settings icon
share icon
प्रश्नः

बायबल उत्पत्ती विरुद्ध उत्क्रांतीबद्दल काय सांगते?

उत्तरः


उत्पत्ती विरुद्ध उत्क्रांती वादविवादात वैज्ञानिक तर्क सादर करणे हा या उत्तराचा हेतू नाही. उत्पत्ती आणि/किंवा उत्क्रांतीविरूद्ध असलेल्या वैज्ञानिक विवादासाठी, आम्ही जेनेसिस अॅण्ड द इन्स्टिट्यूट फाॅर क्रिएशन रीसर्च यात उत्तरे शोधावी अशी शिफारस करतो. या लेखाचा उद्देश, बायबलच्या अनुसार, उत्पत्ती विरुद्ध उत्क्रांती वादविवाददेखील अस्तित्वात आहे. रोमकरांस पत्र 1:25 घोषणा करते, "कारण देवाचा मूर्खपणा माणसांच्या ज्ञानांहून श्रेष्ठ आहे. आणि देवाची दुर्बळता माणसांच्या बळाहून श्रेष्ठ आहे."

वादविवादातील हा महत्त्वाचा घटक हा आहे की उत्क्रांतीवर विश्वास ठेवणारे बहुतेक शास्त्रज्ञ नास्तिक किंवा अज्ञेयवादी आहेत. काही लोक परमेश्वराच्या उत्क्रांतीच्या काही स्वरूपांस मानतात आणि इतर जे देवाविषयी ईश्वरस्त मताचे पालन करतात (देव अस्तित्वात आहे पण जगात त्याचा सहभाग नाही, आणि प्रत्येक गोष्ट नैसर्गिकरित्या घडते). काही जण खर्‍या अर्थाने आणि प्रामाणिकपणे माहिती पाहतात आणि या निष्कर्षापर्यंत पोहोचतात की उत्क्रांतीचा सिद्धांत त्या माहितीस अनुरूप बसेल. तथापि उत्क्रांतीवादाचे समर्थन करणारे शास्त्रज्ञ अगदी काही टक्केच आहेत. बहुतेक उत्क्रांतीवादी शास्त्रज्ञांचे असे मत आहे की जीवन कोणत्याही उच्चतर व्यक्तीच्या हस्तक्षेपाशिवाय संपूर्णपणे विकसित झाले आहे.

नास्तिकतावाद खरा ठरावा यासाठी, निर्माणकर्‍त्या व्यतिरिक्त दुसरे म्हणजे एक पर्यायी स्पष्टीकरण असणे आवश्यक आहे — कारण विश्व आणि जीवन कसे अस्तित्वात आले. जरी उत्क्रांतीवदाचे काही स्वरूप चार्ल्स डार्विन पूर्वी अस्तित्वात होते, तरी उत्क्रांतीच्या प्रक्रियेचा खरा नमूना — नैसर्गिक निवडीची प्रक्रिया विकसित करणारा तो पहिला व्यक्ती होता. डार्विन एकेसमयी स्वत'स ख्रिस्ती म्हणवीत असे परंतु त्याच्या जीवनात काही दुःखान्तिका घडल्यामुळे त्याने पुढे ख्रिस्ती विश्वास आणि ईश्वराचे अस्तित्व यांचा नाकार केला. उत्क्रांतीचा शोध एका निरीश्वरवाद्याने अथवा नास्तिकाने केला होता. डार्विनचा हेतू देवाच्या अस्तित्वाचे खंडन करणे नव्हता, परंतु हे उत्क्रांतीच्या सिद्धांताच्या अखेरच्या निकालांपैकी एक आहे. उत्क्रांतीवाद नास्तिकतेस बळ देणारा आहे. उत्क्रांतीवादी शास्त्रज्ञ कदाचित हे कबूल करणार नाहीत की त्यांचे ध्येय म्हणजे जीवनाच्या निर्मितीचे पर्यायी स्पष्टीकरण देणे आहे, आणि त्याद्वारे नास्तिकतेचा पाया घालणे आहे, परंतु बायबलनुसार, अगदी त्याच कारणास्तव उत्क्रांतीचा सिद्धान्त अस्तित्वात आहे.

जर सृष्टी खरी आहे, तर एक निर्माणकर्ता आहे ज्यास आम्ही जबाबदार आहोत. उत्क्रांतीवाद नास्तिकतेस बळ देणारा आहे. उत्क्रांतीवाद निरीश्वरवाद्यांस हे समजाविण्यासाठी आधार देतो की सृष्टिकर्‍त्या देवावाचून जीवन कसे अस्तित्वात आहे. उत्क्रांतीवाद विश्वामध्ये देवाच्या सहभागी होण्याची गरज नाकारतो. उत्क्रांती म्हणजे निरीश्वरवादाच्या धर्मासाठी "उत्पत्ती सिद्धांत" आहे. बायबलनुसार, निवड स्पष्ट आहे. आम्ही आमच्या सर्वशक्तिमान आणि सर्वज्ञानी परमेश्वराच्या वचनावर विश्वास ठेवू शकतो, किंवा मूर्खांच्या भ्रामक पक्षपाती, "वैज्ञानिक" स्पष्टीकरणांवर आपण विश्वास ठेवू शकतो.

Englishमराठीच्या पहिल्या पानावर वापस या

बायबल उत्पत्ती विरुद्ध उत्क्रांतीबद्दल काय सांगते?
© Copyright Got Questions Ministries