settings icon
share icon
प्रश्नः

आमचे दोन भाग आहेत अथवा तीन? आम्ही शरीर, प्राण आणि आत्मा आहोत — किंवा शरीर, प्राणात्मा आहोत?

उत्तरः


उत्पत्ती 1:26-27 दर्शविते की देवाने मानवजातीस इतर सर्व प्राण्यांपेक्षा वेगळे उत्पन्न केले, पवित्र शास्त्र स्पष्टपणे शिकविते की मनुष्याची उत्पत्ती यासाठी आहे की त्याने देवाबरोबर घनिष्ठ नाते अनुभव करावे, आणि म्हणून, त्याने आम्हास भौतिक (मूर्त) आणि अभौतिक (आध्यात्मिक) पैलूंचा ऐक्याने घडविले आहे (उपदेशक 12:7; मत्तय 10:18; 1 करिंथ 5:5; 2 करिंथ 4:16; 7:1; याकोब 2:26). मानवाचा भौतिक घटक स्पष्टपणे मूर्त आणि ऐहिक आहेः भौतिक, शरीर अभौतिक पैलू निराकार अथवा अमूर्त आहेत. प्राण, आत्मा, बुद्धी, इच्छा, विवेक, मन, भावना, इत्यादी. यांचे अस्तित्व अंतहीनपणे भौतिक शरीराच्या आयुर्मानापलीकडे आहे.

प्रत्येक मानवप्राण्याजवळ भौतिक (मूर्त) आणि अभौतिक (आध्यात्मिक) गुण आहे. प्रत्येक व्यक्तीजवळ भौतिक शरीर आहे. तथापि, मानवजातीच्या अभौतिक, अमूर्त गुणांसंबंधी बरेचदा वाद घातला जातो. पवित्र शास्त्र याविषयी काय म्हणते? उत्पत्ती 2:7 म्हणते की मनुष्यास "जीवधारी प्राणी" असे घडविण्यात आले. (केजेव्ही) गणना 16:22 परमेश्वर देवास "सर्व देहधारी आत्म्यांचा देव" हे नाव देते (ई.एस.व्ही.) नीतिसूत्रे 4:23 आम्हास म्हणते, "सर्व रक्षणीय वस्तूंपेक्षा आपल्या अंतःकरणाचे विशेष रक्षण कर, कारण त्यात जीवनाचा उगम आहे," ज्याद्वारे असे दिसून येते की हृदय (मायोकार्डियम नव्हे) मनुष्याच्या इच्छा आणि भावनांस केंद्रीभूत आहे. प्रेषितांचे कृत्ये 23:1 या वचनात पौल विवेकबुद्धीचा उल्लेख मनाचा असा भाग म्हणून करते जो आम्हास बरोबर आणि चूक म्हणून जाणीव करून देते. रोमकरांस पत्र 12:2 नवीनीकृत बुद्धीच्या परिवर्तक सामथ्र्याविषयी सांगते. ही, आणि इतर असंख्य वचने, मानवजातीच्या आध्यात्मिक घटकाच्या विविध पैलूंचा उल्लेख करतात. आपण भौतिक आणि अभौतिक दोन्हीं गुणांचा एकीकृत संयोग आहोत.

कुठल्या ना कुठल्याप्रकारे, प्राण, आत्मा, भावना, विवेकबुद्धी, इच्छा, आणि मन परस्पर निगडित आणि परस्पर सम्बद्ध आहेत. कदाचित प्राणात्मा हा इतर सर्व अभौतिक मानव पैलूंच्या संयोगाने बनलेला आहे. हे लक्षात घेता, मानवजात ही द्विभाजन ("दोन घटकांत विभागलेली") आहे अथवा त्रिभाजन ("तीन घटकांत विभागलेली") आहे? दुसर्या शब्दांत, आम्हास दोन भाग आहेत (देह आणि प्राणात्मा) किंवा तीन भाग आहेत (शरीर, प्राण, आणि आत्मा)? अनेक शतके धर्मपंडितांचे ह्या विषयावर मतभेद आहेत, आणि कोणती गोष्ट खरी आहे याविषयी कधीही निर्णायक सनातन घोषणा झालेली नाही.

