settings icon
share icon
प्रश्नः

मंडळीचे वर मध्य आकाशात उचलले जाणे आणि दुसरे आगमन यात काय फरक आहे?

उत्तरः


मंडळीचे वर मध्य आकाशात उचलले जाणे आणि दुसरे आगमन याविषयी लोक बरेचदा गोंधळात पडतात. कधी कधी हे ठरवणे अवघड जाते की पवित्र शास्त्रातील एखादे वचन मंडळीच्या वर उचलल्या जाण्याचा उल्लेख आहे की दुसर्‍या आगमनाचा. तथापि, बायबलमधील शेवटच्या भविष्यवाणीचा अभ्यास करताना त्या दोघांमध्ये फरक करणे खूप महत्वाचे आहे.

जेव्हा पृथ्वीवरून मंडळीस (ख्रिस्तामधील सर्व विश्वासणारे) उचलून घेण्यासाठी येशू ख्रिस्त परत येईल त्यास रॅप्चर किंवा मंडळीचे वर मध्य आकाशात उचलले जाणे म्हणतात. मंडळीच्या वर उचलले जाण्याचे वर्णन 1 थेस्सल 4:13-18 आणि 1 करिंथ 15:50-54 मध्ये केले आहे. जे विश्वासणारे मेलेले आहेत त्यांचे शरीर पुन्हा जिवंत केले जाईल आणि जे विश्वासणारे अजूनही जिवंत आहेत त्यांच्यासोबत ते प्रभूस हवेत भेटतील. हे सर्व निमिषात घडून येईल. दुसरे आगमन तेव्हा घडेल जेव्हा येशू ख्रिस्तविरोधकाला पराभूत करण्यासाठी, वाईटाचा नाश करण्यासाठी, आणि त्याचे हजार वर्षांचे राज्य स्थापित करण्यासाठी परत येतो. दुसर्‍या आगमनाचे वर्णन प्रकटीकरण 19:11-16 मध्ये केले आहे.

मंडळीचे वर मध्य आकाशात उचलले जाणे आणि दुसरे आगमन यांच्यातील महत्वाचे फरक खालीलप्रमाणे आहेत :

1) मंडळीचे वर मध्य आकाशात उचलले जाण्याच्या वेळी, विश्वासणारे हवेत परमेश्वराला भेटतील (1 थेस्सल 4:17). दुसर्‍या आगमनाच्या वेळी, विश्वासणारे प्रभूबरोबर पृथ्वीवर परत येतील (प्रकटीकरण 19:14).

2) दुसरे आगमन महान आणि भयानक क्लेशसमयानंतर घडेल (प्रकटीकरण अध्याय 6-19). मंडळीचे वर मध्य आकाशात उचलले जाणे क्लेशसमयापूर्वी घडते (1 थेस्सल 5:9; प्रकटीकरण 3:10).

3) मंडळीचे वर मध्य आकाशात उचलले जाणे म्हणजे मुक्तिचे कार्य म्हणून विश्वासणार्‍यास पृथ्वीवरून काळून घेणे होय (1 थेस्सल 4:13-17, 5:9). दुसर्‍या आगमनामध्ये न्यायदंडाचे कार्य म्हणून विश्वास न करणार्‍यास काढून टाकणे समाविष्ट आहे (मत्तय 24:40-41).

4) मंडळीचे उचलले जाणे गुप्त आणि त्वरित असेल (1 करिंथ 15:50-54). दुसरे आगमन सर्वांना दृश्यमान असेल (प्रकटी 1:7; मत्तय 24:29-30).

5) ख्रिस्ताचे दुसरे आगमन शेवटच्या काळात होणार्‍या इतर काही घटना घडल्याशिवाय होणार नाही (2 थेस्सल 2:4; मत्तय 24:15-30; प्रकटी अध्याय 6-18). मंडळीचे उचलले जाणे अगदी जवळ आहे; ते कोणत्याही क्षणी घडू शकते (तीत 2:13; 1 थेस्सल 4:13-18; 1 करिंथ 15:50-54).

मंडळीचे वर मध्य आकाशात उचलले जाणे आणि दुसरे आगमन वेगळे ठेवणे महत्वाचे का आहे?

1) जर मंडळीचे वर मध्य आकाशात उचलले जाणे आणि दुसरे आगमन समान घटना असतील तर विश्वासणाÚयांना यातना सहन करावी लागेल (1 थेस्सल 5:9; प्रकटीकरण 3:10).

2) जर मंडळीचे वर मध्य आकाशात उचलले जाणे आणि दुसरे आगमन समान घटना असेल तर ख्रिस्ताचे परत येणे अगदी जवळचे नसेल - अशा अनेक गोष्टी आहेत ज्या तो परत येण्यापूर्वी घडणे आवश्यक आहे (मत्तय 24: 4-30).

3) क्लेशसमयाचे वर्णन करताना प्रकटीकरण अध्याय 6-19 मध्ये कोठेही चर्चचा उल्लेख नाही. क्लेशसमयी - ज्याला “याकोबाचा क्लेशसमय” असेही म्हणतात (यिर्मया 30:7) - देव पुन्हा त्याचे मुख्य लक्ष इस्राएलकडे लावेल (रोम 11:17-31).

मंडळीचे वर मध्य आकाशात उचलले जाणे आणि दुसरे आगमन या समान परंतु वेगळ्या घटना आहेत. दोन्हींमध्ये येशूच्या परत येण्यांचा समावेश आहे. दोन्ही शेवटल्या घटना आहेत. तथापि, फरक ओळखणे अत्यंत महत्वाचे आहे. थोडक्यात, परमेश्वराच्या संतापापूर्वी पृथ्वीवरून सर्व विश्वासणार्‍यांस उचलून नेणे म्हणजे रॅप्चर किंवा मंडळीचे वर मध्य आकाशात उचलले जाणे. दुसरे आगमन म्हणजे क्लेश संपविण्यासाठी व ख्रिस्तविरोधी आणि त्याच्या वाईट जगाच्या साम्राज्याचा पराभव करण्यासाठी ख्रिस्ताचे पृथ्वीवर परत येणे होय.

English



मराठीच्या पहिल्या पानावर वापस या

मंडळीचे वर मध्य आकाशात उचलले जाणे आणि दुसरे आगमन यात काय फरक आहे?
© Copyright Got Questions Ministries