खोट्या संप्रदायाची अथवा पंथाची व्याख्या?


प्रश्नः खोट्या संप्रदायाची अथवा पंथाची व्याख्या?

उत्तरः
जेव्हा लोक कल्ट अथवा संप्रदायाची हा शब्द ऐकतात, तेव्हा ते बरेचदा अशा गटाचा विचार करतात जो सैतानाची उपासना करतो, पशुंचे बलिदान करतो, अथवा, दुष्ट, विचित्र आणि मूर्तिपूजक कर्मकांडात भाग घेतो. तथापि, खरे म्हणजे, खोटा संप्रदाय क्वचितच अशा गोष्टींत भाग घेतो. वस्तुतः, व्यापक अर्थाने, खोटा संप्रदाय, विशिष्ट विधी व प्रथांचे पालन करणारी केवळ एक धार्मिक संस्था होय.

सामान्यतः, जरी, कल्ट अथवा संप्रदायाची थोडक्यात व्याख्या केलेली आहे, आणि हा शब्द एका अपरंपरागत पंथाचा उल्लेख करतो ज्याचे सदस्य धर्माच्या मूळ शिकवणीचा विपर्यास करतात. ख्रिस्ती संदर्भात, संप्रदायाची व्याख्या, निश्चितपणे, आहे, "धार्मिक गट जो बायबलच्या सत्याच्या एका किंवा अधिक मूलभूत गोष्टींचा नाकार करतो." खोटा संप्रदाय अथवा पंथ असा गट आहे जो असे सिद्धांत शिकवितो ज्यावर, जर विश्वास ठेवला, तर तो त्या व्यक्तीस तारण न पावलेल्या दशेत ठेवील. संप्रदाय दावा करतो की तो धर्माचा भाग आहे, तरीही त्या धर्माच्या आवश्यक सत्याचा (सत्यांचा) नाकार करतो. म्हणून, ख्रिस्ती संप्रदाय अथवा पंथ ख्रिस्ती असण्याचा दावा करीत असतांनाही ख्रिस्ती धर्माच्या एका किंवा अधिक मूलभूत सत्यांचा नाकार करील.

खिस्ती कल्ट अथवा पंथसंप्रदायाच्या दोन अत्यंत सामान्य शिकवणी ह्या आहेत की येशू देव नव्हता आणि तारण केवळ विश्वासाद्वारे नाही. ख्रिस्ताच्या देवत्वाच्या नाकाराचा परिणाम ह्या शिकवणीत आहे की तारण हे केवळ आमच्या कार्यांद्वारे साध्य करता येते. मंडळीच्या प्रारंभीच्या दिवसांत प्रेषितांनी संप्रदायांस तोंड दिले: उदाहरणार्थ, योहानाचे 1 ले पत्र 4:1-3 या वचनांत योहान ज्ञानवादास अर्थात नाॅस्टिसिझमला संबोधित करतो. परमेश्वरी सिद्धांतासाठी योहानाची लिटमसची चाचणी होती "येशू ख्रिस्त देहाने आला" (वचन 2) — ज्ञानवादी पाखंडी शिकवणीचे प्रत्यक्ष खंडन (तुलना करा योहानाचे 2 रे पत्र 1:7).

आजच्या दोन सर्वात प्रसिद्ध संप्रदायाची उदाहरणे आहेत यहोवाचे साक्षी आणि मोर्मोन्स. दोन्ही गट ख्रिस्ती असल्याचे प्रतिपादन करतात, तरी दोन्ही ख्रिस्ताच्या देवत्वाचा आणि केवळ विश्वासाद्वारे तारणाचा नाकार करतात. यहोवाचे साक्षी आणि मोर्मोन्स अशा अनेक गोष्टींवर विश्वास ठेवितात ज्या अशा गोष्टींशी सहमत आणि समान आहेत ज्यांची बायबल शिकवण देते. तथापि, ते ख्रिस्ताच्या देवत्वाचा नाकार करतात आणि कार्यांद्वारे तारणाचा प्रचार करतात ही गोष्ट त्यांस संप्रदाय अथवा कल्ट ठरविते. अनेक यहोवाचे साक्षी, मोर्मोन्स, आणि इतर संप्रदायाचे सदस्य सदाचारी लोक आहेत जे खरोखर विश्वास ठेवितात की ते सत्याचे पालन करीत आहेत. ख्रिस्ती म्हणून आमची आशा आणि प्रार्थना ही असली पाहिजे की संप्रदायांत सहभागी असलेल्यांनी त्यातील लबाडी पाहावी आणि केवळ येशू ख्रिस्ताठायी विश्वासाद्वारे तारणाच्या सत्याकडे आकर्षित व्हावे.

English
मराठीच्या पहिल्या पानावर वापस या
खोट्या संप्रदायाची अथवा पंथाची व्याख्या?