settings icon
share icon
प्रश्नः

ख्रिस्ती जीवनात परिवर्तन कसे प्राप्त करू शकतो?

उत्तरः


ग्रीक शहर फिलिप्पैमधील एका व्यक्तीने पौल व सिलास यांस अगदी असाच प्रश्न विचारला. आम्हाला या व्यक्तीबद्दल कमीतकमी तीन गोष्टी माहित आहेत: तो बंदिशाळेचा अधिकारी होता, तो मूर्तिपूजक होता आणि तो हतबल होता. पौलाने त्याला रोखले तेव्हा तो आत्महत्येच्या मार्गावर होता. आणि याच वेळी त्या व्यक्तीने विचारले, “मला तारण प्राप्त व्हावे म्हणून मी काय करावे?” (प्रेषितांची कृत्ये 16:30).

त्या मनुष्याने प्रश्न विचारतो तेव्हाच त्याची खात्री होते की त्याने तारण मिळवण्याची गरज ओळखली आहे - त्याने आपल्यासाठी केवळ मृत्यू पाहिला आणि त्याला मदतीची गरज आहे हे त्याला कळून आले. त्याने पौल व सिलास यांना विचारले यावरून असे दिसून येते की त्यांच्याकडे उत्तर आहे यावर त्यांचा विश्वास होता.

हे उत्तर त्वरेने आणि सहजपणे येते: “प्रभु येशू ख्रिस्तावर विश्वास ठेव, म्हणजे तुमचे तारण होईल” (वचन 31). त्या मनुष्याने कसा विश्वास ठेवला आणि त्याचे तारण कसे झाले हे दर्शविण्यासाठी परिच्छेद पुढे सांगतो. त्या दिवसापासून त्याच्या जीवनात फरक दिसून आला.

लक्षात ठेवा त्या माणसाचे तारण विश्वासावर (“विश्वास ठेव”) आधारित होते. त्याला येशूवर विश्वास ठेवावा लागला आणि दुसरे काहीच नाही. त्या मनुष्याचा असा विश्वास होता की येशू देवाचा पुत्र (“प्रभु”) आणि पवित्र शास्त्र (“ख्रिस्त”) पूर्ण करणारा मशीहा आहे. येशूच्या पापाकरिता मरण पावला आणि पुन्हा उठला, असा विश्वास देखील त्याच्याठायी होता, कारण पौल आणि सिलास हा संदेश देत होते (रोम 10:9-10 आणि 1 करिंथ 15:1-4 पहा).

“तारण पावणे” म्हणजे अक्षरशः “फिरणे” होय. जेव्हा आपण एका गोष्टीकडे वळतो तेव्हा आपण अनावश्यकपणे दुसऱ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. जेव्हा आपण येशूकडे वळतो तेव्हा आपण पापापासून वळायला हवे. बायबलमध्ये पापापासून परत फिरण्यास “पश्चात्ताप” म्हणते आणि येशूकडे वळण्यास “विश्वास” म्हणते. म्हणून, पश्चात्ताप आणि विश्वास पूरक आहेत. पश्चाताप आणि विश्वास या दोन्ही गोष्टी 1 थेस्सल 1: 9- मध्ये दर्शविल्या आहेत. “तुम्ही मूर्तीं

पासून देवाकडे वळला.” एक ख्रिस्ती व्यक्ती ख्रिस्ती विश्वासात अस्सल रूपांतर झाल्यामुळे आपल्या पूर्वीच्या मार्गास किंवा खोट्या धर्माशी संबंधित कोणत्याही गोष्टीस मागे सोडील. सोप्या शब्दात सांगायचे झाले तर ख्रिस्ती विश्वासात रुपांतर करण्यासाठी, आपण येशूवर विश्वास ठेवला पाहिजे की येशू देवाचा पुत्र आहे जो आपल्या पापासाठी मरण पावला व पुन्हा उठला. आपण देवाशी सहमत असले पाहिजे की आपण पापी असून आपणास तारणाची गरज आहे आणि आपणास तारण देण्यासाठी आपण केवळ येशूवर विश्वास ठेवला पाहिजे. जेव्हा आपण पापापासून ख्रिस्ताकडे वळता तेव्हा देव आपले रक्षण करतो आणि पवित्र आत्मा देण्याचे वचन देतो, जो तुम्हाला नवीन उत्पत्ती बनवितो.

ख्रिस्ती विश्वास, त्याच्या वास्तविक स्वरुपात, धर्म नाही. बायबलनुसार ख्रिस्तीत्व हा येशू ख्रिस्ताबरोबरचा संबंध आहे. ख्रिस्ती विश्वास म्हणजे जो वधस्तंभावर असलेल्या येशूच्या बलिदानावर विश्वास ठेवतो आणि त्याच्यावर भरवंसा ठेवतो त्याला देव तारण देतो. ख्रिश्चन विश्वासात बदल करणारी व्यक्ती एका धर्मातून दुसऱ्या धर्मात जात नाही. ख्रिस्ती विश्वासात रुपांतरण म्हणजे देव देऊ करीत असलेल्या वरदानाचा स्वीकार करणे आणि येशू ख्रिस्ताबरोबर एक वैयक्तिक संबंध सुरू करणे ज्यामुळे पापांची क्षमा होते आणि मरणानंतर स्वर्गात सार्वकालिक जीवन.

आपण या लेखात वाचलेल्या गोष्टीमुळे ख्रिस्ती विश्वासात रुपांतरित होऊ इच्छित आहात का? जर आपले उत्तर होय असेल तर आपण येथे दिलेली एक सोपी प्रार्थना देवास करू शकता. ही प्रार्थना किंवा इतर कोणतीही प्रार्थना म्हटल्यास तुमचे रक्षण होणार नाही. केवळ ख्रिस्तावर विश्वास ठेवणेच पापांपासून तुमचे रक्षण करू शकते. ही प्रार्थना म्हणजे देवावरचा आपला विश्वास व्यक्त करण्याचा आणि आपल्याला तारण दिल्याबद्दल त्याचे आभार मानण्याचा एक मार्ग आहे. “देवा, मला माहित आहे की मी तुझ्याविरुध्द पाप केले आहे आणि शिक्षेस पात्र आहे. परंतु येशू ख्रिस्ताने अशी शिक्षा घेतली ज्यास मी पात्र होतो जेणेकरून त्याच्यावर विश्वास ठेवून मला क्षमा मिळावी. मी तारणासाठी तुझ्यावर विश्वास ठेवतो. आपल्या अद्भुत कृपेसाठी आणि क्षमेबद्दल धन्यवाद - सार्वकालिक जीवनाची भेट!

English



मराठीच्या पहिल्या पानावर वापस या

ख्रिस्ती जीवनात परिवर्तन कसे प्राप्त करू शकतो?
© Copyright Got Questions Ministries