settings icon
share icon
प्रश्नः

मी देवाचे मूल कसे बनू शकतो?

उत्तरः


देवाचे मूल बनण्यासाठी येशू ख्रिस्ताठायी विश्वासाची गरज आहे. “जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्याना त्याने देवाचे मूल होण्याचा अधिकार दिला” (योहान 1:12).

“आपणास नव्याने जन्म घेतला पाहिजे”

धार्मिक पुढारी निकदेम याने जेव्हा येशूची भेट घेतली, तेव्हा येशूने लगेच त्याला स्वर्गाचे आश्वासन दिले नाही. त्याऐवजी, ख्रिस्ताने त्याला सांगितले की त्याला देवाचे मूल बनले पाहिजे. तो म्हणाला, “मी तुम्हाला खचित सांगतो, नव्याने जन्मल्या वाचून कोणालाही देवाचे राज्य पाहता येत नाही” (योहान 3:3).

पहिल्यांदा व्यक्तीचा जेव्हा जन्म होतो, तेव्हा एदेन बागेत आदामाच्या आज्ञाभंगामुळे मिळालेला पातकी स्वभाव त्याला वारश्याने मिळतो. पाप कसे करावे हे कोणीही मुलास शिकवित नाही. तो स्वाभाविकतः आपल्या स्वतःच्या वाईट इच्छांचे अनुसरण करतो ज्या त्यास खोटे बोलणे, चोरी करणे, आणि घृणा करणे याकडे नेतात. देवाचे मूल बनण्याऐवजी तो आज्ञाभंग व क्रोध यांची संतती ठरतो (इफिस. 2:1-3).

क्रोधाची प्रजा म्हणून, आम्ही नरकात देवापासून विभक्त होण्यास पात्र आहोत. देवाची उपकारस्तुती असो की इफिस. 2:4-5 म्हणते, “तरी देव दया संपन्न आहे म्हणून आपण आपल्या अपराधांमुळे मृत झालेले असतांनाही त्याने आपल्यावरील स्वतःच्या अपरंपार प्रेमामुळे, ख्रिस्ताबरोबर आपणाला जिवंत केले - कृपेने तुमचे तारण झालेले आहे.” ख्रिस्ताबरोबर आपण कसे जिवंत झालो/नवा जन्म घेतला/देवाचे मूल ठरलो? आपण येशूला विश्वासाने स्वीकार केले पाहिजे!

येशूचा स्वीकार करा

“ज्याने त्याचा स्वीकार केला - जे त्याच्याठायी विश्वास ठेवतात - त्यांस त्याने देवाचे मूल बनण्याचा अधिकार दिला आहे” (योहान 1:12). हे वचन स्पष्टपणे समजाविते की देवाचे मूल कसे बनावे. आपण येशूवर विश्वास ठेवण्याद्वारे त्याचे मूल बनू शकतो. आपण येशूविषयी काय विश्वास ठेवला पाहिजे?

सर्वप्रथम, देवाचे मूल हे जाणते की येशू हा परमेश्वराचा सनातन पुत्र आहे जो मनुष्य बनला. पवित्र आत्म्याच्या सामथ्र्याद्वारे कुमारिकेच्या पोटी जन्म घेतल्यामुळे येशूमध्ये आदामाचा पातकी स्वभाव नव्हता. म्हणून, येशूला दुसरा आदाम म्हटले आहे (1 करिंथ. 15:22). आदामाने आज्ञा मोडल्यामुळे जगावर पापाचा श्राप आला, ख्रिस्ताच्या सिद्ध आज्ञाधारकपणमुळे आशीर्वाद आला. आपले उत्तर म्हणजे पश्चाताप करून (पापांपासून परावृत्त होणे) ख्रिस्ताठायी क्षमा प्राप्त करणे होय.

दुसरे म्हणजे, देवाच्या मुलाचा तारणारा म्हणून येशूवर विश्वास आहे. आपल्या पापासाठी आपण पात्र असलेली शिक्षा भोगण्यासाठी आपल्या परिपूर्ण पुत्राला वधस्तंभावर पाठविण्याची देवाची योजना होती: मृत्यू. जे त्याचा स्वीकार करतात त्यांना ख्रिस्ताचा मृत्यू पापाच्या शिक्षेपासून आणि सामथ्र्यापासून मुक्त करतो. त्याचे पुनरुत्थान आपल्याला नीतिमान ठरवते (रोम 4:25).

शेवटी, देवाचा पुत्र येशूला प्रभु म्हणून अनुसरण करतो. ख्रिस्ताला पाप आणि मृत्यूवर विजयी म्हणून उठविल्यानंतर, देवाने त्याला सर्व अधिकार दिला (इफिस 1:20-23). जे येशूचा स्वीकार करतात त्यांचे तो मार्गदर्शन करतो, जे त्याचा नाकार करतात त्यांचा तो न्याय करील (प्रे. कृत्ये 10:42). देवाच्या कृपेने देवाचे मूल या नात्याने नव्या जीवनासाठी आमचा नवा जन्म झाला आहे. केवळ जे लोक येशूचा स्वीकार करतात ते देवाचे मुल बनतात - केवळ त्याच्याविषयी जानने नव्हे तर तारणासाठी त्याच्यावर अवलंबून राहणे, स्वामी म्हणून त्याच्या अधीन राहावे, श्रेष्ठ खजाना म्हणून त्याच्यावर प्रीती करणे.

