settings icon
share icon
प्रश्नः

बायबल दहनाद्वारे अत्यंसंस्काराविषयी काय सांगते? ख्रिस्ती लोकांस जाळले पाहिजे का?

उत्तरः


बायबलमध्ये दहनाबद्दल काही विशिष्ट शिकवण दिलेली नाही. जुन्या करारात अशा लोकांच्या घटना आल्या आहेत ज्यांस जाळून मारण्यात आले (1 राजे 16:18; 2 राजे 21:6) आणि मानवी हाडे जाळण्याबद्दलही (2 राजे 23:16-20), पण ही दहनाची उदाहरणे नाहीत. 2 राजे 23: 16-20 मध्ये वेदीवर मानवी हाडे जाळल्यामुळे वेदीस अपवित्र करण्यात आले हे लक्षात घेणे मजेदार ठरेल. त्याच वेळी, जुन्या कराराराचे नियमशास्त्र कोठेही आज्ञा नाही की मृत माणसाचा मृतदेह जाळला जाऊ नये किंवा ज्याला जाळण्यात येत आहे त्याच्यावर शाप किंवा दंड असल्याचे सांगत नाही.

बायबलच्या काळात दहनप्रथा पालन केली जात होती, परंतु सामान्यतः इस्राएली लोकांद्वारे किंवा नवीन कराराच्या विश्वासणार्यांद्वारे ह्या प्रथेचे पालन केले जात नसे. बायबल काळातील संस्कृतीत, एखाद्या कबरेतील गुहेत किंवा जमिनीत दफन करणे मानवी शवाची विल्हेवाट लावण्याचा सामान्य मार्ग होता (उत्पत्ति 23:19; 35:9; 2 इतिहास 16:14; मत्तय 27:60-66). दफन करणे ही एक सामान्य पद्धत होती, तरीही बायबलमध्ये कोठेही दफन करण्याची आज्ञा शवाची विल्हेवाट लावण्याची एकमेव पद्धत असल्याचे सांगत नाही.

हे कोणत्याही प्रकारे त्यांच्या शरीराचे पुनरुत्थान करण्यापासून देवास अडखळण आणणार नाही. त्याने त्यांना प्रथम उत्पन्न केले; त्यांना पुन्हा तयार करण्यात त्याला कोणतीही अडचण येणार नाही.

ख्रिस्ती विश्वासणारे दहनाचा विचार करू शकतात काय? पुन्हा, दहनाविरूद्ध कोणतीही स्पष्ट शास्त्रवचनीय आज्ञा नाही. काही विश्वासणारे दहनविधीविरुद्ध या आधारावर आक्षेप घेतात हे की एक दिवस देव आपल्या शरीराचे पुनरुत्थान करेल आणि आपल्या प्राणाशी/आत्म्याशी त्यास पुन्हा एकत्र जोडील (1 करिंथकर 15:35-58; 1 थेस्सल 4:16). तथापि, एखाद्या शरीराचे दहन करण्यात आले आहे त्यामुळे देवास त्या शरीराचे पुनरुत्थान करणे अधिक अवघड जाणार नाही. एक हजार वर्षांपूर्वी मेलेल्या खिस्ती लोकांचे मृतदेह, आतापर्यंत, पूर्णपणे धूळीत बदलले आहेत. त्याने त्यांस उत्पन्न केले आहे; म्हणून त्यांस पुन्हा घडविणे त्याला कठीण जाणार नाही. दहन शरीरास धूळीत बदलण्याची प्रक्रिया आणखी “वेगवान” करते. दफन करण्यात आले नाही अशा व्यक्तीचे अवशेष देव तसेच पुनरूत्थित करील जसे तोच तो त्यक्तीचे अवशेष जिवंत करील त्याला दहन करएयात आले नाही. दफन करण्याचा किंवा दहन करण्याचा प्रश्न ख्रिस्ती स्वातंत्र्याच्या क्षेत्रात आहे. जी व्यक्ती किंवा कुटूंब या समस्येचा विचार करीत असेल त्याने शहाणपणासाठी प्रार्थना केली पाहिजे (याकोब 1:5) आणि परिणामी दृढ विश्वास बाळगला पाहिजे.

English



मराठीच्या पहिल्या पानावर वापस या

बायबल दहनाद्वारे अत्यंसंस्काराविषयी काय सांगते? ख्रिस्ती लोकांस जाळले पाहिजे का?
© Copyright Got Questions Ministries