बायबल ख्रिस्ती पित्यांविषयी काय म्हणते?


प्रश्नः बायबल ख्रिस्ती पित्यांविषयी काय म्हणते?

उत्तरः
शास्त्रातील सर्वात मोठी आज्ञा ही आहे: "तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर पूर्ण मनाने, पूर्ण जिवाने व पूर्ण शक्तीने प्रीती कर" (अनुवाद 6:5). 2रे वचन पुन्हा पाहता, आम्हास वाचावयास मिळते, "त्याचे जे सर्व विधि व आज्ञा मी तुला सांगत आहे त्या तू व तुझे पुत्र-पौत्र ह्यांनी तुझा देव परमेश्वर ह्यांचे भय बाळगून पाळाच्या म्हणजे तू दीर्घायु होशील" अनुवाद 6:5 नंतर आम्ही वाचतो, "ज्या गोष्टी मी तुला आज बजावून सांगत आहे त्या तुझ्या हृदयांत ठसव; आणि त्या तू आपल्या मुलांबाळांच्या मनावर बिंबव; आणि घरी बसलेले असतो, मागनि चालत असता, निजता, उठता त्याविषयी बोलत जा" (वचन 6-7).

इस्राएली इतिहासावरून हे दिसून येते की, आपल्या मुलांना त्यांच्या आध्यात्मिक विकासासाठी आणि कल्याणासाठी प्रभूच्या मार्गांत व वचनांत शिक्षण देण्याबाबत पित्याने तत्पर असावयाचे होते. ज्जो पिता पवित्र शास्त्राच्या आज्ञेप्रत आज्ञाधारक असे तो तसेच करी. यामुळे आम्हीस नीतिसूत्रे 22:6 ची आठवण येते, "मुलाच्या स्थितीस अनुरूप असे शिक्षण त्याला दे, म्हणजे वृद्धपणीही तो त्यापासून परावृत्त होणार नाही" "" हा शब्द पहिले शिक्षण सुचवतो जे आईवडिल आपल्या मुलास देतात, म्हणजे, त्याचे प्रारंभिक शिक्षण. हे प्रशिक्षण मुलांना त्यांच्या जीवनाचा मार्ग स्पष्ट करण्यासाठी तयार केले आहे जो त्यांच्यासाठी ठरविण्यात आला आहे. याप्रकारे मुलाच्या सुरुवातीच्या शिक्षणाची सुरुवात करणे हे अत्यंत महत्वाचे आहे.

इफिसकरांस पत्र 6:4 पित्यास देण्यात आलेल्या सूचनांचा सारांश आहे, जे नकारात्मक आणि सकारात्मक दोन्ही पद्धतीने सांगण्यात आले आहे. "बापानो, तुम्ही आपल्या मुलांना चिरडीस आणू नका; तर प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणांत त्यांना वाढवा." ह्या वचनाचा नकारात्मक भाग हे दर्शवितो की पित्याने त्याच्या कठोरपणामुळे, अन्यायामुळे, पक्षपातामुळे, अधिकाराच्या अनुचित उपयोगामुळे त्याच्या मुलांस नकारात्मक भावना उत्पन्न करू नये. मुलाबाबत कठोर, अनुचित आचरण त्याच्या अंतःकरणात केवळ वाईटास वाढ देईल. "चिरडीस आणणे" ह्या शब्दाचा अर्थ "चीड आणणे, वैतान देणे, उगाच त्रास देणे, अथवा उकसविणे" असा आहे. हे चुकीच्या प्रवृत्तीने आणि चुकीच्या पद्धतीने केले जाते — हुकुमशाही अधिकाराचा कठोरपणा, गैरवाजवीपणा, उग्रता, करारीपणा, क्रूर मागण्या, अनावश्यक निर्बंध, आणि स्वार्थी आग्रह. अशाप्रकारच्या चिथावणीमुळे विपरीत प्रतिक्रिया उत्पन्न होईल, मुलांचे प्रेम समाप्त होईल, पवित्रतेसाठी त्यांची इच्छा कमी होईल, आणि त्यांस असे वाटेल की त्यांस त्यांच्या आईवडिलांस प्रसन्न करणे शक्य नाही. बुद्धिमान आईवडील आज्ञापालनास वांछनीय आणि प्रेम व सौम्यता याद्वारे साध्य बनवितात.

