प्रश्नः
एखाद्या ख्रिस्ती व्यक्तीने विश्वास न ठेवणाऱ्या व्यक्तीसोबत व्यवसाय करावा का?
उत्तरः
एखाद्या ख्रिस्ती व्यक्तीने विश्वास न ठेवणाऱ्या व्यक्तीसोबत व्यवसाय करावा का की नाही हा प्रश्न सामान्य प्रश्न आहे. सर्वात उद्धृत वचन आहे “तुम्ही विश्वास न ठेवणार्यांबरोबर संबंध जोडून विजोड होऊ नका; कारण नीती व स्वैराचार ह्यांची भागी कशी होणार? उजेड व अंधार ह्यांचा मिलाफ कसा होणार?” (2 करिंथ 6:14). कधीकधी हे वचन ख्रिस्ती लोकांना अविश्वासू-ख्रिस्ती लोकांशी विवाह करण्यापासून प्रतिबंध म्हणून घेतेले जाते. विवाह इथे नक्कीच लागू होईल, परंतु लग्नापर्यंत मर्यादित ठेवण्याच्या दृष्टीने काहीही नाही. सर्व प्रकारचे “विषम संबंध”—विवाह, घनिष्ठ मैत्री आणि बर्याच प्रकरणांमध्ये व्यवसाय भागीदारी प्रतिबंधित आहेत.
आज्ञा सुचवते की विश्वासू आणि अविश्वासू यांच्यात एक मोठा फरक अस्तित्वात आहे. सर्वसाधारणपणे सांगायचे तर, एखाद्या ख्रिस्ती व्यक्तीची प्रेरणा, ध्येये आणि पद्धती अविश्वासू व्यक्तींच्या विसंगत असतात. विश्वास माणसाचे चारित्र्य बदलतो. जीवनात ख्रिस्ती लोकांची सर्वोच्च महत्वाकांक्षा म्हणजे प्रभू येशूचे गौरव करणे आणि प्रत्येक गोष्टीत त्याला संतुष्ट करणे; एक अविश्वासू, जास्तीत जास्त, अशा ध्येयांबद्दल उदासीन असतो. जर व्यवसायातील ख्रिस्ती व्यक्तीचे मार्ग आणि ध्येय अविश्वासू व्यक्तीचे मार्ग आणि ध्येयांसारखे असतील तर ख्रिस्ती व्यक्तीला त्याच्या प्राधान्यक्रमांचे पुनर्मूल्यांकन आणि पुनर्विचार करण्याची मोठी गरज आहे.
2 करिंथ 6:14 पुढे विचारतो, “प्रकाशाचा अंधाराशी काय संबंध असू शकतो?” हे लोकांबद्दल सांगितले जाते कि जेव्हा लोक काहीतरी सामायिक करतात (वाटतात) तेव्हा ते “सहकार्याने” असल्याचे म्हटले जाते. व्यवसाय भागीदार अशा प्रकारे एकत्र येतात की त्यांनी गोष्टी सामायिक केल्या पाहिजेत - जे एकाचे आहे ते दुसर्याचेही आहे. “सहकार्य” म्हणजे नेमके हेच. ही तत्त्वे लक्षात घेऊन, व्यवसायात विश्वास न ठेवणाऱ्यांशी एकत्र येणे टाळणे चांगले आहे. जर एखाद्या ख्रिस्ती व्यक्तीला व्यवसायाद्वारे खरोखरच परमेश्वराचा सन्मान करायचा असेल तर अविश्वासू व्यवसाय भागीदाराशी संघर्ष करणे अपरिहार्य आहे. “पूर्वसंकेत केल्याशिवाय दोघे जण एकमेकांबरोबर चालतील काय?” (आमोस 3:3 केजेव्ही).
English
एखाद्या ख्रिस्ती व्यक्तीने विश्वास न ठेवणाऱ्या व्यक्तीसोबत व्यवसाय करावा का?