settings icon
share icon
प्रश्नः

मंडळीत शिस्तीविषयी बायबल काय म्हणते?

उत्तरः


मंडळीत शिस्त ती प्रक्रिया आहे ज्यात मंडळीचे रक्षण करण्याच्या आणि पापी व्यक्तीस परमेश्वरासोबत योग्य चालचलणुकीकडे परत आणण्याच्या, व मंडळीच्या सदस्यांमध्ये सहभागित्वाचे नवीकरण करण्याच्या हेतूने स्थानिक मंडळीच्या सदस्यांत पापमय वर्तनात सुधारणा केली जाते. काही बाबतीत, मंडळीच्या शिस्तीचा उपयोग एखाद्या व्यक्तीस औपचारिकरित्या मंडळीच्या सदस्यत्वातून बहिष्कृत केले जाते आणि अनौपचारिकरित्या त्या व्यक्तीपासून इतरांस वेगळे केले जाते.

मत्तय 18:15-20 मंडळीत शिस्त राबविण्यासाठी मंडळीस एक कार्यपद्धत व अधिकार देते. येशू आम्हास आज्ञा देतो की एका व्यक्तीने (साामन्यतः दुखावलेला पक्ष) त्याला दुखविणार्या व्यक्तीकडे गुप्तपणे जावे. जर दुखाविणारा व्यक्ती आपले पाप कबूल करण्यास आणि पश्चाताप करण्यास नाकार देतो, तर इतर दोघे किंवा तिघे परिस्थितीच्या तपशिलाची पुष्टी करावयास जातात. जर तरीही पश्चाताप नसेल - पश्चातापाची दोनदा संधी दिल्यानंतरही दुखाविणारा व्यक्ती त्याच्या पापास दृढपणे धरून राहत असेल - तर ती बाब मंडळीपुढे न्यावी. मग दुखविणार्यास पश्चाताप करण्याची तिसरी संधी मिळते आणि तो त्याचे पापमय वर्तन सोडून देतो. जर मंडळीच्या शिस्तीच्या प्रक्रियेत कोणत्याही क्षणी पापी व्यक्ती पश्चाताप करण्याच्या पाचारणाकडे लक्ष देत असेल, तर ”तर तू आपला भाऊ मिळवलास असे होईल“ (वचन 15). तथापि, जर दुखाविणार्याद्वारे शिस्त सकारात्मक प्रतिसादावाचून तिसर्या पावलाकडे सुरू राहत असेल, तर येशूने म्हटले, ”तो तुला परराष्ट्रीय किंवा जकातदार ह्यांच्यासारखा होवो“ (वचन 17).

आपल्या मुलांना शिस्त लावण्यात वडील कधीही आनंदी नसतात तशीच मंडळीच्या शिस्तीची प्रक्रिया कधीही आनंददायक नसते. कधीकधी, तरीही, कधी कधी चर्च शिस्त आवश्यक आहे. मंडळीच्या शिस्तीचा हेतू क्षुद ्रमनोवृत्ती दाखविणे किंवा पवित्रतेचा दिखावा करणे नव्हे. त्याऐवजी, मंडळीच्या शिस्तीचे उद्दीष्ट म्हणजे देव आणि इतर विश्वासणारे यांच्यासह संपूर्ण सहभागित्वात व्यक्तीचे पुनस्र्थापन करणे. ही शिस्त गुप्तपणे सुरू होते आणि हळूहळू अधिक सार्वजनिक होत जाते. हे त्या व्यक्तीप्रत प्रेमात, देवाच्या आज्ञेने आणि मंडळीतील इतरांसाठी देवाच्या भयास स्मरून केले पाहिजे.

मंडळीच्या शिस्तीसंबंधाने बायबलच्या सूचना मंडळीच्या सदस्यत्वाची गरज सूचित करतात. मंडळी आणि तिचे पाळक लोकांच्या एका निश्चित गटाच्या (स्थानिक मंडळीचे सदस्य) आत्मिक कल्याणासाठी जबाबदार आहेत, शहरातील प्रत्येक जणासाठी नाही. मंडळीच्या शिस्तीच्या संदर्भात पौल विचारतो, कारण जे बाहेर आहेत त्यांचा न्याय करणे माझ्याकडे कोठे आहे? जे आत आहेत त्यांचा न्याय तुम्ही करत नाही काय? (1 करिंथ. 5:12). मंडळीच्या शिस्तीसाठी उम्मेदवाराने मंडळीच्या ”आत“ असले पाहिजे आणि मंडळीस जबाबदार असले पाहिजे. तो ख्रिस्ताठायी विश्वास व्यक्त करतो आणि तरीही नाकारता न येणारे पाप करीत राहतो.

