settings icon
share icon
प्रश्नः

येशू खरोखर अस्तित्वात होता का? येशू ख्रिस्ताच्या अस्तित्वाबद्दल कोणताही ऐतिहासिक पुरावा आहे का?

उत्तरः


थोडक्यात, जेंव्हा हा प्रश्न विचारला जातो तेव्हा प्रश्न विचारणारा व्यक्ती आणखी पुढे म्हणतो ‘बायबल च्या बाहेर’ येशूचे अस्तित्व आहे का. बायबल हे येशूच्या अस्तित्वा साठी पुराव्याचे स्रोत मानले जाऊ शकत नाही असे आम्ही मानत नाही. नवीन करारामध्ये येशू ख्रिस्त बद्दल शेकडो संदर्भ समाविष्टीत आहे. अनेक लेखकांच्या मते सुवार्ता दुसऱ्या शतकात म्हणजेच येशूच्या मृत्युच्या 100 पेक्षा जास्त वर्षां नंतर लिहिले आहेत. हे जरी असे असले (हा आमच्यासाठी विवादाचा प्रश्न आहे), तरी प्राचीन पुराव्याच्या दृष्टीने, कोणतीही घटना घडल्यानंतर 200 पेक्षा कमी वर्षांनी केलेले लेखन अतिशय विश्वसनीय पुरावा मानला जातो. शिवाय, बहुसंख्य विद्वान ज्यामध्ये (ख्रिश्चन आणि बिगर ख्रिश्चन) दोन्ही मोडतात या गोष्टीशी सहमत होतील कि पौल पत्र (त्यापैकी किमान काही) पहिल्या शतकाच्या मध्यभागी पॉल यांनी होते आणि ते देखील येशूच्या मृत्युच्या जवळपास 40 वर्षा नंतर.. प्राचीन हस्तलिखित पुराव्या संबंधी, हा पहिल्या शतकात इस्राएलात येशू नावाचा एक मनुष्य अस्तित्वात होता या संबंधी कमालीचा मजबूत पुरावा आहे.

सातव्या शतकात रोमन लोकांनी यरुशलेम वर आक्रमण करून आणि त्यांच्या रहिवाश्यांची कत्तल केली आणि बहुतेक इस्राएल लोकांची कत्तल करण्यात आली. संपूर्ण शहरे अक्षरश: जाळून खाक करण्यात आली होती. म्हणून येशूच्या अस्तित्वाचा बहुतांश पुरावा नष्ट झाली असेल तर त्यात आश्चर्य वाटू नये. येशूचे अनेक साक्षीदार ठार मारले गेले असतील. यामुळे येशूच्या प्रत्यक्षदर्शीची साक्ष अधिक मर्यादित झाली आहे.

येशूची मिनिस्ट्री (सेवा) मुख्यत्वे रोमन साम्राज्याची एका लहान कोपर्यात आणि तुलनेने नगण्य क्षेत्रात मर्यादित होती हे लक्षात घेता, येशू बद्दल धर्मनिरपेक्ष ऐतिहासिक स्रोतातून मोठ्या प्रमाणात माहिती काढलेल्या जाऊ शकते. येशूबद्दल महत्त्वाच्या ऐतिहासिक पुराव्यांमध्ये काही खालील बाबी समाविष्टीत आहे:

पहिल्या शतकातील रोमन ट्यासीटस, ज्याला प्राचीन जगातील अधिक अचूक इतिहासकारांपैकी एक मानले जाते, त्याने तिबेरिअसच्या काळात धर्मिक "ख्रिस्ती" लोकांचा पोंटिअस पिलेटच्या अधिपत्याखाली कसा छळ झाला त्याचा आपल्या लिखाणामध्ये उल्लेख केलेला आहे, (क्रीस्त्स म्हणजे लॅटिन मध्ये ख्रिस्त). सुटोनिअस जो सम्राट हद्रिअनचा मुख्य सचिव होता त्याने, क्रेस्तूस (किंवा ख्रिस्त) नावाचा एक मनुष्य पहिल्या शतकात दरम्यान राहत होता असे लिहिले आहे (ऐतिहासिक 15.44).

फ्लेव्हियस जोसीफस सर्वात प्रसिद्ध यहुदी इतिहासकार आहे. त्याच्या प्राचीन या पुस्तकात याकोबा जे येशूचे बंधू होते त्यांच्याबद्दल उल्लेख आढळतो. एक काव्य आहे (18: 3), जो आपल्याला येशूबद्दल सांगते. "एक येशू नावाचा शहाणा माणूस, होता त्याला मनुष्य म्हणावे का हा एक प्रश्न आहे, कारण तो चमत्कारी होता. त्याने खूप चमत्कारिक कार्य केले. तो मरणोपरांत तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला आणि दैवी संदेष्टे यांनी येशूविषयी आणि दहा हजार इतर अद्भुत गोष्टी बद्दल भाकीत केले होते तसेच ते घडले. एका आवृत्ती नुसार. “या सुमारास येशू नावाचा एक शहाणा माणूस होता. त्याचे आचार चांगले होते आणि [तो] सद्गुणी असल्याचे ज्ञात होते. आणि यहूदी व इतर राष्ट्रांचे अनेक लोक त्याचे शिष्य बनले. पिलाताने त्याला दोषी ठरविले वधस्तंभावर खिळून मारावे अशी शिक्षा दिली. पण त्याच्या शिष्यांपैकी कोणीही त्याचे गुरुत्व विसरले नाही. त्यांनी नोंदवले आहे कि त्याच्या सुळावर चढवण्याच्या तिसऱ्या दिवसी तो पुन्हा त्यांना दिसून आला आणि तो जिवंत होता; त्यानुसार तो कदाचित मशीहा होता ज्याच्या बद्दल संदेष्ट्यांनी अद्भुत गोष्टी सांगितल्या आहे."

