settings icon
share icon
प्रश्नः

इतके ख्रिस्ती सम्प्रदाय का आहेत?

उत्तरः


या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी, आपण सर्वप्रथम ख्रिस्ताच्या मंडळीतील सम्प्रदाय आणि गैरख्रिस्ती पंथ व खोटे धर्म यांत फरक पाहिला पाहिजे. प्रेस्बिटेरियन्स आणि लुथरन्स ख्रिस्ती सम्प्रदायाची उदाहरणे आहेत. माॅर्मोन्स आणि यहोवाचे साक्षी ही खोट्या पंथांची (स्वतः ख्रिस्ती असल्याचा दावा करणारे पण ख्रिस्ती विश्वासाची एक किंवा त्यापेक्षा अधिक तत्वे नाकारणारे गट). इस्लाम आणि बौद्ध हे पूर्णपणे वेगळे धर्म आहेत.

ख्रिस्ती विश्वासांतर्गत सम्प्रदायांचा उदय प्रोटेस्टन्ट सुधारणेपासून सुरू झाला, 16व्या शतकांदरम्यान रोमन कैथेलिक मंडळीत ”सुधारणा“ करण्यासाठी सुरू करण्यात आलेले आंदोलन, ज्या मधून प्रोटेस्टंटवादाचे चार मुख्य विभाग किंवा परंपरा उदयास आल्या: लूथरन, रिफॉर्म्ड, एनाबॅप्टिस्ट, आणि एंग्लिकन. या चार मधून, मागील शतकांत इतर सम्प्रदायांचा उदय झाला.

लूथरन सम्प्रदायाचे नाव मार्टिन लूथर आणि त्यांच्या शिकवणीच्या आधारे ठेवण्यात आले. मेथडिस्ट विश्वासणार्‍याना त्यांचे नाव यासाठी मिळाले कारण त्यांचा संस्थापक, जॉन वेस्ली हा आत्मिक वाढीसाठी वेगवेगळ्या ”पद्धती“ शोधून काढण्यासाठी सुप्रसिद्ध होता. प्रेस्बिटेरियन्सना मंडळीच्या पुढारीपणावर त्यांच्या मतावरून नाव मिळाले - वडिलासाठी ग्रीक शब्द आहे प्रेस्बिटेरास. बॅप्टिस्ट विश्वासणार्‍यास हे नाव मिळाले कारण त्यांनी नेहमीच बापतिस्म्याच्या महत्वावर जोर दिला आहे. प्रत्येक सम्प्रदायाची शिकवण इतरांपेक्षा थोडी फार वेगळी आहे किंवा त्यात काही गोष्टींवर जोर देण्यात आला आहे, जसे बापतिस्म्याची पद्धत, सर्वांस प्रभूभोजनाची उपलब्धता, केवळ त्यांस ज्यांची साक्ष मंडळीचे पुढारी सत्यापित करू शकतात, परमेश्वराचे सार्वभौमत्व या विपरीत तारणाच्या बाबतीत स्वतंत्र इच्छा, इस्त्राएल आणि मंडळीचे भविष्य, क्लेशकाळापूर्वी अथवा क्लेशकाळानंतर मंडळीचे उचलले जाणे, आधुनिक युगात ”चिन्ह“ कृपादानांचे अस्तित्व, इत्यादी. या विभाजनांचा मुद्दा प्रभू आणि तारणारा म्हणून ख्रिस्त नाही, तर धार्मिक, थोडे फार दोष असलेल्या, परमेश्वराच्या आदरासाठी प्रयत्न करणार्‍या आणि आपल्या विवेका बुद्धीनुसार तसेच त्याच्या वचनाच्या त्यांच्या समजानुसार सैद्धांतिक शुद्धता राखून ठेवण्याचा प्रयत्न करणार्‍या विश्वासणार्‍याचा मतांमध्ये प्रामाणिक भिन्नता हा आहे.

