आपण सर्व देवाची मुले आहोत की फक्त ख्रिस्ती आहेत?


प्रश्नः आपण सर्व देवाची मुले आहोत की फक्त ख्रिस्ती आहेत?

उत्तरः
बायबल हे स्पष्ट आहे की सर्व लोक देवाची निर्मिती आहेत (कलस्सै 1:16), आणि देव सर्व जगावर प्रेम करतो (योहान 3:16), परंतु जे नव्याने जन्म घेतात तेच देवाची मुले आहेत (योहान 1:12; 11:52; रोम 8:16; 1 योहान 3:1-10).

पवित्र शास्त्रात, हरवलेल्यांना कधीच देवाची मुले म्हणून संबोधले जात नाही. इफिस 2 आपल्याला सांगते की आपले तारण होण्यापूर्वी आपण “क्रोधाची प्रजा” होतो (इफिस 2:1-3). रोम 9:8 मध्ये असे म्हटले आहे की “म्हणजे देहाद्वारे झालेली मुले देवाची मुले आहेत असे नाही तर अभिवचनानुसार जन्मलेली मुलेच संतान अशी गणण्यात येतात.” देवाची मुले म्हणून जन्म घेण्याऐवजी आपण पापात जन्म घेतो जे आपल्याला देवापासून विभक्त करते आणि देवाचा शत्रू म्हणून सैतानाशी जोडते (याकोब 4:4; योहान 3:8). येशू म्हणाला, “येशूने त्यांना म्हटले, “देव जर तुमचा पिता असता तर तुम्ही माझ्यावर प्रीती केली असती; कारण मी देवापासून निघालो व आलो आहे; मी आपण होऊन आलो नाही, तर त्यानेच मला पाठवले” (योहान 8:42). त्यानंतर योहान 8:44 मधील काही वचनांनंतर येशूने परूश्यांना सांगितले की ते “तुम्ही आपला बाप सैतान ह्यापासून झाला आहात आणि तुमच्या बापाच्या वासनांप्रमाणे करू इच्छिता.” ज्यांचे तारण झाले नाही ते देवाची मुले नाहीत ही वस्तुस्थिती 1 योहान 3:10 मध्ये देखील दिसून येते: “ह्यावरून देवाची मुले व सैतानाची मुले उघड दिसून येतात. जो कोणी नीतीने वागत नाही तो देवाचा नाही, व जो आपल्या बंधूवर प्रीती करत नाही तोही नाही.”

जेव्हा आमचे तारण करतो तेव्हा आपण देवाची मुले होतो कारण येशू ख्रिस्ताबरोबर असलेल्या आपल्या नातेसंबंधातून आपण देवाच्या कुटुंबात दत्तक घेतले जातो (गलती 4: 5-6; इफिस 1:5). हे रोम 8:14-17 सारख्या वचनात स्पष्टपणे दिसून येते: “कारण जितक्यांना देवाचा आत्मा चालवत आहे तितके देवाचे पुत्र आहेत. कारण पुन्हा भीती बाळगावी असा दासपणाचा आत्मा तुम्हांला मिळाला नाही; तर ज्याच्या योगे आपण “अब्बा! बापा!” अशी हाक मारतो असा दत्तकपणाचा आत्मा तुम्हांला मिळाला आहे. तो आत्मा स्वतः आपल्या आत्म्याबरोबर साक्ष देतो की, आपण देवाची मुले आहोत; आणि जर मुले आहोत तर वारसही आहोत, म्हणजे देवाचे वारस, ख्रिस्ताबरोबर सोबतीचे वारस असे आहोत; आपल्याला त्याच्याबरोबर गौरव प्राप्त व्हावा म्हणून त्याच्याबरोबर जर दुःख भोगत असलो तरच.”... ज्यांचे तारण झाले आहे ते “ख्रिस्त येशूवरील विश्वासाच्या द्वारे देवाची मुले” आहेत (गलतीकर 3:26) कारण देवाने “आपल्या मनाच्या सत्संकल्पाप्रमाणे आपल्याला येशू ख्रिस्ताच्या द्वारे स्वतःचे दत्तक होण्याकरता प्रेमाने पूर्वीच नेमले होते” (इफिस 1:5).

English
मराठीच्या पहिल्या पानावर वापस या
आपण सर्व देवाची मुले आहोत की फक्त ख्रिस्ती आहेत?