settings icon
share icon
प्रश्नः

देवाबरोबर संवाद साधणे? जर परमेश्वरास भविष्य माहीत आहे आणि सर्व गोष्टी त्याच्या नियंत्रणात आहेत तर प्रार्थना करण्यात काय अर्थ आहे. जर आपण देवाचे अंतःकरण बदलू शकत नाही, तर आपण देवाबरोबर संवाद साधणे?

उत्तरः


आपले देवाशी आणि देवाचे आपल्याशी संवाद साधण्याचे स्वरूप समजून घेण्यासाठी, आपल्याला काही नीतीनियमांना जाणून घ्यावे लागेल. पहिले म्हणजे देव फक्त सत्य बोलतो. तो कधीही खोटे बोलत नाही, आणि तो कधीही फसवणूक करत नाही. ईयोब 34:12 सांगते, “देव निःसंशय काही वाईट करीत नाही, सर्वसमर्थ प्रभू विपरीत न्याय करीत नाही”. दुसरे नीतीनियम हे आहे की, पवित्रशास्त्र हे देवाचे प्रत्यक्ष शब्द आहेत. “वचन” यासाठीचा ग्रीक शब्द “ग्राफे”, याचा उपयोग नवीन करारामध्ये 51 वेळा जुन्या करारातील लिखाणाचा उल्लेख करण्यासाठी केला आहे. पौल 2 तीमथ्या 3:16 मध्ये हे खात्रीपूर्वक सांगतो की, या शब्दांना अक्षरश: “देवाने श्वासाप्रमाणे बाहेर काढलेले आहे.” “ग्राफे” हा शब्द नवीन करारात सुद्धा लागू केला आहे, विशेषकरून जेंव्हा 2 पेत्र 3:16 मध्ये पेत्र पौलाच्या पत्रांना “वचन” म्हणून संबोधतो, आणि जेंव्हा पौल (1 तीमथ्या 5:18 मध्ये) येशूच्या शब्दांना लूक 10:7 मध्ये आहेत तसेच उदाहरणादाखल देतो आणि त्यांना “वचन” असे संबोधतो. अशा प्रकारे, एकदा का आपण नवीन कराराच्या लिखाणाला “वचन” या विशेष श्रेणीचे असल्याचे स्थापित करतो, मग आपण 2 तीमथ्या 3:16 च्या लिखाणाला सुद्धा हे लागू करण्यात बरोबर ठरतो, आणि असे सांगतो की, त्या लिखाणाला सुद्धा काही वैशिष्ट्ये आहेत ज्याचा संबंध पौल “सर्व वाचनांशी” लावतो. हे “देवाने श्वासाप्रमाणे बाहेर काढलेले आहेत,” आणि त्यातील सर्व शब्द हे देवाचेच शब्द आहेत.

ही सर्व माहिती प्रार्थनेच्या विषयाशी का समर्पक आहे? आता आपण हे स्थापित केले आहे की देव फक्त सत्य बोलतो आणि पवित्रशास्त्र हे देवाचेच शब्द आहेत, तर आपण देवाशी संवाद साधण्याच्या विषयाबद्दल तार्कीकदृष्ट्या खालील दोन निष्कर्षांपर्यंत येऊ शकतो. पहिला, ज्याअर्थी पवित्र शास्त्र सांगते की देव मनुष्याचे ऐकतो (स्तोत्रसंहिता 17:6, 77:1; यशया 38:5), मनुष्य असा विश्वास ठेऊ शकतो की, जेंव्हा तो देवाबरोबर योग्य संबंधात असतो, आणि मग तो देवाबरोबर बोलतो, तेंव्हा देव त्याचे ऐकेल. ज्याअर्थी पवित्र शास्त्र हे देवाचेच शब्द आहेत, त्याआर्थी मनुष्य असा विश्वास ठेऊ शकतो की जेंव्हा तो देवाबरोबर योग्य संबंधात असतो आणि मग तो पवित्र शास्त्र वाचतो, तेंव्हा तो अक्षरशः देवाने बोललेले शब्द ऐकत आहे. मनुष्य आणि देवामधील समृद्ध संवादासाठी देवाबरोबर योग्य संबंध असणे गरजेचे आहे हे आपण पुराव्यानिशी तीन प्रकारे बघू शकतो. पहिला पापापासून फिरणे किंवा पश्चात्ताप करणे आहे. उदाहरणार्थ, स्तोत्रसंहिता 27:9, ही देवाने त्याचे ऐकावे आणि क्रोधाने त्याच्यापासून आपले मुख फिरवू नये म्हणून दाविदाची देवाकडे विनवणी आहे. यावरून, आपल्याला हे कळते की, देव त्याचे मुख मनुष्याच्या पापापासून दूर वळवू शकतो आणि ते पाप देव आणि मनुष्य यांच्यामधील संवादाला अडथळा आनु शकते. याचे अजून एक उदाहरण यशया 59:2 मध्ये पाहता येते, जेथे यशया लोकांना सांगतो कि, “तर तुमचे अपराध तुम्ही व तुमचा देव यांच्यामध्ये आडभिंतीप्रमाणे झाले आहेत; तुमच्या पतकांमुळे तो तुम्हास दर्शन देत नाही, तुमचे ऐकत नाही.” म्हणून, जेंव्हा आपल्या जीवनात कबुल न केलेले पापे असतात तेंव्हा ते देवाबरोबरच्या संवादात अडथळा ठरतात.

