settings icon
share icon
प्रश्नः

बायबल ख्रिस्ती माता असण्याविषयी काय म्हणते?

उत्तरः


आई अथवा माता बनणे ही अत्यंत महत्वाची भूमिका आहे जी प्रभु अनेक स्त्रियांस देण्याची निवड करतो. ख्रिस्ती आईस सांगण्यात आले आहे की तिने आपल्या मुलांवर प्रीती करावी (तीतास पत्र 2:4-5), अंशतः यासाठी की तिने प्रभुचे नाव कलंकित करता कामा नये जिसे नाव ती घेते. मुले प्रभूकडून मिळालेली देनगी आहेत (स्तोत्र 127:3-5). तीताला पत्र 2:4 मध्ये दिलेला, ग्रीक शब्द फिलोटेक्नाॅस आई आपल्या मुलांवर प्रीती करते ह्या संदर्भात दिसून येतो. हा शब्द एक विशेष प्रकारची "आईची प्रीती" दर्शवितो. ह्या शब्दापासून जी कल्पना प्रगट होते ती आहे आमच्या मुलांची काळजी वाहणे, त्यांचे पालनपोषण करणे, त्यांस प्रेमास आलिंगन देणे, त्याच्या गरजा पुरविणे, आणि देवाच्या हातातून मिळणारे अद्वितीय दान म्हणून प्रत्येकाशी कोमलपणे मैत्री करणे.

देवाच्या वचनात ख्रिस्ती मातांस अनेक प्रकारच्या आज्ञा देण्यात आलेल्या आहेतः

उपलब्ध राहणे — सकाळी, दुपारी, आणि रात्री (अनुवाद 6:6-7).

सहभागी होणे — विचारांची देवाणघेवाण करणे, चर्चा करणे, विचार करणे, आणि एकत्र मिळून जीवनाचे संस्करण करणे (इफिसकरांस पत्र 6:4).

शिकविणे — पवित्र शास्त्र आणि बायबलचा विश्व दृष्टिकोण (स्तोत्र 78:5-6; अनुवाद 4:10; इफिसकरांस पत्र 6:4).

प्रशिक्षण देणे — कौशल्याचा विकास करण्यात आणि तिचे/त्याचे गुण (नीतिसूत्रे 22:6) आणि आध्यात्मिक कृपादाने शोधण्यात मुलाची मदत करणे (रोमकरांस पत्र 12:3-8 आणि करिंथकरांस 1 ले पत्र 12)

शिस्त — प्रभूचे भय शिकविणे, सातत्याने, प्रेमाने, खंबीरपणे मर्यादा घालून देणे (इफिसकरांस पत्र 6:4; इब्री लोकांस पत्र 12:5-11; नीतिसूत्रे 13:24; 19:18; 22:15; 23:13-14; 29:15-17).

पोषण करणे — सतत मौखिक समर्थनाचे वातावरण पुरविणे, अयशस्वी होण्याचे स्वातंत्र्य, स्वीकृती, स्नेह, विनाअट प्रेम देणे (तीताला पत्र 2:4; तीमथ्य 2 रे पत्र 1:7; इफिसकरांस पत्र 4:29-32; 5:1-2; गलतीकरासं पत्र 5:22; पेत्राचे 1 ले पत्र 3:8-9).

प्रामाणिकपणाने आदर्श घालून देणे — जे आपण बोलता त्यानुसार जगणे, असा नमूना होणे ज्याद्वारे मुल नीतिमान जीवनाचा सार "उचलून घेण्याद्वारे" शिकू शकते (अनुवाद 4:9, 15 ,23; नीतिसूत्रे 10:9; 11:3; स्तोत्र 37:18, 37).

बायबल असे कधीही म्हणत नाही की प्रत्येक स्त्रीने आई बनावे. तथापि, ते म्हणते की ज्यांस प्रभू आई बनण्याचा आशीर्वाद देतो त्यांनी ती जबाबदारी गंभीरपणे स्वीकार करावी. त्यांच्या मुलांच्या जीवनात आईची एक अद्वितीय आणि महत्वाची भूमिका आहे. आई पण हे एखादे काम किंवा अप्रिय कार्य नव्हे. ज्याप्रमाणे आई गर्भारपणात मुलास वाहून घेते, आणि ज्याप्रमाणे आई मुलाच्या शिशू अवस्थेत मुलास दूध पाजते आणि त्याचा संभाळ करते, त्याचप्रमाणे आयांनी त्यांच्या मुलांच्या जीवनात अखंड भूमिका बजावली पाहिजे, मग ती किशोरावस्थेतील, नवयौवनातील, तरूण प्रौढ, किंवा स्वतःची मुले झालेली प्रौढ मुले का असे नात. मातृत्वाची भूमिका बदलत असतांना आणि तिचा विकास होत असतांना, आईद्वारे दिले जाणारे प्रेम, सांभाळ, पोषण, आणि प्रोत्साहन कधीही बंद करता कामा नये.

English



मराठीच्या पहिल्या पानावर वापस या

बायबल ख्रिस्ती माता असण्याविषयी काय म्हणते?
© Copyright Got Questions Ministries