settings icon
share icon
प्रश्नः

जर आपल्या पापांची आधीच क्षमा झालेली आहे तर त्यांची कबुली देणे का गरजेचे आहे (1 योहान 1:9)?

उत्तरः


प्रेषित पौलाने लिहिले आहे कि, “त्याच्या कृपेच्या गौरवाची स्तुती व्हावी म्हणून हे झाले. ही कृपा त्याने आपल्यावर त्या प्रियकराच्या ठायी विपुलतेने केली आहे; त्याच्या कृपेच्या समृद्धीप्रमाणे त्या प्रियकराच्या ठायी त्याच्या रक्ताच्या द्वारे खंडणी भरून मिळवलेली मुक्ती म्हणजे आपल्या अपराधांची क्षमा आपल्याला मिळाली आहे. सर्व ज्ञान व बुद्धी ह्यांच्यासह त्याने ही कृपा आपल्यावर विपुलतेने केली आहे” (इफिसकरांस पत्र 1:6-8). या क्षमेचा संदर्भ तारणाशी येतो, ज्यामध्ये देवाने आपल्या पापांना घेतले आणि “जसे पुर्वेपासुन पश्चिम जितकी दूर आहे” तसे त्यांना आपल्यापासून दूर केले (स्तोत्रसंहिता 103:12). ही न्यायिक क्षमा आहे जिला देव येशू ख्रिस्ताला तारणहार म्हणून स्वीकार केल्यावर आपल्याला देतो. आपल्या अगोदरच्या, आताच्या आणि भविष्यातील सर्व पापांची न्यायिक क्षमा झालेली आहे, ज्याचा अर्थ आपल्याला आपल्या पापांसाठी सार्वकालिक न्यायाच्या त्रासाला सामोरे जावे लागणार नाही असा आहे. आम्ही अजूनही जोपर्यंत पृथ्वीवर आहोत तोपर्यंत बऱ्याचदा पापाचे दुष्परिणाम भोगतो, जो आमच्या हातात एक प्रश्न देतो.

इफिसकरांस पत्र 1:6-8 आणि 1 योहान 1:9 यामधील फरक हा आहे की, योहान अशा क्षमेला हाताळत आहे जिला आपण “संबंधीय” किंवा “कुटुंबीय” क्षमा असे म्हणतो—जसे पिता आणि पुत्राचे नाते. उदाहरणार्थ, जर एखाद्या पुत्राने त्याच्या पित्याबरोबर काही चुकीचे केले—त्याच्या अपेक्षेप्रमाणे किंवा नियमांप्रमाणे करण्यात कमी पडला— तर पुत्राच्या आणि पित्याच्या संबंधात अडथला येतो. तो त्याच्या पित्याचा पुत्र राहतो, परंतु संबंध खराब होतात. त्यांच्या सह्भागीतेत तोपर्यंत अडथळा राहतो जोपर्यंत पुत्र पित्याजवळ त्याच्या चुकांची कबुली देत नाही. हे असेच देवाबरोबरच्या संबधात होते; आमच्या त्याच्याबरोबरच्या सहभागीतेत तोपर्यंत अडथळा राहतो, जोपर्यंत आपण आपले पाप कबूल करत नाही. जेंव्हा आपण आपले पाप काबुल करतो, तेंव्हा सहभागीता पुनर्स्थापित होते. हीच संबंधीय क्षमा होय.

“स्थितीय” क्षमा किंवा न्यायीय क्षमा ही आहे जी ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक विश्वास्याला मिळाली आहे. ख्रिस्ताच्या शरीराचा एक भाग असे स्थान म्हणून आपण केलेल्या सर्व पापांची किंवा आपण करणार असलेल्या सर्व पापांची क्षमा झालेली आहे. ख्रिस्ताने वधस्तंभावर बलिदान करून भरलेल्या किमतीमुळे देवाचा पापाबद्दलचा क्रोध शांत झाला आणि आता कोणत्याही नवीन बलिदानाची किंवा किमतीची गरज नाही. जेंव्हा येशूने म्हंटले “पूर्ण झाले आहे,” तेंव्हा त्याचा अर्थ सर्व पूर्णच झाले आहे. तेंव्हापासून आणि तिथे आपल्याला स्थितीय पापांची क्षमा मिळाली आहे.

पापांची कबुली आपल्याला देवाच्या शिस्तीपासून दूर ठेवते. जर आपण पापांना कबुल करण्यात अपयशी झालो, तर जोपर्यंत आपण त्यांना कबुल करत नाही तोपर्यंत देवाची शिस्त निश्चित आहे. आधी सांगितल्याप्रमाणे, तारणाच्या वेळी आपल्या पापांची क्षमा झालेली आहे (स्थितीय क्षमा), परंतु देवाबरोबरचा आपला रोजचा संबंध चांगला राहणे गरजेचे आहे (संबंधीय क्षमा). आपल्या जीवनातील कबूल न केलेल्या पापांना सोबत ठेवून देवाबरोबर व्यवस्थित सहभागीता ठेवणे शक्य नाही. म्हणून, देवाबरोबरची जवळून सहभागीता टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला ज्याक्षणी जाणीव होईल की आपण पाप केले आहे त्याच क्षणी पापांची कबुली देणे गरजेचे आहे.

English



मराठीच्या पहिल्या पानावर वापस या

जर आपल्या पापांची आधीच क्षमा झालेली आहे तर त्यांची कबुली देणे का गरजेचे आहे (1 योहान 1:9)?
© Copyright Got Questions Ministries