आज अनेक आणि विविध सम्प्रदाय आहे. वर उल्लेखलेल्या मूळ ”मुख्य“ सम्प्रदायांच्या असंख्य शाखा उदयास आल्या आहेत, जसे असेम्ब्लीज ऑफ गाॅड, ख्रिश्चन आणि मिशनरी अलायन्स, नाजरीन, इव्हेन्जिलिकल फ्री, स्वतंत्र बायबल मंडळ्या, आणि इतर. काही डिनॉमिनेशन्स थोड्या फार सैद्धांतिक फरकावर जोर देतात, पण बरेचदा ते ख्रिस्ती विश्वासणार्‍याच्या वेगवेगळ्या आवडीनुसार व पसंतीनुसार उपासनेच्या वेगवेगळ्या शैली मांडतात. पण चूक करू नका: विश्वासणारे या नात्याने, आम्हास विश्वासाच्या मुख्य बाबींवर एकमत असले पाहिजे, पण त्या पलीकडे सामुहिक वातावरणात ख्रिस्ती लोकांनी कशी उपासना करावी यात अनेक भाग आहेत. या भागामुळेच ख्रिस्ती विश्वासाच्या वेगवेगळ्या आवडी उत्पन्न झाले आहेत. युगांडा येथील प्रेस्बिटेरियन मंडळी मंडळीची उपासनेची शैली कोलोरॅडो येथील प्रेस्बिटेरियन मंडळीच्या उपासनाशैलीपेक्षा बरीच भिन्न असेल, पण त्यांचा सैद्धांतिक पक्ष, बहुतांशी समान असेल. विविधता ही चांगली गोष्ट आहे, पण कलह नाही.जर दोन मंडळ्या सैद्धांतिकदृष्ट्या वचनाविषयी वाद घालत असतील आणि संवाद साधत असतील, तर ते आवश्यक आहे. अशाप्रकारचे ”तिखे तिख्याला पाणीदार करते“ (नीतिसूत्रे 27:17) सगळ्यांसाठी लाभदायक आहे. जर त्यांच्यात शैली आणि स्वरूपाविषयी मतभेद असेल, तर वेगळे राहणे चांगले. तरी अशाप्रकारचा वेगळेपणा एकमेकावर प्रीती करण्याची ख्रिस्ती जवाबदारी दूर करीत नाही (1 योहान 4:11-12) आणि शेवटी ख्रिस्तामध्ये एक म्हणून त्यांस जोडतो (योहान 17:21-22).

ख्रिस्ती सम्प्रदायांचा नकारात्मक पक्ष:

डिनाॅमिनेशलिजम अथवा सम्प्रदायवादाच्या कमीत कमी दोन मुख्य समस्या दिसून येतात. सर्वप्रथम, पवित्र शास्त्रात कोठेही सम्प्रदायवादाचा आदेश दिलेला नाही; उलटपक्षी आदेश ऐक्य आणि सहसंबंधासाठी आहे. अशाप्रकारे, दुसरी समस्या ही आहे की इतिहास आम्हाला सांगतो की सम्प्रदायवाद संघर्षाचा आणि कलहाचा परिणाम आहे किंवा त्याद्वारे उत्पन्न आहे जो विभाजनाकडे आणि विभक्ततेकडे येतो. येशूने आम्हाला सांगितले की ज्या घरात फूट असते ते उभे राहू शकत नाही. हा सामान्य सिद्धांत मंडळीस लागू करता येतो आणि केला पाहिजे. याचे एक उदाहरण आपण करिंथ येथील मंडळीत पाहतो जी फूट आणि विभक्ततेच्या समस्येला झुंज देत होती. काही लोक होते ज्यांना असे वाटत होते की त्यांनी पौलाचे अनुसरण केले पाहिजे आणि काही असे होते ज्यांना वाटत होते की त्यांनी अप्पोलासाच्या शिकवणीचे पालन केले पाहिजे, 1 करिंथ. 1:12, “माझे म्हणणे असे आहे की, तुमच्यापैकी प्रत्येक जण “मी पौलाचा,” “मी अपुल्लोसाचा,” “मी केफाचा” आणि “मी ख्रिस्ताचा” आहे, असे म्हणतो.” यावरून आपणास असे कळून येते की सम्प्रदायांविषयी किंवा मंडळीत फूट पाडणार्‍या आणि विभाजन करणार्‍या इतर गोष्टींविषयी पौलाचे काय मत होते. पण आपण पुढे 13व्या वचनात पाहू या, पौल एक अत्यंत मर्मभेदक प्रश्न विचारतो, “ख्रिस्ताचे असे विभाग झाले आहेत काय? पौलाला तुमच्यासाठी वधस्तंभावर खिळले होते काय? पौलाच्या नावात तुमचा बाप्तिस्मा झाला होता काय?” याद्वारे स्पष्ट होते की पौलास कसे वाटते. तो (पौल) ख्रिस्त नाही. त्याला वधस्तंभावर खिडण्यात आले नाही, आणि त्याच्या संदेश मंडळीत फूट पाडणारा नाही किंवा ख्रिस्ताऐवजी एखाद्याला पौलाची उपासना करण्यास प्रेरित करणारा कधीही नव्हता. स्पष्टपणे, पौलानुसार, एकच मंडळी आणि विश्वासणार्‍याचा एकच देह आहे आणि जे काही यापेक्षा वेगळे आहे, ते मंडळीस दुर्बळ करते आणि त्या फूट पाडते (वचन 17 देखील पाहा). 3:4 मध्ये असे म्हणून तो आपले बोलणे दृढ करतो की जे कोणी म्हणतात की ते पौलाचे आहेत किंवा अप्पुलोसाचे आहेते ते दैहिक आहेत.

