लोक बनण्यासाठी आम्हास याची नितांत गरज आहे, आणि लहान असतांना आम्ही हे अधिक सहजपणे शिकू शकतो. ज्या मुलांस शिस्त लावली जात नाही ती बरेचदा मोठेपणी बंडखोर होतात, अधिकार्यांबद्दल त्यांच्या मनात आदर नसतो, आणि परिणामतः मनापासून देवाच्या आज्ञेचे पालन करणे आणि त्याचे अनुसरण करणे त्यांस कठीण जाते. देव स्वतः शिस्तीचा उपयोग आमच्यात सुधारणा घडवून आणण्यासाठी आणि आम्हाला योग्य मार्गावर नेण्यासाठी व आमच्या चुकीच्या कृत्यांबद्दल पश्चातापास प्रोत्साहन देण्यासाठी करतो (स्तोत्र 94ः12; नीतिसूत्रे 1ः7; 6ः23; 12ः1; 13ः1; 15ः5; यशया 38ः16; इब्री लोकांस पत्र 12ः9).

योग्य शिस्त लावण्यासाठी आणि बायबलच्या सिद्धांतांनुसार शिस्त लावण्यासाठी, आईबापांनी शिस्तीसंबंधाने पवित्र शास्त्राच्या सल्ल्याशी परिचित असले पाहिजे. नीतिसूत्रांच्या पुस्तकात मुलांच्या संगोपनासंबंधाने अनेक सुजाणतेच्या गोष्टींचा समावेश आहे, जसे, "छडी व वाग्दंड ज्ञान देतात, पण मोकळे सोडलेले पोर आपल्या आईला खाली पाहावयास लावते." (नीतिसूत्रे 29ः15). ह्या वचनात मुलास शिस्त न लावण्याच्या परिणामांचा आराखडा मांडण्यात आला आहे — आईबापांस अपमानित व्हावे लागते. अर्थात, शिस्तीचे ध्येय मुलाच्या चांगल्यासाठी असले पाहिजे आणि कधीही मुलांशी गैरवर्तन आणि छळ यांचे समर्थन करण्यासाठी त्याचा कधीही उपयोग करता कामा नये. कधीही राग अथवा नैराश्यास वाव देण्यासाठी त्याचा उपयोग करता कामा नये.

शिस्तीचा उपयोग लोकांत सुधारणा घडवून आणण्यासाठी आणि त्यांनी योग्य मार्गात चालावे म्हणून त्यांस शिक्षण देण्यासाठी केला जातो. "कोणतीही शिक्षा तत्काली आनंदाची वाटत नाहीं, खेदाची वाटते; तरी ज्यांना तिच्याकडून वळण लागलें आहे त्यांना ती पुढे नीतिमत्त्व हे शांतिकारक फळ देते" (इब्री लोकांस पत्र 12ः11). देवाची शिस्त अथवा ताडना प्रेमळ असते, जशी ती आईबाप आणि मुलात असावी. भौतिक ताडनाचा उपयोग कधीही कायमची शारीरिक इजा अथवा यातना देण्यासाठी करू नये. शारीरिक शिक्षेनंतर लगेच मुलास हे आश्वासन देऊन सांत्वन द्यावे की त्याच्यावर/तिच्यावर आपली प्रीती आहे. हे क्षण मुलास हे शिकविण्यासाठी योग्य समय असतो की देव आम्हास शिस्त लावतो कारण तो आमच्यावर प्रीती करतो आणि, आईवडील म्हणून, आम्ही देखील आमच्या मुलांसाठी असेच करतो.

शिस्तीच्या इतर स्वरूपांचा, जसे "टाईम-आऊटचा," उपयोग शारीरिक शिस्तीऐवजी करता येऊ शकतो का? काही आईवडिलांस असे आढळून येते की त्यांची मुले शारीरिक शिस्तीस योग्य तो प्रतिसाद देत नाहीत. काही आईवडिलांस असे आढळून येते की "टाईम-आऊट म्हणजे खेळणे थांबवावयास सांगणे," मूळ शिक्षण देणे, आणि/अथवा मुलांच्या आवडीची एखादी वस्तू हिसकावून घेणे मुलाच्या व्यवहारात बदल घडवून आणण्यासाठी प्रोत्साहन देण्याकरिता अधिक प्रभावी ठरते. जर खरोखर असे असेल तर, अवश्यमेव, आईबापांनी ह्या पद्धतींचा उपयोग करावा ज्याद्वारे जरूरी आचरणात्मक बदल उत्पन्न होऊ शकतात. बायबल शारीरिक शिस्तीचे निश्चितच समर्थन करते, परंतु बायबलचे ते ध्येय साध्य करण्यासाठी उपयोगात आणल्या जाणार्‍या निश्चित पद्धतीपेक्षा धार्मिक चारित्र्याचा निर्माण करण्याशी अधिक संबंधित आहे.

ह्या विषयास आणखी कठीण करणारी गोष्ट म्हणजे सरकारने सर्व प्रकारच्या शारीरिक शिक्षेस मुलाशी गैरवर्तनाच्या वर्गात मोडण्यास सुरूवात केली आहे. अनेक आईबाप आपल्या मुलांस यासाठी मारत नाहीत कारण त्यांची सरकारी अधिकार्‍यास तक्रार केली जाईल आणि त्यांची मुले हिसकावून घेतली जातील अशी भिती त्यांस वाटते. जर सरकारने भौतिक शिक्षेस अथवा ताडनेस बेकायदेशीर ठरविले आहे तर आईबापाने काय करावे? रोमकरांस पत्र 13ः1-7 अनुसार, आईवडिलांनी सरकारच्या अधीनतेत राहावे. सरकारने कधीही देवाच्या वचनाच्या विपरीत करता कामा नये, आणि बायबलनुसार म्हणता, भौतिक शिस्त, मुलाच्या हितासाठी आहे. तथापि, मुलांस सरकारच्या "देखरेखीत" सोपविण्याऐवजी त्यांना कुटंबात ठेवणे कितीतरी अधिक उत्तम आहे ज्यात त्यांस कमीतकमी काही शिस्त तर लागेल.

इफिसकरांस पत्र 6ः4 मध्ये, वडिलांस सांगण्यात आले आहे की त्यांनी मुलांस चिरडीस आणू नये. त्याऐवजी, त्यांनी त्यांचे देवाच्या मार्गांत संगोपन करावे. "प्रभुच्या शिस्तीत व शिक्षणात" मुलास वाढविण्यात संयमित, सुधारणा घडवून आणणार्‍या, आणि, होय, प्रेमळ शारीरिक शिक्षेचा अथवा शिस्तीचा समावेश आहे.

English
मराठीच्या पहिल्या पानावर वापस या
ख्रिस्ती लोकांनी त्यांच्या मुलांस कशी शिस्त लावावी? मुलांस शिस्त लावण्याविषयी बायबल काय म्हणते?