बायबल स्थानिक मंडळीत मंडळीच्या शिस्तीचे उदाहरण देते - करिंथ येथील मंडळी (1 करिंथ. 5:1-13). या उदाहरणात, शिस्तीमुळे बहिष्कार करण्यात आला, और प्रेषित पौल शिस्तीची काही कारणे सांगतो. एक हे आहे की पाप हे खमीरासमान आहे; जर त्यास राहू दिले, तर ते जवळच्या लोकांपर्यंत पसरते अगदी तसेच जसे ”थोडे खमीर सगळा गोळा फुगवते“ (1 करिंथ. 5:6-7). तसेच, पौल स्पष्ट करतो की येशूने आम्हास वाचविले यासाठी की आम्ही पापापासून वेगळे केले जावे, यासाठी की, आपण ”अखमीर“ ठरावे किंवा आत्मिक कुजण्यापासून मुक्त व्हावे (1 करिंथ. 5:7-8). आपली वधु मंडळी हिच्यासाठी ख्रिस्ताची इच्छा ही आहे की तिने शुद्ध आणि पवित्र असावे (इफिस. 5:25-27). अविश्वासणाÚयांपुढे ख्रिस्त येशूची (आणि त्याच्या मंडळीची) देखील साक्ष महत्वाची आहे. जेव्हा दाविदाने बथशेबासोबत पाप केले, तेव्हा त्या पापाच्या परिणामांपैकी एक हे होते की खर्‍या परमेश्वराच्या नावाची परमेश्वराच्या शत्रुंद्वारे निंदा झाली (2 शमुवेल 12:14).

आशा ही आहे की, मंडळी एखाद्या सदस्याविरूद्ध कुठलीही अनुशासनात्मक कार्यवाही करते ती ईश्वरप्रेरित दुःख आणि खरा पश्चाताप उत्पन्न करते. जेव्हा पश्चाताप घडून येतो. जेव्हा पश्चाताप घडून येतो, तेव्हा व्यक्तीस पुन्हा सहभागित्व प्राप्त होते. 1 करिंथ 5व्या अध्यायात सहभागी असलेल्या मनुष्याने पश्चाताप केला, आणि पौलाने नंतर मंडळीस प्रोत्साहन दिले की त्याला मंडळीच्या पूर्ण सहभागित्वात परत स्वीकार करावे (2 करिंथ. 2:5-8). दुःखाची गोष्ट ही आहे की, अनुशासनात्मक कार्यवाही, योग्यप्रकारे आणि प्रेमाने केलानंतरही, नेहमीच पुनस्र्थापन घडवून आणण्यात यशस्वी होत नाही. जेव्हा मंडळीचे अनुशासन पश्चाताप घडवून आणण्यात अयशस्वी ठरते, तेव्हा इतर चांगले हेतू साध्य करण्याची देखील गरज असते, जसे जगात उत्तम साक्ष राखणे.

आम्ही सर्वांनी एका तरुण व्यक्तीचे वर्तन पाहिले आहे ज्याला नेहमीच वाटेल ते करण्याची मोकळी देण्यात आली, आणि कधीही शिस्त लावण्यात आली नाही. ही चांगली गोष्ट नाही. गरजेपेक्षा जास्त परवानगी देणारे आईवडिल प्रेमळ नसतात, कारण मार्गदर्शनाची उणीव मुलाच्या भविष्याचा नाश करते. गैरशिस्त, नियंत्रणबाहî वर्तनामुळे मूल कोणत्याही प्रकारच्या वातावरणात अर्थपूर्ण नाते स्थापन करू शकत नाही आणि उत्तम कार्यसंपादन करू शकत नाही. त्याचप्रमाणे, मंडळीत शिस्त, जरी आनंददायक किंवा सोपी नसली, तरी कधी कधी जरूरी असते. खरे म्हणजे, ती प्रेमपूर्ण असते. आणि परमेश्वराने त्याची आज्ञा दिली आहे.

English



मराठीच्या पहिल्या पानावर वापस या

मंडळीत शिस्तीविषयी बायबल काय म्हणते?
© Copyright Got Questions Ministries