settings icon
share icon
प्रश्नः

प्रभूचा दिवस म्हणजे काय?

उत्तरः


“प्रभूचा दिवस” या वाक्यप्रचार सामान्यतः इतिहासाच्या शेवटी घडणार्‍या घटनांशी साम्य राखतो (यशया 7:18-25) आणि बहुतेकदा त्याचा “तो दिवस” या शब्दाशी जवळचा संबंध असतो. हे वाक्यप्रचार समजून घेण्याची एक महत्त्वाची किल्ली म्हणजे हे लक्षात ठेवणे आहे की असा कालावधी ज्यात देव इतिहासात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या, वैय्यक्तिकरित्या हस्तक्षेप करतो, त्याच्या योजनाचा विशिष्ट पैलू साध्य करण्यासाठी.

अनेक लोक प्रभूच्या दिवसाच्या संबंध एका कालावधीशी किंवा विशिष्ट दिवसाशी जोडतात जो तेव्हा घडून येईल जेव्हा देवाच्या इच्छेनुसार आणि त्याच्या जगासाठी आणि मानवजातीसाठी त्याचा हेतू पूर्ण होईल. काही विद्वानांचा असा विश्वास आहे की प्रभूचा दिवस हा केवळ एका दिवसाचा कालावधी नसेल, तर अधिक दीर्घकाळचा असेल - असा कालावधी जेव्हा ख्रिस्त संपूर्ण मानवजातीच्या शाश्वत अवस्थेच्या तयारीसाठी स्वर्ग आणि पृथ्वीस शुद्ध करण्यापूर्वी संपूर्ण जगावर राज्य करेल. इतर विद्वानांचा असा विश्वास आहे की आपल्या विश्वासणाÚयांची सुटका करण्यासाठी आणि अविश्वासूंना अनंतकाळच्या शिक्षेसाठी पाठविण्यासाठी जेव्हा ख्रिस्त पृथ्वीवर परत येईल तेव्हा प्रभूचा दिवस ही तात्काळ घडणारी घटना असेल.

जुन्या करारात “प्रभूचा दिवस” हा शब्दप्रयोग अनेकदा वापरला जातो (उदा. यशया 2:12; 13:6,9; यहेजकेल 13:5, 30:3; योएल 1:15, 2:1,11,31; 3:14; आमोस 5:18,20; ओबद्या 15; सफन्या 1:7,14; जखर्‍या 14:1; मलाखी 4:5) आणि नवीन करारात कित्येकदा (उदा. प्रेषितांची कृत्ये 2:20; 1 करिंथ 5:5; 2 करिंथ 1:14; 1 थेस्सल 5:2; 2 थेस्सल 2:2; 2 पेत्र 3:10). याचा इतर परिच्छेदांमध्ये देखील उल्लेख करण्यात आला आहे (प्रकटीकरण 6:17; 16:14).

प्रभूच्या दिवसाचे वर्णन करणारे जुन्या कराराच्या परिच्छेदांमध्ये बहुदा निकटतेची, जवळची आणि अपेक्षेची भावना व्यक्त केली जाते: “विलाप करा कारण प्रभूचा दिवस जवळ आहे!” (यशया 13:6); “कारण दिवस समीप आला आहे; परमेश्वराचा दिवस येऊन ठेपला आहे” (यहेजकेल 30:3); “देशात राहणारे सर्व थरथर कापोत, कारण, परमेश्वराचा दिवस येत आहे, तो येऊन ठेपला आहे” (योएल 2:1); “लोकांच्या झुंडी, निर्णयाच्या खोर्‍यात लोकांच्या झुंडी आहेत. कारण निर्णयाच्या खोर्‍यात परमेश्वराचा दिवस येऊन ठेपला आहे” (योएल 3:14); “प्रभू परमेश्वरापुढे तुम्ही मौन धरून राहा! कारण परमेश्वराचा दिवस येऊन ठेपला आहे” (सफन्या 1:7). याचे कारण हे आहे की प्रभूच्या दिवसाचा उल्लेख करणारे जुन्या कराराचे परिच्छेद जवळच्या आणि दूरच्या परिपूर्णतेविषयी सांगतात, जसे जुन्या करारातील बहुतेक भविष्यवाणींविषयी आहे. जुन्या करारातील काही परिच्छेद जे प्रभूच्या दिवसाचा उल्लेख करतात, ते ऐतिहासिक न्यायदंडाचे वर्णन करतात जो काही अर्थाने आधीच पूर्ण झाला आहे (यशया 13:6-22; यहेजकेल 30:2-19; योएल 1:15, 3:14; अमोस 5:18-20; सपन्याह 1:14-18), ती इतर त्या ईश्वरीय न्यायाचा उल्लेख करतात जो युगाच्या शेवटी घडून येईल (योएल 2:30-32; जखर्‍या 14:1; मलाखी 4:1,5).

नवीन करारामध्ये त्यास “क्रोधाचा दिवस”, “सूड घेण्याचा दिवस” आणि “सर्वसमर्थ देवाचा मोठा दिवस” म्हटले आहे (प्रकटीकरण 16:14) आणि अद्याप भविष्यात पूर्ण होणार्‍या घटनेचा उल्लेख करतो जेव्हा अविश्वासू इस्राएलांवर (यशया 22; यिर्मया 30:1-17; योएल 1-2; आमोस 5; सफन्या 1) आणि अविश्वासू जगावर (यहेज्केल 38-39; जखर्‍या 14) जेव्हा देवाचा क्रोध ओतला जाईल. पवित्र शास्त्र हे दाखविते की “प्रभूचा दिवस” रात्रीच्या चोराप्रमाणे येईल (सफन्या 1:14-15; 2 थेस्सल 2:2), आणि म्हणून ख्रिस्ती लोकांनी जागृत आणि कोणत्याही क्षणी ख्रिस्ताच्या आगमनासाठी तयार असले पाहिजे.

हा न्यायाचा काळ असण्याबरोबरच, तारणाचीही वेळ असेल कारण देव इस्राएलच्या उर्वरित लोकांचा बचाव करील, आणि “सर्व इस्राएल लोकांचे तारण होईल” हे त्याचे अभिवचन पूर्ण होईल (रोम 11:26), त्यांच्या पापांची क्षमा केली जाईल आणि त्याच्या निवडलेल्या लोकांस तो त्या देशात पुन्न्हा स्थापित करील ज्याचे अभिवचन त्याने अब्राहामाला दिले होते (यशया 10:27; यिर्मया 30:19-31, 40; मीखा 4; जखर्‍या 13). प्रभूच्या दिवसाचा शेवटचा निकाल असा होईल की “त्या दिवशी लोकांचा उन्मत्तपणा भंग पावेल. मनुष्यांचा गर्व उतरेल; आणि परमेश्वरच काय तो उच्च स्थानी विराजेल” (यशया 2:17). प्रभूच्या दिवसाविषयीच्या भविष्यवाण्यांची अंतिम किंवा अंतिम पूर्तता इतिहासाच्या शेवटी होईल जेव्हा देव, विलक्षण सामथ्र्याने, वाईटाला शिक्षा करेल आणि त्याची सर्व अभिवचनने पूर्ण करेल.

Englishमराठीच्या पहिल्या पानावर वापस या

प्रभूचा दिवस म्हणजे काय?
© Copyright Got Questions Ministries