settings icon
share icon
प्रश्नः

ख्रिस्ती व्यक्तीच्या कर्ज घेण्यासंबंधी बायबल काय म्हणते? ख्रिस्ती व्यक्तीने पैसे उसने घ्यावे किंवा द्यावे काय?

उत्तरः


रोमकरांस पत्र 13:8 मध्ये पौल आम्हास आज्ञा देतो की एकमेकांवर प्रीती करणे ह्याशिवाय कोणाच्याही ऋणांत राहू नये हे ह्या गोष्टीची सामथ्र्याने आठवण करून देते की देवाला सर्व प्रकारच्या कर्जाचा अर्थात ऋणाचा वीट आहे जे वेळेवर चुकविले जात नाही (स्तोत्र 37:21 सुद्धा पाहा). त्याचवेळी, बायबल सर्व प्रकारच्या कर्जांविरुद्ध स्पष्टपणे आज्ञा देत नाही. बायबल आम्हाला कर्जाविरुद्ध ताकीद देते, आणि कर्जात न पडण्याच्या गुणाची प्रशंसा करते, पण कर्ज घेण्याची मनाही नाही. बायबल त्यांच्या कर्जाच्या बंधनात पडलेल्या लोकांची पिळवणूक करणार्या सावकारांच्या दंडाज्ञेविषयी कठोर शब्दांत बोलते, पण कर्जदारास दंड देत नाही.

काही लोक कर्जावर व्याज लावण्यासंबंधी प्रश्न करतात, पण बायबलमध्ये अनेकदा आपण पाहतो की उसने घेतलेल्या पैश्यावर योग्य तो व्याजदर घ्यावा असे अपेक्षित आहे (नीतिसूत्रे 28:8; मत्तय 25:27). प्राचीन इस्राएलात कुठल्याही प्रकारच्या कर्जांवर व्याज लावण्यासंबंधी नियमशास्त्राने मनाई केली होती — जे गरीबांस दिले जात असे (लेवीय 25:35-28). ह्या नियमाचे सामाजिक, आर्थिक, आणि आध्यात्मिक अर्थ असत, पण दोन अर्थांचा उल्लेख करणे विशेषेकरून योग्य ठरेल. पहिले, कायद्याने खरोखर गरीबांची परिस्थिती आणखी वाईट न करण्याद्वारे त्यांची मदत केली. दारिद्र्यात पडणे हे खरोखर वाईट होते, आणि मदत मिळविण्याचा प्रयत्न करणे हे अपमानकारक ठरले असते. पण जर, कर्ज चुकविण्याशिवाय, गरीब व्यक्तीला व्याजाची भक्कम रकम चुकवावी लागली, तर हा उपकार सहायक ठरण्याऐवजी जास्त इजाकारक ठरेल.

दुसरे, नियमशास्त्राने एक महत्वाचा आध्यात्मिक धडा शिकविला. दरिद्री व्यक्तीस दिलेल्या कर्जावर व्याज न लावणे हे उसने देणार्यासाठी दयेचे कार्य ठरेल. ती रकम कर्ज म्हणून दिल्यानंतर त्याला त्या पैशाचा उपयोग करता येणार नाही. तरीही देवाने त्यांच्यावर केलेल्या कृपेसाठी त्याच्या लोकांस "व्याज" न लावण्याद्वारे देवाप्रत त्याच्या दयेसाठी आभार व्यक्त करण्याची ही साकार पद्धत ठरेल. ज्याप्रकारे देवाने आपल्या दयेने इस्राएली लोकांस मिसर देशातून बाहेर काढले आणि जेव्हा त्यांच्याजवळ काहीही नव्हते पण ते निष्कांचन दास होते तेव्हा त्याने त्यांस स्वतःची जमीन दिली (लेवीय 25:38), त्याचप्रमाणे त्याची अपेक्षा होती की त्यांनी देखील त्यांच्या गरीब नागरिकांप्रत तशीच दया व्यक्त करावी.

ख्रिस्ती लोकही सारख्याच परिस्थितीत आहेत. येशूचे जीवन, मृत्यू, आणि पुनरुत्थान यांनीे देवाप्रत आमचे पापाचे कर्ज चुकविले. आता, आम्हास संधी असतांना, त्यांचा त्रास न वाढविता त्यांस कर्ज देऊन, आपण इतर गरजवंताची मदत करू शकतो, विशेषेकरून सोबतच्या विश्वासणार्यांची. येशूने देखील याविषयी दोन सावकारांचा आणि क्षमेविषयी त्यांच्या प्रवृत्तीसंबंधी दाखला दिला (मत्तय 18:23-35).

बायबल पैसे उसने घेण्याची स्पष्टपणे मनाई करीत नाही व त्याकडे दुर्लक्षही करीत नाही. बायबलची बुद्धी आम्हाला हे शिकविते की सामान्यतः कर्जात पडणे हा चांगला विचार नाही. कर्ज मुख्यत्वेकरून आम्हाला कर्ज देणार्या व्यक्तीचा दास बनविते. त्याचवेळी, काही परिस्थितींत कर्ज घेणे हे "जरूरी पाप" ठरते. जोवर आपण शहाणपणाने पैसा हाताळू शकतो आणि कर्ज देणे सोयीस्कर ठरते, तोवर ख्रिस्ती व्यक्ती अत्यंत जरूरी असल्यास आर्थिक कर्जाचे ओझे घेऊ शकतो.

English



मराठीच्या पहिल्या पानावर वापस या

ख्रिस्ती व्यक्तीच्या कर्ज घेण्यासंबंधी बायबल काय म्हणते? ख्रिस्ती व्यक्तीने पैसे उसने घ्यावे किंवा द्यावे काय?
© Copyright Got Questions Ministries