आणखी संवादासाठी नम्र हृदय गरजेचे आहे. देव या शब्दांना यशया 66:2 मध्ये बोलला कि, “जो दिन व भग्नहृदय आहे व माझी वचने ऐकून कंपायमान होतो, त्याजकडे मी पाहतो.” तिसरी गोष्ट धार्मिकतेचे जीवन ही आहे. ही पापापासून फिरण्याची एक सकारात्मक बाजू आहे आणि तिला प्रार्थनेमध्ये विशेषकरून परिणामकारक म्हणून चिन्हित केलेले आहे. याकोब 5:16 सांगते, “नितीमानांची प्रार्थना कार्य करण्यात फार प्रबळ असते.”

आपली देवाबरोबर बोलण्याची कृती ही मौखिक, आपल्या विचारांमध्ये, किंवा लेखी असू शकते. आपल्याला याची खात्री असू शकते की, तो आपले ऐकेल आणि पवित्र आत्मा आपल्याला जशी प्रार्थना करायची आहे तशी करण्यास मदत करेल. रोम 8:26 सांगते, “तसेच आत्माही आपल्या अशक्तपणात आपल्याला हातभार लावतो; कारण आपण यथायोग्य प्रार्थना कशासाठी केली पाहिजे हे आपल्याला ठाऊक नाही; पण आत्मा स्वतः अनिर्वाच्य कन्हण्याने मध्यस्थी करतो.”

देवाची आपल्याशी परत संवाद साधण्याची जी पद्धत आहे, त्यामध्ये एखाद्या विशिष्ठ कृतीसाठी किंवा निर्णयासाठी मार्गदर्शन करताना देवाने आपल्या मनामध्ये थेट विचारंना घालण्याच्या ऐवजी देवाने आपल्याशी प्रामूख्याने वचनांद्वारे बोलावे हे आपण पहिले पाहिजे. आमच्या स्वतःची फसवणूक करण्याच्या क्षमतेमुळे, आपल्या मनामध्ये प्रवेश करणारा कोणताही आणि प्रत्येक विचार हा देवापासून आहे असे स्वीकार करणे हे शहाणपणाचे नाही. काहीवेळा, आपल्या जीवनातील विशिष्ठ समस्यांच्या संबंधात, देव आपल्याशी सरळ वचनांच्याद्वारे बोलत नाही, आणि अशा घटनांमध्ये पवित्रशास्त्रापेक्षा अधिक प्रकटीकरणाला शोधणे हे समजूतदारपणे आकर्षक असू शकते. तथापि, अशा वेळी, उत्तरे शोधताना देवाने आपल्याला आधीच देऊ केलेल्या पवित्रशास्त्रीय तत्वांचा संदर्भ घेणे हे देवाच्या मुखात शब्द घालणे आणि/किंवा स्वतःला फसवणुकीसाठी तयार करणे यापेक्षा अधिक शहाणपणाचे आहे.

योग्य निष्कर्षांपर्यंत येण्यासाठी कळकळीने प्रार्थना करणे हे इष्ट आहे, कारण जे सुज्ञान मागतात त्यांना ते देण्याचे देवाने अभिवचन दिले आहे. “जर तुम्हापैकी कोणी ज्ञानाने उणा असेल तर त्याने ते देवाजवळ मागावे; कारण तो कोणास दोष न लावता सर्वांस उदारपणे देणग्या देतो” (याकोब 1:5). प्रार्थनेमध्ये देवाबरोबर कसा संवाद साधू शकतो? प्रार्थना ही आपण स्वर्गीय पित्याबरोबर आपल्या हृदयापासून बोलणे आहे, आणि त्याच्या बदल्यात, देवाने आपल्याशी त्याच्या वाचानांद्वारे बोलणे आणि त्याच्या पवित्र आत्म्यद्वारे चालवणे हे आहे.

English



मराठीच्या पहिल्या पानावर वापस या

देवाबरोबर संवाद साधणे? जर परमेश्वरास भविष्य माहीत आहे आणि सर्व गोष्टी त्याच्या नियंत्रणात आहेत तर प्रार्थना करण्यात काय अर्थ आहे. जर आपण देवाचे अंतःकरण बदलू शकत नाही, तर आपण देवाबरोबर संवाद साधणे?
© Copyright Got Questions Ministries