बायबल निराशेविषयी काय म्हणते? ख्रिस्ती व्यक्ती निराशेवर कसा विजय मिळवू शकते?


प्रश्नः बायबल निराशेविषयी काय म्हणते? ख्रिस्ती व्यक्ती निराशेवर कसा विजय मिळवू शकते?

उत्तरः
निराशा किंवा हताशा ही सार्वत्रिक परिस्थिती आहे, जिचा लाखो लोकांवर प्रभाव आहे, ख्रिस्ती आणि गैरख्रिस्ती दोघांवरही. निराशेमुळे गांजलेले लोक तीव्र दुःख, क्रोध, लाचारी, थकवा, आणि इतर अनेक प्रकारच्या लक्षणांचा अनुभव करू शकतात. त्यांना निरूपयोगी असल्यासारखे वाटू शकते आणि आत्महत्येचा विचारही येतो, अनेक गोष्टींची व ज्या लोकांसोबत ते एकदा आनंदाचा अनुभव करीत त्यांच्यात त्यांची रूचि नष्ट होते. निराशा ही अनेकदा जीवनातील परिस्थितींमुळे उत्पन्न होते, जसे नोकरी जाणे, प्रिय व्यक्तीचा मृत्यू, घटस्फोट, अथवा शोषण अथवा हीनभावनेसारख्या मानसिक समस्या.

बायबल आम्हास सांगते की आम्ही आनंद व स्तुती यांनी परिपूर्ण असावे (फिलिप्पैकरांस पत्र 4:4; रोमकरांस पत्र 15:11), म्हणून स्पष्टपणे आमच्यासाठी देवाचा हेतू हा आहे की आपण आनंदमय जीवन घालवावे. परिस्थितीजन्य निराशेमुळे दुःख सोसणार्या व्यक्तीसाठी हे सोपे नसते, पण प्रार्थना, बायबल अभ्यास आणि लागूकरण, मदत गट, विश्वासणार्यांसोबत सहभागित्व, पापांगिकार, क्षमा, आणि सल्ला यांच्या देवाने दिलेल्या दानांद्वारे त्याचा उपाय करता येतो. आपण स्वतःमध्ये तल्लीन न राहण्याचा जाणूनबूझून प्रयत्न करावा, तर आपले लक्ष बाहेरच्या गोष्टींकडे लावावे. जेव्हा निराशेने गांजलेले लोक आपले लक्ष स्वतःवरून काढून ख्रिस्ताकडे व इतरांकडे लावतात तेव्हा बहुधा निराशेच्या भावना दूर घालविता येतात.

चिकित्सीय निराशा ही शारीरिक दशा आहे जिचे निदान डाॅक्टराद्वारे केले जावे. त्याचे कारण जीवनाची दुर्दैवी परिस्थिती नसेल, तसेच आपल्या स्वतःच्या इच्छेने ती लक्षणे कमी करता येत नसतील. ख्रिस्ती समुदायातील काही लोक जो विश्वास धरतात त्या विपरीत, चिकित्सीय निराशा ही नेहमीच पापामुळे उत्पन्न झालेली नसते. कधी कधी निराशेचे कारण शारीरिक अस्वस्थता असू शकते जिचा उपचार औषधाने आणि/अथवा सल्ल्याद्वारे करण्याची गरज असते. अर्थात, देव कुठलाही रोग अथवा अस्वस्थता दूर करू शकतो. तथापि, काही बाबतींत, निराशेसाठी डाॅक्टराची भेट घेणे इजेसाठी डाॅक्टराची भेट घेण्यापेक्षा वेगळे नसते.

नैराश्याने पीडित असलेले लोक त्यांची निराशा कमी करण्यासाठी काही गोष्टी करू शकतात. त्यांनी ह्या गोष्टीची खात्री करून घ्यावी की त्यांनी देवाच्या वचनात राहावे, ते आवडत नसतांनाही. भावना चुकीच्या मार्गास नेऊ शकतात, पण देवाचे वचन दृढ राहते व कधीही बदलत नाही. आपण देवाठायी दृढ विश्वास राखला पाहिजे आणि परीक्षा व संकटातून जात असतांना त्याला आणखीच धरून राहिले पाहिजे. बायबल आम्हास सांगते की देव आमच्या जीवनांत कधीही अशा परीक्षांची परवानगी देणार नाही ज्या हाताळणे आम्हास कठीण जाते (करिंथकरांस 1 ले पत्र 10:13). जरी निराश दशेत असणे पाप नाही, तरीही क्लेशाप्रत प्रतिक्रियेसाठी व्यक्ती जबाबदार असतो, जरूरी व्यावसायिक मदत प्राप्त करण्याचा यात समावेश आहे. "म्हणून, त्याचे नांव पत्करणाÚया — ओठांचे फळ — असा स्तुतीचा यज्ञ आपण त्याच्याद्वारे देवाला नित्य अर्पण करावा" (इब्री लोकांस पत्र 13:15).

English
मराठीच्या पहिल्या पानावर वापस या
बायबल निराशेविषयी काय म्हणते? ख्रिस्ती व्यक्ती निराशेवर कसा विजय मिळवू शकते?