settings icon
share icon
प्रश्नः

बायबल मरणाच्या शिक्षेविषयी/मृत्यूदंडाविषयी काय म्हणते?

उत्तरः


जुन्या करारात वेगवेगळ्या कृत्यांसाठी मृत्यूदंडाची आज्ञा देण्यात येत असे: खून (निर्गम 21:12), अपहरण (निर्गम 21:16), पशुगमन (निर्गम 21:19), व्यभिचार (लेवीय 20:10), समलैंगिकता (लेवीय 20:10), खोटा संदेष्टा असणे (अनुवाद 13:5), वेश्यागमन आणि बलात्कार (अनुवाद 22:4), आणि इतर अनेक अपराधांसाठी (2 शमुवेल 11:1-5, 14-17; 2 शमुवेल 12:13). तथापि, मृत्यूदंड ठरविण्यात आला असतांना देव बरेचदा दया दाखवीत असे. दावीदाने व्यभिचार आणि खून केला, तरीही देवाने त्याचा जीव घ्यावा असे म्हटले नाही (2 शमुवेल 11:1-5, 14-17; 2 शमुवेल 12:13). शेवटी, आम्ही करीत असलेल्या प्रत्येक पापाचा परिणाम मृत्यूदंड आहे, कारण पापाचे वेतन मरण आहे (रोमकरांस पत्र 6:23). देवाची स्तुती असो, देवाने आम्हाला दंड न देऊन आपली प्रीती प्रगट केली (रोमकरांस पत्र 5:8).

जेव्हा परूशी व्यभिचार करीत असतांना धरण्यात आलेल्या स्त्रीला घेऊन येशूजवळ आले आणि त्यांनी त्याला विचारले की तिला दगडमार करावा काय, तेव्हा येशूने उत्तर दिले, "तुम्हामध्ये जो निष्पाप असेल त्याने प्रथम तिच्यावर दगड टाकावा" (योहान 8:7). ह्या वचनाचा उपयोग हे दाखविण्यासाठी करू नये की येशूने सर्व परिस्थितींत मृत्यूदंडाचा अव्हेर केला. येशू केवळ परूशी लोकांचा ढांेगीपणा उघडकीस आणीत होता. परूशी येशूला जुन्या कराराच्या नियमाचे उल्लंघन करण्यासाठी फसविण्याचा प्रयत्न करीत होते; त्या स्त्रीला दगडमार करण्याची त्यांस खरोखर परवा नव्हती (व्यभिचारात धरण्यात आलेला पुरुष कोठे होता?) देवाने मृत्यूदंडाची शिक्षा ठरविली आहे: "जो कोणी मनुष्याचा रक्तपात करील त्याचा रक्तपात मनुष्याकडून होईल; कारण देवाने मनुष्य आपल्या प्रतिरूपाचा उत्पन्न केला आहे" (उत्पत्ती 9:6). काही उदाहरणांत येशूने मृत्यूदंडाच्या शिक्षेचे समर्थन केले असते. जेव्हा मृत्यूदंड देण्यात येणार होता तेव्हा येशूने कृपा प्रगट केली (योहान 8:1-11). प्रेषित पौलाने निश्चितच जेथे योग्य तेथे मृत्यूदंड ठरविण्याच्या सरकारच्या अधिकारास मान्य केले (रोमकरांस पत्र 13:1-7).

ख्रिस्ती व्यक्तीने मृत्यूदंडाकडे कोणत्या दृष्टीने पाहावे? पहिले, आपण हे लक्षात ठेविले पाहिजे की देवाने त्याच्या वचनात मृत्यूदंड ठरविला आहे; म्हणून, असा विचार करणे आमच्यासाठी उद्धटपणाचे होईल की आपण त्यापेक्षा अधिक उच्च आदर्श ठरवू शकतो. देवाजवळ कोणत्याही व्यक्तीपेक्षा अधिक सर्वाेच्च मानदंड आहे; तो सिद्ध आहे. हा मानदंड अथवा आदर्श केवळ आम्हास लागू होत नाही तर स्वतः त्यालाही लागू होतो. म्हणून, तो अमर्याद प्रीती करतो, आणि त्याच्याजवळ अमर्याद दया आहे. आपण हे सुद्धा पाहतो की त्याच्याजवळ अमर्याद क्रोध आहे, आणि त्या सर्वांचा पूर्ण समतोल राखण्यात आला आहे.

दुसरे, आपण हे जाणले पाहिजे की देवाने शासनास हे ठरविण्याचा अधिकार दिला आहे की मृत्यूदंड केव्हा दिला जावा (उत्पत्ती 9:6; रोमकरांस पत्र 13:1-7). असे प्रतिपादन करणे बायबलविरुद्ध आहे की देव सर्व गोष्टींत मृत्यूदंडाचा विरुद्ध आहे. मृत्यूदंड ठरविण्यात आल्यावर ख्रिस्ती लोकांनी आनंदित होऊ नये, पण त्याचवेळी ख्रिस्ती लोकांनी अत्यंत भयंकर अपराध करणार्यास मृत्यूदंड देण्याच्या शासनाच्या हक्काविरुद्ध लढता कामा नये.

English



मराठीच्या पहिल्या पानावर वापस या

बायबल मरणाच्या शिक्षेविषयी/मृत्यूदंडाविषयी काय म्हणते?
© Copyright Got Questions Ministries