settings icon
share icon
प्रश्नः

सामुहिक प्रार्थना महत्वाची आहे काय? सामुहिक प्रार्थना ही एकट्याने व्यक्तिगतरित्या प्रार्थना करण्यापेक्षा अधिक सामर्थ्यवान आहे काय?

उत्तरः


सामुहिक प्रार्थना ही उपासना, योग्य शिकवण, प्रभुभोजन आणि सहभागित्व यासोबत मंडळीच्या जीवनाचा महत्वाचा भाग आहे. प्रारंभिक मंडळी नियमितपणे प्रेषितांच्या शिक्षणासाठी, भाकर मोडण्यासाठी, आणि प्रार्थनेसाठी एकत्र येत असे (प्रेषितांची कृत्ये 2:42). जेव्हा आम्ही इतर विश्वासणार्‍यासोबत प्रार्थना करतो, तेव्हा परिणम फार सकारात्मक होऊ शकतो. जेव्हा आपण सारख्या विश्वासात सहभागी होतो, तेव्हा सामुहिक प्रार्थना आमची वाढ करते आणि आम्हास एकजुट करते. जो पवित्र आत्मा प्रत्येक विश्वासणार्याठायी वस्ती करतो तो आमच्या प्रभुची आणि तारणार्याची स्तुती एकत असतांना, आमच्या अंतःकरणास आनंदीत करतो, आणि आम्हास सहभागित्वाचा अद्वितीय बंधनात एकत्र बांधतो जे जीवनात इतरत्र आढळून येत नाही.

जे लोक एकटे असतील आणि जीवनाच्या ओझ्यांबाबत संघर्ष करीत असतील, ते जेव्हा ऐकतात की त्यांस इतर लोक कृपेच्या सिंहासनापुढे उंचवीत आहेत तेव्हा त्यांस मोठे प्रोत्साहन प्राप्त होऊ शकते. आम्ही देखील जेव्हा इतरांसाठी मध्यस्थी करतो तेव्हा आमची इतरांप्रत प्रीती आणि कळकळ यांत वाढ होते. त्याचवेळी, सामुहिक प्रार्थना केवळ त्या सहभागी होणार्या लोकांचे अंतःकरणाचे प्रतिबिंब ठरेल. आम्हास नम्रपणे (याकोबाचे पत्र 4:10), सत्याने (स्तोत्र 145:18), आज्ञाधारकपणे (योहानाचे 1ले पत्र 3:21-22), उपकारस्तवन करीत (फिलिप्पैकरांस पत्र 4:6) आणि र्धर्याने (इब्रीकरांस पत्र 4:16) देवासमक्ष यावयाचे आहे. दुखाची गोष्ट म्हणजे, सामुहिक प्रार्थना अशा लोकांसाठी देखील मंच ठरू शकते ज्यांचे शब्द देवाप्रत नसतात, तर त्यांच्या श्रोत्यांसाठी असतात. येशूने मत्तय 6ः5-8 मध्ये अशा वागणूकीविरुद्ध सावधगीरीचा इशारा दिला आहे जेथे तो आम्हास उपदेश देतो की आम्ही प्रार्थनेत दिखाऊ, ढोंगी, अथवा पाखंडी असता कामा नये, तर प्रार्थनेचा ढोंग्याप्रमाणे उपयोग करण्याचा परीक्षेपासून वाचण्यासाठी आपापल्या खोलींत गुप्तपणे प्रार्थना करावी.

देवाच्या हातास कार्यप्रवण करण्याच्या अर्थाने सामुहिक प्रार्थना व्यक्तिगत प्रार्थनांपेक्षा "अधिक सामर्थ्यवान" आहेत असे सूचविणारे पवित्र शास्त्रात काही नाही. अनेक ख्रिस्ती लोक प्रार्थनेस "देवाकडून प्राप्त करण्याचे" साधन समजतात आणि सामुहिक प्रार्थना मुख्यतः आमच्या मागण्यांची यादी ऐकविण्याचा प्रसंग ठरते. परंतु, बायबलच्या प्रार्थना बहुपैलू असतात, आमच्या पवित्र, सिद्ध, आणि नीतिमान परमेश्वरासोबत शुद्ध आणि घनिष्ठ सहभागित्वात प्रवेश करण्याच्या संपूर्ण इच्छेस व्याप्त करतात. अशा देवाने आपल्या प्राण्यांचे ऐकून घेण्यासाठी आपले कान लावावे ही गोष्ट विपुलतेने स्तुती व आराधना अप्रण करण्याचे (स्तोत्र 27:4; 63:1-8), अंतःकरणापासून पश्चाताप आणि पापांगिकार उत्पन्न करण्याचे (स्तोत्र 51; लूक 18:9-14) कारण ठरते, आभार आणि उपकारस्तवन उत्पन्न करते (फिलिप्पैकरांस पत्र 4:6; कलस्सैकरांस पत्र 1:12), आणि इतरांच्या वतीने खरी मध्यस्थीची प्रार्थना उत्पन्न करते (थेस्सलनीकाकरांस 2रे पत्र 1:11; 2:16).

