settings icon
share icon
प्रश्नः

भूतग्रस्त –सैतानी ताबा हयाविषयी पवित्र शास्त्र काय सांगते?

उत्तरः


भूतांद्वारे ग्रस्त किवा प्रभावित झालेल्या लोकांची काही उदाहरणे पवित्र शास्त्र देते. ह्या उदाहरणांवरून सैतानी प्रभावाची काही लक्षणे आपण शोधू शकतो आणि भूत कोणएका व्यक्तीस कसे ताब्यात आणते ह्याचे यथार्थ ज्ञान प्राप्त करू शकतो. येथे पवित्र शास्त्र विषयक काही उतारे आहेत. मतय 9:23-33; 12:22; 27:18; मार्क 5:1-23; 7:26-30; लुक 4:33-36; लुक 22:3; प्रेषित 16:16-18. हयापैकी काही उतार्‍यात भूतबाधा शाररिक आजारपण आहे, जसे बोलण्यात असमर्थता, फेफर्‍याची लक्षणे, आंधळेपणा ई. इतर बाबतीत हे त्या व्यक्तिला कुकर्म करण्यास कारणीभूत होते, यहुदाचे उदाहरण मुख्य आहे. प्रेषित 16:16-18 मध्ये आत्म्याने एका गुलाम मुलीला तिच्यास्वतहाच्या ज्ञानापलीकडे गोष्टी ओळखण्याचे काही सामर्थ्य दिले. गरसेकरांच्या देशातील भूतग्रस्त मनुष्य ज्याला असंख्य भुतानी ग्रासले होते त्याला अति मानुषी किवा अमानवी ताकत होती, आणि तो नग्न असा कबरांमध्ये राहत होता. शौल राज्याने देवाविरुद्ध बंड केल्यानंतर एका दुष्ट आत्म्याद्वारे त्याचा छळ झाला (1 शमूवेल 16:14-15; 18:10-11; 19:9-10 व त्याच बरोबर खिन्न मनस्थितीचा स्पष्ट परिणाम आणि दाविदाला मारण्याची उत्कंठ इच्छा त्याच्यामध्ये दिसून आली.

अशाप्रकारे शाररिक आजारपण जे प्रत्यक्ष शरीर विज्ञान शास्त्र विषयक समस्येच्या माथी मारू शकत नाही, व्यक्तिमत्वात बदल उदा. खिन्नता व आक्रमकता, अमानवी ताकत, असभ्यता, समाज विघातक वर्तणूक आणि कदाचित माहिती वाटून घेण्याचे सामर्थ्य जे ओळखण्याचा एखाद्यापाशी नैसर्गिक मार्ग नाही, अशासारखे भूत ग्रस्ताची विस्तीर्ण नानाप्रकारची संभावणीय लक्षणे आहेत. ही नोंद करणे महत्वपूर्ण आहे की जवळजवळ सर्व नाही तरी ह्या गुणधर्मांची इतर स्पष्टीकरणे असू शकतात, म्हणून प्रत्येक खिन्न व्यक्तिला किवा फेफर्‍याच्या रूग्णाला भूतग्रस्त असा शिक्का न मारणे महत्वाचे आहे. दुसर्‍या बाजूला पाश्च्यात्य संस्कृतीमध्ये बहुतकरून लोकांच्या जीवनात सैतानी समावेश तितक्या गंभीर पणे घेतला जात नाही.

ह्या शाररिक व भावनासंबंधीच्या वैशिष्ट्यांशिवाय, एखादा सैतानी प्रभाव दाखविण्यासाठी आत्मिक गुणधर्मांकडे सुद्धा आपण पाहू शकतो. ह्यामध्ये क्षमेसाठी नाकार (2 करिंथ 2:10,11) आणि विशेषकरून येशू ख्रिस्तासंबंधी व त्याच्या प्रायश्चित्ताच्या कार्याविषयी खोट्या सिद्धांताचा प्रसार आणि त्यावर विश्वास ठेवणे ह्यांचा समावेश होवू शकतो. (2 करिंथ 11:3,4, 13-15; 1 तिमथ्य 4:1-5; 1 योहान 4:1-3).

