बायबल मंडळीच्या वाढीविषयी काय म्हणते?


प्रश्नः बायबल मंडळीच्या वाढीविषयी काय म्हणते?

उत्तरः
जरी बायबल विशिष्टरित्या मंडळीच्या वाढीस संबोधित करीत नसेल, तरीही मंडळीच्या वाढीचा सिद्धांत हा समज आहे की येशूने म्हटले, ”आणखी मी तुला सांगतो, तू पेत्र आहेस आणि ह्या खडकावर मी आपली मंडळी रचीन व तिच्यापुढे अधोलोकाच्या द्वारांचे काहीच चालणार नाही“ (मत्तय 16:18). पौैलाने ही पुष्टी केली की मंडळीचा पाया येशू ख्रिस्तामध्ये आहे (1 करिंथ 3:11). येशू ख्रिस्त सुद्धा मंडळीचे मस्तक (इफिस 1:18-23) आणि मंडळीचे जीवन आहे (योहान 10:10). असे म्हटल्यानंतर हे लक्षात ठेवले पाहिजे की “वाढ” ही सापेक्ष संज्ञा असू शकते. अनेक प्रकारची वाढ आहे, काहींचा संबंध संख्येशी मुळीच नाही.

मंडळीच्या सदस्यांची/उपस्थित राहणार्यंाची संख्या बदलत नसली तरीही मंडळी जिवंत असू शकते आणि वाढू शकतो. जर मंडळीतील लोक प्रभु यीशु ख्रिस्ताच्या कृपेत आणि ज्ञानात वाढत असतील, त्यांच्या जीवनासाठी त्याच्या इच्छेच्या अधीन होत असतील, व्यक्तिगतरित्या आणि सामुहिकरित्या दोन्ही प्रकारे, तर ती मंडळी खर्‍या वाढीचा अनुभव करीत आहे. त्याचवेळी, मंडळी दर आठवड्यास तिच्या लोकांच्या उपस्थितीत भर देऊ शकते, तिची मोठ्या संख्येत वाढ होऊ शकते, आणि तरीही आत्मिकरित्या कुंठित असू शकते.

कुठल्याही प्रकारच्या वाढीचा एक विशिष्ट नमूना असतो. जसे वाढ होत असलेल्या जीवनात असते, त्याप्रमाणे स्थानिक मंडळीत बी पेरणारे (सुवार्तिक), बीयांस पाणी देणारे (पाळक/शिक्षक), आणि इतर लोक असतात जे आपल्या आत्मिक कृपादानांचा उपयोग स्थानिक मंडळीतील लोकांच्या वाढीसाठी करतात. पण लक्षात ठेवा की वाढ देणारा परमेश्वर देव आहे (1 करिंथ 3:7). जे बीजारोपण करतात आणि जे पाणी देतात त्यांस त्यांच्या श्रमानुसार प्रतिफळ प्राप्त होईल (1 करिंथ 3:8).

स्थानिक मंडळीच्या वाढीसाठी बीजारोपण आणि जलसिंचन यांच्यात समतोल साधला पाहिजे ज्याचा अर्थ असा की आरोग्यवान मंडळीत प्रत्येक व्यक्तीस हे जाणले पाहिजे की त्याचे आत्मिक कृपादान काय आहे यासाठी की ती ख्रिस्ताच्या मंडळीच्या अंतर्गत कार्य करू शकते. जर बीजारोपण आणि जलसिंचन समतोलाबाहेर जात असेल, तर परमेश्वराने ठरविल्याप्रमाणे मंडळीची प्रगती होणार नाही. अर्थात दररोज पवित्र आत्म्यावर अवलंबून राहावे लागेल आणि त्याच्या आज्ञेचे पालन करावे लागेल यासाठी त्याचे सामथ्र्य त्या लोकांत प्रकट व्हावे जे बीजारोपण करतात आणि पाणी देतात यासाठी की देवाच्या कार्यात वाढ घडून यावी.

शेवटी, जिवंत आणि वाढत्या मंडळीचे वर्णन प्रे. कृत्ये 2:42-47 मध्ये आढळते जेथे विश्वासणार्यांनी ”ते प्रेषितांच्या शिक्षणात आणि सहवासात, भाकर मोडण्यात व प्रार्थना करण्यात तत्पर असत.“ ते एकमेकाची सेवा करीत होते आणि ज्यांस प्रभुला जाणण्याची गरज होती, त्यांस ते सुवार्ता सांगत. ”प्रभू तारण प्राप्त होत असलेल्या माणसांची दररोज त्यांच्यात (मंडळीत) भर घालत असे.” जेव्हा या गोष्टी असतात, तेव्हा मंडळी आत्मिक वाढीचा अनुभव करील, मग संख्यात्मक वाढ असो किंवा नसो.

English
मराठीच्या पहिल्या पानावर वापस या
बायबल मंडळीच्या वाढीविषयी काय म्हणते?