अशाप्रकारे, प्रार्थना ही, परमेश्वर देवास आमच्या इच्छेनुसार करण्यास प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करणे नव्हे, तर त्याच्या योजना पूर्ण करण्यात देवाशी सहकार्य करणे होय. जेव्हा आम्ही आमच्या इच्छा त्याच्या आधीन करतो जो आमच्या परिस्थितींविषयी आमच्यापेक्षा अधिक चांगल्याप्रकारे जाणतो आणि "आमच्या मागण्यापूर्वीच आमच्या गरजा जाणतो" (मत्तय 6:8), तेव्हा आमच्या प्रार्थना त्यांच्या उच्च पातळीस पोहोचतात. म्हणून, देवाच्या इच्छेच्या आधीनतेत केलेल्या प्रार्थनांची उत्तरे नेहमीच सकारात्मक असतात, मग एका व्यक्तीद्वारे केलेली असो वा हजार व्यक्तींद्वारे.

सामुहिक प्रार्थना ह्या देवाचा हाथ कार्यप्रवण करण्याची जास्त शक्य असते ही कल्पना बहुतांशी मत्तय 18:19-20 चा चुकीचा अर्थ लावल्याने उत्पन्न झाली आहे, "मी आणखी तुम्हास खचित सांगतो, पृथ्वीवर तुमच्यापैंकी दोघे कोणत्याहि गोष्टीविषयी एकचित्त होऊन विनंती करितील तर ती माझ्या स्वर्गांतील पित्याकडून त्यांच्यासाठी केली जाईल. कारण जेथे दोघे किंवा तिघे माझ्या नांवाने जमले आहेत तेथे त्यांच्यामध्ये मी आहे." ही वचने एका मोठ्या परिच्छेदातून येतात ज्या अशा पद्धतींस संबोधित करतात ज्यांचे पालन पाप करणार्या सदस्यास मंडळीद्वारे शिस्त लावण्यासाठी केले जाते. विश्वासणार्‍याद्वारे देवास ते सहमत असलेली कोणतीही गोष्ट मागण्यासाठी, मग ते कितीही पापी अथवा मूर्ख का असेनात, हे कोरा चेक देण्याचे अभिवचन आहे असा अर्थ लावणे, मंडळीच्या शिस्तीच्या संदर्भात अनुरूप नाही, तर ते बाकीच्या वचनाचा, विशेषेकरून देवाच्या सार्वभौमत्वाचा नाकार करते.

याशिवाय, असा विश्वास धरणे की जेव्हा प्रार्थनेसाठी "दोघे किंवा तिघे एकत्र येतात," तेव्हा आमच्या प्रार्थनांस आपोआपच एखादी जादूची शक्ती प्राप्त होते, यास पवित्र शास्त्रात समर्थन नाही. अर्थात जेव्हा दोघे किंवा तिघे प्रार्थना करतात तेथे येशू उपस्थित असतो, परंतु जेव्हा एक विश्वासणारा एकट्याने प्रार्थना करतो, तेव्हा जरी तो व्यक्ती इतरांपासून हजारो मैल वेगळा का असेना येशू त्याच्यासोबतही तितकाच उपस्थित असतो. सामुहिक प्रार्थना ही महत्वाची आहे कारण ती ऐक्य उत्पन्न करते (योहानाचे पत्र 17:22-23), आणि विश्वासणार्‍याचा एकमेकांस प्रोत्साहन देण्याचा मुख्य पैलू आहे (थेस्सलनीकाकरांस 1ले पत्र 5:11) आणि एकमेकांस प्रीतीस व सत्कार्यासाठी प्रोत्साहन देते (इब्रीकरांस पत्र 10:24).

English



मराठीच्या पहिल्या पानावर वापस या

सामुहिक प्रार्थना महत्वाची आहे काय? सामुहिक प्रार्थना ही एकट्याने व्यक्तिगतरित्या प्रार्थना करण्यापेक्षा अधिक सामर्थ्यवान आहे काय?
© Copyright Got Questions Ministries