ख्रिस्ती लोकांच्या जीवनात भूतांच्या समवेशासंबंधी प्रेषित पेत्र हा वस्तुस्थितीचे एक उदाहरण आहे, की सैतानाद्वारे एक विश्वासणारा प्रभावित होवू शकतो. (मत्तय 16:23). ख्रिस्ती लोक जे तीव्र सैतानी प्रभावाखाली आहेत त्यांचा "राक्षसी वृत्तीचे" असा काहीजण उल्लेख करतात, परंतू पवित्र शास्त्रात असे एकही उदाहरण नाही की ख्रिस्तात असलेला एक विश्वासणारा भुताद्वारे ग्रस्त झाला. पुष्कळ धर्मशास्त्राच्या ज्ञानी लोकांचा विश्वास आहे की, एक ख्रिस्ती व्यक्ती भूतग्रस्त होवू शकत नाही, कारण पवित्र आत्मा त्याव्यक्तीच्या आंत कायम वसतो. (2 करिंथ 1:22; 1 करिंथ 6:19 आणि देवाचा आत्मा भुतासोबत वस्ती करणार नाही.

एखादी व्यक्ती भूत ग्रस्त होण्यासाठी स्वतहाला काशी उघड करते हे तंतोतंतपणे संगितले गेले नाही. जर यहुदाची बाब एक प्रतींनिधी आहे, तर त्याने कूकर्मासाठी त्याचे हृदय उघडले-त्याच्या बाबतीत त्याच्या लोभमुळे ते घडले (योहान 12:6). म्हणून ते शक्य आहे की जर एखाद्याने काही सवयींच्या पापाद्वारे शासन करण्यासाठी त्याच्या हृदयाला मान्यता दिली तर भुताला प्रवेश करण्यासाठी ते एक आमंत्रण बनते. धर्मप्रचारकांच्या अंनुभवांवरून भूतग्रस्त होण्याचा संबंध अधर्मी मूर्त्यांची उपासना गूढ साहित्याची मालकी ह्यागोष्टींशीसुद्धा दिसून येतो. पवित्र शास्त वारंवार मूर्तिपूजेचा संबंध प्रत्यक्ष पूजेशी लावते (लेवीय 17:7; अनुवाद 32:17; स्तोत्र 106:37; 1 करिंथ 10:20). म्हणून हे आश्चर्य वाटण्यासारखे नसावे की मूर्तिपूजेसोबत गुंतवणूक भूतग्रस्त होण्याकडे घेऊन जाऊ शकते.

वरील आत्मिक उतार्‍यांचा आणि धर्म प्रचारकांच्या काही अनुभवांच्या आधारावर, आपण निर्णय घेऊ शकतो की काही पापांना स्वीकारून किवा पुजापद्धतीत समाविष्ट होवून (एक तर कळत किवा नकळत) पुष्कळ लोक भूतांच्या समवेशासाठी त्यांचे जीवन उघडतात. उदाहरणार्थ अनीतीमत्व, मादक पदार्थ –मद्यर्क ह्यांचा दुरुपयोग ज्यामुळे एखाद्याच्या देहभानाची स्थिती बदलते, बंड, कटुता आणि अलौकिक चिंतन ह्याबाबींचा समावेश होवू शकतो.

तेथे एक ज्यादा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. सैतान आणि त्याचा दुष्ट यजमान काहीच करू शकत नाही कारण प्रभू त्यांना तसे करण्याची मान्यता देत नाही. (ईयोब 1-2). ही बाब असल्यामुळे सैतान विचार करतो की तो त्याच्या स्वतहाचे उद्देश सिद्धीस नेट आहे, परंतू प्रत्यक्षात देवाचे चांगले उद्देश सिद्धीस जातात, जसे यहुदाच्या विश्वासघाताच्या बाबतीत घडले. काही लोक गूढ व सैतानी हालचालीसोबत हानी कारक मोह विकसित करतात, हा असमंजसपणा आहे आणि पवित्र शास्त्राला धरून नाही. जर आपण देवाचा पाठपुरावा केला, त्याच्या शस्त्र सामुग्रीसह स्वताची वस्त्रे परिधान केली आणि त्याच्या सामर्थ्यावर अवलंबून राहिलो (इफिस 6:10-18), तर दुष्टांपासून आपणास भीती बाळगण्यासारखे असे काहीही नाही, कारण देव सर्वांवर राज्य करतो.

Englishमराठीच्या पहिल्या पानावर वापस या

भूतग्रस्त –सैतानी ताबा हयाविषयी पवित्र शास्त्र काय सांगते? ते आज अजूनही शक्य आहे का? जर तसे आहे तर त्याची लक्षणे कोणती आहेत?
© Copyright Got Questions Ministries