प्रश्नः
प्रतिभा अथवा कलागुण व आत्मिक कृपादाने यांत काय फरक आहे?
उत्तरः
प्रतिभा आणि आत्मिक कृपादाने यांत समानता आणि फरक आहेत. दोन्हीही देवाकडून मिळालेली कृपादाने आहेत. दोन्ही वापरासह प्रभावीपणात वाढत जातात. या दोन्हींचा उपयोग स्वार्थासाठी नव्हे तर इतरांच्या वतीने वापरण्याच्या उद्देशाने आहे. 1 करिंथ 12:7 सांगते की आत्मिक कृपादाने इतरांच्या फायद्यासाठी दिली गेली आहेत स्वतःच्या नाही. दोन महान आज्ञा देवावर आणि इतरांवर प्रेम करण्याशी संबंधित आहेत, त्यावरून हे स्पष्ट होते की आपण आपल्या गुणांचा उपयोग त्या हेतूने करावा. पण कोणाला आणि केव्हा दिलेली प्रतिभा आणि आत्मिक कृपादाने वेगळी असतात.
व्यक्तीला (त्याचा परमेश्वरावर किंवा ख्रिस्तावर विश्वास काहीही का असेना) आनुवंशिक (काहींमध्ये संगीत कला आणि गणित या विषयांसाठी स्वाभाविक योग्यता असतक) आणि सभोवतालच्या वातावरणाची (संगीत विषयात तज्ञ असलेल्या कुटुंबात लहानाचे मोठे झाल्यामुळे संगीतासाठी विशेष प्रतिभेचा विकास करण्यात मदत मिळेल) जोड म्हणून स्वाभाविक प्रतिभा दिली जाते किंवा परमेश्वराला काही लोकांना काही विशिष्ट गुण देण्याची इच्छा असेल (उदाहरणार्थ निर्गम 31:1-6 मधील बसालेल). सर्व विश्वासणारयांना त्यांच्या पापांच्या क्षमेसाठी जेव्हा ते ख्रिस्तावर आपला विश्वास ठेवतात त्यावेळी पवित्र आत्म्याद्वारे आत्मिक कृपादाने दिली जातात (रोम 12:3,6). त्याक्षणी, पवित्र आत्मा नवीन विश्वासणार्यांना आत्मिक कृपादान किंवा कृपादाने देतो जी त्या विश्वासणाऱ्यास प्राप्त व्हावी अशी त्याची इच्छा असते (1 करिंथ 12:11).
रोम 12:3-8 मध्ये आत्मिक कृपादानांची खालीलप्रकारे यादी तयार करण्यात आली आहे भविष्यवाणी, इतरांची सेवा करणे (सामान्य अर्थाने) शिकविणे, संदेश देणे, औदार्य, पुढारीपण आणि दया दाखवणे. 1 करिंथ 12:8-11 या वचनांत ही यादी अशी आहे अर्थात ज्ञानाचे वचन (आत्मिक ज्ञान देण्याची क्षमता), विद्येचे वचन (व्यवहारिक सत्य मांडण्याची योग्यता), विश्वास (देवावर असामान्यरित्या अवलंबून राहणे), अद्भुत कार्ये करण्याची शक्ती, संदेश देण्याची शक्ती किंवा भविष्यवाणी, आत्मे ओळखण्याची शक्ती, विशेष प्रकारच्या भाषा बोलण्याची शक्ती (आपण अभ्यास न केलेल्या भाषा बोलण्याची) आणि भाषांचा अर्थ सांगण्याची शक्ती. तिसरी यादी इफिस 4:10-12 मध्ये आढळून येते, जी सांगते की देवाने मंडळीस प्रेषित, संदेष्टे, सुवार्तिक, आणि पाळक-शिक्षक दिले आहेत. कोणत्याही दोन याद्या एकसारख्या नसल्यामुळे तेथे किती आत्मिक कृपादाने आहेत याबद्दल देखील एक प्रश्न आहे. बायबलसंबंधी याद्या नसाव्यात ही देखील शक्यता आहे, बायबलमध्ये सांगितल्या गेलेल्या कृपादानांव्यक्तिरिक्त आत्मिक कृपादाने असू शकतात.
एखादी व्यक्ती आपली कौशल्ये विकसित करू शकतो आणि नंतर त्या दृष्टीने आपला व्यवसाय किंवा छंद कामी आणू शकेल परंतु परमेश्वराने आत्मिक कृपादाने ख्रिस्ताच्या मंडळीच्या उभारणीसाठी दिली आहेत. त्यामध्ये, सर्व खिस्ती विश्वासणार्यांस ख्रिस्ताच्या सुवार्तेच्या कार्यामध्ये सक्रिय सहभाग घ्यावयाचा आहे. सर्वांना “सेवेच्या कार्यात” सामील होण्यासाठी व सुसज्ज होण्यासाठी (इफिस 4:12). पाचारण करण्यात आले आहे. सर्वांना कृपादाने देण्यात आली आहेत जेणेकरून ते ख्रिस्ताने त्यांच्यासाठी जे काही केले आहे त्याच्याप्रत कृतज्ञतेने ख्रिस्ताच्या कार्यात योगदान देऊ शकतील. असे केल्याने, ख्रिस्तासाठी केलेल्या श्रमाद्वारे त्यांना जीवनात परिपूर्ती देखील मिळते. संतांच्या उभारणीस मदत करणे हे मंडळीच्या पुढार्याचे कार्य आहे जेणेकरुन त्यांनी ज्या सेवाकार्यासाठी देवाने त्यांस बोलाविले आहे, त्यात त्याला ते सुसज्ज करतील. आत्मिक कृपादानांचा निर्धारित परिणाम असा आहे की ख्रिस्ताच्या देहाची वाढ व्हावी , ख्रिस्ताच्या देहातील प्रत्येक सदस्याच्या संयुक्त पुरवठ्याने तीस बळ प्राप्त व्हावे.
आत्मिक कृपादाने आणि कलागुण यांच्यातील फरक सारांशित करण्यासाठी: 1) प्रतिभा म्हणजे आनुवंशिक गुणाचा आणि/किंवा प्रशिक्षणाचा परिणाम असतो, तर आत्मिक कृपादान पवित्र आत्म्याच्या सामथ््र्याने प्राप्त होते. 2) एखादी प्रतिभा कोणालाही प्राप्त होेऊ शकते, ख्रिस्ती किंवा गैरख्रिस्ती, परंतु आत्मिक कृपादान केवळ ख्रिस्ती व्यक्तीकडे असते. 3) प्रतिभा आणि आत्मिक कृपादान दोन्ही देवाच्या गौरवासाठी आणि इतरांना सेवा देण्यासाठी वापरले गेले पाहिजेत, परंतु आत्मिक कृपादानांचे लक्ष्य या कार्यांवर असते, तर प्रतिभांचा वापर पूर्णतः अनात्मिक हेतूंसाठी केला जाऊ शकतो.
English
प्रतिभा अथवा कलागुण व आत्मिक कृपादाने यांत काय फरक आहे?