ज्युलियस आफ्रिकानस या इतिहासकाराने येशूला सुळावर चढविल्यानंतर जो अंधार पसरला त्याच्यावर चर्चा करतांना थालसचा दाखला दिलेला आहे (प्रचलित पवित्र शास्त्र लिखाण, 18).

प्लिनी याने पत्र 10:96 मध्ये, ख्रिस्ती लोक येशूची परमेश्वर म्हणून उपासना करायचे व ते फार नैतिक होते, आणि ते प्रेमाचा उत्सव साजरे करायचे व ईश्वरीय रात्रीचे जेवण आयोजित करायचे या बद्दल उल्लेख केलेला आहे.

बाबेलच्या ताल्मूद (सणहेद्रीन 43अ) वल्हांडण सण पूर्वसंध्येला येशूला सुळावर चढविण्यात आले आणि येशूवर मंत्र तंत्रच्या वापराबद्दल आणि ज्यू लोकांना धर्मत्याग करण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या आरोपाबद्दल दुजोरा दिला आहे.

सामोसटा चा लुसिअन दुसरा शतकातील ग्रीक लेखक होता त्याने मान्य केले आहे कि ख्रिस्ती लोक येशूची उपासना करायचे, त्यांनी लोकांना नवीन शिकवण दिली आणि त्यांना त्यासाठी वधस्तंभावर खिळल्या गेले. येशूच्या शिकवणी मध्ये श्रद्धाळूंची बंधुता, धर्मांतराचे महत्त्व आणि इतर दैवतांची पूजा नाकारण्याचे महत्त्व समाविष्ट आहे. ख्रिस्तीलोक येशूचा कायद्यानुसार जगले ते स्वतःला अमर असल्याचे मानायचे, आणि मृत्यूबद्दल तिरस्कार, भौतिक वस्तूंचा त्याग आणि भक्ती मध्ये स्वतःला लीन ठेवणे त्यांचे वैशिष्ट्ये होती.

मारा बार-सेरापिअन पुष्टी करतो कि येशू ला बुद्धिमान व सद्गुणी मनुष्य म्हणून मानल्या जात होते आणि बरेच लोक त्याला इस्राएलचा राजा असल्याचे मानत होते आणि त्याला यहूदी लोकांनी ठार मारले, आणि त्याच्या अनुयायींच्या शिकवणी मध्ये येशूचे वास्तव्य सिद्ध होते.

नंतर आम्हा सर्वांकडे ईश्वरीय लेखन आहे ज्यात (सत्याची शिकवण (गॉस्पेल) , योहानाची शिकवण, थॉमस चे गॉस्पेल, पुनरुत्थान, इ वर प्रबंध) समावेश होतो आणि त्या सर्वामध्ये येशूचा उल्लेख आहे.

वास्तविक पाहता आपण गैर ख्रिस्ती स्त्रोतापासून सुवार्ताची जवळजवळ पुनर्रचना करू शकतो.

येशू ख्रिस्त (जोसीफस) म्हटले गेले आहे त्याने "जादू," करून इस्राएलला नवीन शिकवणी दिली, आणि आणि त्यांना यहूदीयात वल्हांडण सणाच्या रोजी जुदिया (तचीतूस) येथे सुळावर लटकविण्यात आले (बाबेलचे ताल्मूद), पण त्याने आपण ईश्वर असल्याचे सांगून लवकरच परत येऊ असे देखील सांगितले (एलीझार), ज्यावर त्याच्या अनुयायांचा पूर्ण विश्वास होता आणि त्याची ईश्वर म्हणून आराधना केली (प्लिनी, धाकटा).

येशूच्या अस्तित्वाबद्दल जबरदस्त पुरावा, धर्मनिरपेक्ष आणि बायबलसंबंधी इतिहासामध्ये आहे. येशुच्या अस्तित्वाबद्दल कदाचित सर्वात मोठी पुरावा म्हणजे पहिल्या शतकात हजारो ज्या मध्ये बारा प्रेषितांचा समावेश होतो ते येशूसाठी शहीद म्हणून त्यांचे जीवन अर्पण करण्यास तयार होते. लोक त्यांना जे सत्य आहे असे वाटते त्यासाठी ते बलिदान करतील , पण जे खोटे असल्याचे माहित आहे त्यासाठी कोणी मरणार नाही.

Englishमराठीच्या पहिल्या पानावर वापस या

येशू खरोखर अस्तित्वात होता का? येशू ख्रिस्ताच्या अस्तित्वाबद्दल कोणताही ऐतिहासिक पुरावा आहे का?
© Copyright Got Questions Ministries