देवाचे मूल व्हा

ज्याप्रमाणे आपल्या नैसर्गिक जन्मामध्ये आपला भाग नव्हता, त्याचप्रमाणे आपण चांगली कृत्ये करून किंवा स्वतःचा विश्वास वाढवून देवाच्या कुटुंबात जन्म घेऊ शकत नाही. देवच आहे ज्याने आपल्या दयाळू इच्छेनुसार देवाचे मूल होण्याचा आम्हाला “हक्क” दिला. “आपल्याला देवाचंी मुले हे नांव मिळाले ह्यांत पित्याने आपल्याला केवढे प्रीतिदान दिले आहे पाहा; आणि आपण तसे आहोच ह्यामुळे जग आपल्याला ओळखीत नाही, कारण त्याने त्याला ओळखिले नाही.” (1 योहान 3:1) अशा प्रकारे, देवाच्या मुलास अभिमान बाळगण्यासारखे काहीही नाही; त्याचा एकच अभिमान परमेश्वरावर आहे (इफिस 2:8-9)

मूल जेव्हा मोठे होते तेव्हा ते आपल्या पालकांसारखा दिसू लागते. त्याचप्रमाणे, देवाची इच्छा आहे की त्याची मुले येशू ख्रिस्तासारखी अधिकाधिक व्हावीत. जरी केवळ स्वर्गातच आपण परिपूर्ण होऊ, परंतु देवाचे मूल सवय म्हणून आणि पश्चात्ताप न करता पाप करणार नाही. मुलांनो, कोणी तुम्हांस बहकवूं नये; जसा तो नीतिमान् आहे तसा नीतीने चालणाराही नीतिमान् आहे. पाप करणारा सैतानाचा आहे; कारण सैतान प्रारंभापासून पाप करीत आहे. सैतानाची कृत्ये नष्ट करण्यासाठीच देवाचा पुत्र प्रगट झाला. जो कोणी देवापासून जन्मलेला आहे तो पाप करीत नाही; कारण त्याचे बीज त्याच्यामध्ये राहते; त्याच्याने पाप करवत नाही, कारण तो देवापासून जन्मलेला आहे. ह्यावरून देवाची मुले व सैतानाची मुले उघड दिसून येतात. जो कोणी नीतीने वागत नाही तो देवाचा नाही, व जो आपल्या बंधूवर प्रीति करीत नाही तोहि नाही. (1 योहान 3:7-10)

कोणतीही चूक करू नका - पाप केल्यामुळे देवाचे मूल “नाकारले जाऊ” शकत नाही. परंतु जो ख्रिस्ताकडे लक्ष देत नाही आणि त्याचे वचन न ऐकता सतत पापात गुंतून राहतो आणि पापाचा आनंद घेतो तो पुन्हा जन्मला नाही हे उघडकीस येते. येशूने अशा लोकांना सांगितले, “तुम्ही आपला बाप सैतान ह्यापासून झाला आहात आणि तुमच्या बापाच्या वासनांप्रमाणे करू इच्छिता. तो प्रारंभापासून मनुष्यघातक होता आणि तो सत्यात टिकला नाहीय कारण त्याच्यामध्ये सत्य नाही. तो खोटे बोलतो तेव्हा तो स्वतःचे बोलतोय कारण तो लबाड व लबाडीचा बाप आहे.” (योहान 8:44). दुसरीकडे, देवाची मुले, यापुढे पापास संतुष्ट करण्याची इच्छा बाळगत नाही, परंतु आपल्या पित्याला जाणून घेण्याची, प्रेम करण्याची आणि त्याचे गौरव करण्याची इच्छा करतो.

देवाचे मूल होण्याचे प्रतिफळ फार मोठे आहे. देवाचे मूल म्हणून, आम्ही त्याच्या कुटूंबाचा (चर्चचा) एक भाग आहोत, स्वर्गातील घराचे अभिवचन आम्हास मिळाले आहे, आणि आम्हाला प्रार्थनेत देवाकडे जाण्याचा अधिकार दिला आहे (इफिस 2:19; 1 पेत्र 1:3-6; रोम 8:1). पापाबद्दल पश्चात्ताप करण्यासाठी आणि ख्रिस्तावर विश्वास ठेवण्याच्या देवाच्या आवाहनाला प्रतिसाद द्या. आज देवाचे मूल व्हा!

English



मराठीच्या पहिल्या पानावर वापस या

मी देवाचे मूल कसे बनू शकतो?
© Copyright Got Questions Ministries