सम्प्रदायवादाकडे आणि त्याच्या अगदी अलीकडील इतिहासाकडे पाहत असतांना, आज आम्हाला ज्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे, त्या आहेत:

1. सम्प्रदाय पवित्र शास्त्राच्या व्याख्यासंबंधाने मतभेदावर आधारित आहेत. याचे एक उदाहरण म्हणजे बापतिस्म्याचा अर्थ आणि हेतू असेल. बापतिस्मा ही तारणाची गरज आहे का अथवा ती तारणाच्या प्रक्रियेचे प्रतीक आहे का? या समस्येचा दोन्ही पक्षास सम्प्रदाय आहे. खरे म्हणजे, बापतिस्मा - त्याचा अर्थ, त्याची पद्धत, कोण घेऊ शकते इत्यादी - मंडळीचा विभाजनाचा आणि नवीन सम्प्रदायांचा निर्मितीचा केंद्रिय विषय आहे.

2. पवित्र शास्त्राच्या व्याख्येविषयी मतभेदास व्यक्तिगतरित्या स्वीकारले जाते आणि तो वादाचा मुद्दा बनतो. यावरून विवाद उत्पन्न होतात जे मंडळीच्या साक्षीस बरीच हानि पोहोचवू शकतात आणि त्यांनी हानि पोहोचवली आहे.

3. मंडळीस तिच्या अंतर्गत असलेले मतभेज सोडविण्याबाबत समर्थ असले पाहिजे, पण पुन्हा एकदा, इतिहास आम्हाला सांगतो की असे घडत नाही. आज संचार माध्यम आमच्यातील मतभेदांचा उपयोग हे दाखविण्यासाठी आमच्याविरूद्ध करतो की आम्ही विचार आणि हेतूंबाबत एकजूट नाही.

4. सम्प्रदायांचा उल्लेख स्वतःच्या स्वार्थासाठी मनुष्य करतो. आज असे सम्प्रदाय आहेत जे आत्मविनाशाच्या स्थितीत आहेत कारण अशा लोकांनी त्यास धर्मत्यागाकडे नेले आहे जे त्यांच्या व्यक्तिगत योजना राबवीत आहेत.

5. एकतेचे मोल हरविलेल्या जगासाठी राज्याचा प्रसार करण्याकरिता आपल्या कृपादानांचा व साधनसामुग्रीचा उपयोग करण्याच्या योग्यतेत आहेत. हे सम्प्रदायवादाद्वारे निर्माण झालेल्या विभाजनांचा विपरीत चालते.

विश्वासणार्‍याने काय केले पाहिजे? आपण सम्प्रदायाकडे दुर्लक्ष करावे काय? आपण मंडळीस जाण्याचे टाळावे का आणि आपल्या स्वतःच्या घरात उपासना करावी का? दोन्ही प्रश्नांचे उत्तर नाही असे आहे. आपण विश्वासणार्‍याच्या अशा मंडळीचा शोध घेतला पाहिजे जेथे ख्रिस्ताचे शुभवर्तमान गाजविले जाते, जेथे आपण व्यक्तिगतरित्या प्रभूसोबत वैय्यक्तिक नाते स्थापन करू शकतो, जेथे आपण बायबलआधारित सेवाकार्यात सहभागी होऊ शकतो ज्या सुवार्तेचा प्रसार करीत आहेत आणि परमेश्वराचे गौरव करीत आहे. चर्च महत्वाचे आहे, आणि सर्व विश्वासणार्‍यास गरज आहे की त्यांनी अशा मंडळीत जावे जी वरील कसौटीस खरी उतरते. आम्हास अशा संबंधांची गरज आहे जे केवळ विश्वासणार्‍याचा मंडळीत आढळून येतात, आम्हाला अशा मदतीची गरज आहे जी केवळ मंडळी देऊ शकते, आणि आम्हाला परमेश्वराची सेवा समुदायात तसेच व्यक्तिगतरित्या करण्याची गरज आहे. ख्रिस्ताच्या संबंधीआधारे आणि मंडळीत समाजाची सेवा किती चांगल्याप्रकारे करीत आहे या आधारे मंडळीची निवड करावी. अशा मंडळीची निवड करावी जेथे पाळक न भिता सुवार्तेचा प्रचार करतो आणि तसे करण्यास त्यास प्रोत्साहन दिले जाते. विश्वासणारे या नात्याने, काही मूळ सिद्धांत आहे ज्यावर आम्ही विश्वास ठेविला पाहिजे, पण त्यापलीकडे असा एक भाग आहे जो यावर अवलंबून आहे की आम्ही कशी सेवा आणि उपासना करू शकतो; हाच भाग सम्प्रदायांसाठी एकमेव उत्तम कारण आहे. ही विविधता आहे फूट नाही. पहली आम्हास ख्रिस्ताठायी व्यक्ती होण्याची संधी देते आणि दुसरे विभाजन करते आणि नाश करते.

English



मराठीच्या पहिल्या पानावर वापस या

इतके ख्रिस्ती सम्प्रदाय का आहेत?
© Copyright Got Questions Ministries