इफिसकरांस पत्र 6:4 चा सकारात्मक भाग व्यापक दिशेत व्यक्त करण्यात आला आहे — त्यांस शिकवण देणे, त्यांचे पालनपोषण करणे, प्रभुची शिकवण आणि उपदेशाद्वारे जीवनाच्या सर्व क्षेत्रासाठी त्यांच्या आचरणात विकास घडवून आणणे. ही शिक्षणाची आणि शिस्तीची संपूर्ण प्रक्रिया आहे. "शिक्षण" हा शब्द मुलास दोषाचे (रचनात्मक पद्धतीने) आणि कर्तव्यांचे (जबाबदार्या) स्मरण घडवून देण्याची कल्पना मांडते.

ख्रिस्ती पिता हा देवाच्या हातातील खरोखर एक साधन आहे. शिक्षा आणि शिस्त हीची संपूर्ण प्रक्रिया अशी असली पाहिजे की ज्याची देवाने आज्ञा केली आहे आणि जी तो देतो, यासाठी की त्याचा अधिकार मुलांचे मन, अंतःकरण, आणि विवेकबुद्धीच्या सतत आणि लगेच संपर्कात आणला जावा. मानवी पित्याने कधीही स्वतःस सत्य आणि कर्तव्य ठरविणारा अंतिम अधिकार म्हणून सादर करता कामा नये. केवळ ज्याच्या अधिकाराने सर्वकार केले जाते त्या देवास शिक्षक आणि अधिकारी बनविण्याद्वारे शिक्षणाचे ध्येय उत्तमप्रकारे साध्य करता येते.

मार्टिन लूथर यांनी म्हटले, "मूल जेव्हा चांगले करेल तेव्हा त्याला देण्यासाठी छडीजवळ सफरचंद ठेवा." शिस्त सतर्क देखरेखीत लावली पाहिजे आणि बहुत प्रार्थनेद्वारे सतत शिक्षण दिले पाहिजे. ताडन, शिस्त, आणि देवाच्या वचनाद्वारे सल्ला, बोल आणि प्रोत्साहन दोन्ही देणे "उपदेशाच्या" मुळाशी असले पाहिजे. शिक्षण जेे प्रभुकडून येते, ते ख्रिस्ती अनुभवाच्या शाळेत शिकले जाते, आणि आईवडिलांद्वारे दिले जाते — मुख्यतः वडिलांद्वारे, पण तसेच, त्याच्या मार्गदर्शनाखाली, आईद्वारे सुद्धा. मुलांनी देवाच्या भय, आईवडिलांच्या अधिकाराबाबत आदर, ख्रिस्ती मानदंडाचे ज्ञान, आणि आत्मसंयमाच्या सवयींत वाढावे म्हणून त्यांस समर्थ बनविण्यासाठी ख्रिस्ती शिस्तीची गरज आहे.

"प्रत्येक परमेश्वरप्रेरित शास्त्रलेख सद्बोध, दोष दाखविणे, सुधारणूक, नीतिशिक्षण ह्याकरिता उपयोगी आहे" (तीमथ्याला 2रे पत्र 3:16-17). पित्याची पहिली जबाबदारी मुलांस पवित्र शास्त्राशी परिचय घडवून देणे ही आहे. देवाचे सत्य शिकविण्यासाठी पिता ज्या साधनांचा व पद्धतींचा उपयोग करतो ती वेगवेगळी असू शकतात. जेव्हा पिता आदर्श घालून देण्याबाबत विश्वासू राहतो, तेव्हा मुले देवाविषयी जे शिकतात ते त्यांस त्यांच्या संपूर्ण पार्थिव जीवनांत उत्तम स्थान देईल, मग ते काहीही का करेनात अथवा कोठेही का जाईनात.

English
मराठीच्या पहिल्या पानावर वापस या
बायबल ख्रिस्ती पित्यांविषयी काय म्हणते?