जे पवित्र शास्त्रावर विश्वास ठेवितात ते असे शिकवितात की मनुष्य हा द्विभाजन आहे, जे मनुष्यास दो भागांनी मिळून बनलेले पाहतात: शरीर आणि प्राण. ह्या द्विभाजनासंबंधी दोन सामान्य मते आहेत. पहिले मत हे आहे की मनुष्य हा संयुक्त देह आणि आत्मा आहे जो दोन्हीं मिळून जीवंत प्राणी बनतो. मनुष्याचा प्राण हा आत्मा आणि शरीर आहे जो मिळून एक व्यक्ती बनतो. या मतास उत्पत्ती 2:7; गणना 9:13; स्तोत्र 16:10; 97:10 आणि योना 4:8 द्वारे समर्थन मिळते. हा दृष्टिकोण या गोष्टीवर जोर देतो की ह्या वचनांतील हिब्रू शब्द नेफेश एकात्म अर्थात एकीकृत प्राण्याचा, जीवंत व्यक्तीचा, जीवनाचा, अथवा स्वचा उल्लेख करतो — अर्थात, शरीर आणि आत्मा यांनी बनलेला एकात्म व्यक्ती (प्राण). येथे हे लक्षात ठेवण्यासारखे आहे की, जेव्हा बायबल रूआच ("श्वास, हवा, किंवा आत्मा") शरीरापासून वेगळे होत असल्याचे सांगते, तेव्हा व्यक्ती विघटित (भग्न) होतो — मृत (उपदेशक 12:7; स्तोत्र 104:29; 146:4).

दुसरे द्विभाजन मत हे आहे की आत्मा आणि प्राण दोन वेगवेगळी नावे असलेली एकच गोष्ट आहे. हे मत हîा तथ्यावर भर देते की आत्मा आणि प्राण ह्या शब्दांचा उपयोग बरेचदा आलटून पालटून केला जातो (लूक 1:46-47; यशया 26:9; मत्तय 6:25; 10:28, 1 करिंथ. 5:3, 5) आणि त्यांस प्रत्येक व्यक्ती अंतर्गत असलेल्या समान आध्यात्मिक वास्तविकतेचा उल्लेख करणारे समानार्थी शब्द म्हणून समजले गेले पाहिजे. म्हणून, द्विभाजन मत असे प्रतिपादन करते की मनुष्य हा दोन भागांनी अथवा घटकांनी बनला आहे. मनुष्य एक तर शरीर आणि आत्मा आहे, ज्याने प्राण बनतो, किंवा शरीर आणि प्राणात्मा आहे.

जे पवित्र शास्त्रावर विश्वास ठेवितात ते असे शिकवितात की मनुष्य हा त्रिभाजन आहे, मनुष्यास तीन वेगवेगळ्या भागांनी बनलेले पाहतात: शरीर, प्राण, आणि आत्मा. ते 1 थेस्सल 5:23 आणि इब्री 4:12 यावर जोर देतात, जे आत्मा आणि प्राण यांत फरक करीत असलेले दिसून येतात. जे द्विभाजनावर विश्वास ठेवितात ते याचा विरोध करीत म्हणतात की, जर 1 थेस्सल 5:23 हे त्रिभाजन शिकवित असेल, तर, त्याच व्याख्याशास्त्राद्वारे, मार्क 12:30 चतुर्भाजन शिकविते का?

शेवटी द्विभाजन आणि त्रिभाजन यांच्यात ठरविणे महत्वाचे आहे काय? कदाचित नाही; तथापि, सावधगिरीचा शब्द योग्य ठरेल. त्रिभाजनवादी लोकांचे मत व्यक्तीठायी असलेल्या परस्पर एकतेचे महत्व कमी करते, म्हणून काही लोकांनी चुकीने असे शिकविले आहे की देव आमच्या आत्म्यांशी रहस्यमयरित्या संवाद साधतो आणि आमच्या बुद्धीकडे दुर्लक्ष करतो. ह्याच चुकीच्या गृहीताच्या आधारे, काही मंडळ्या ख्रिस्ती लोकांच्या भूतग्रस्त होण्याच्या शक्यतेविषयी शिकवण देत असतांना त्रिभाजन मताचा उपयोग करतात. कारण ते प्राण आणि आत्मा यांस ख्रिस्ती व्यक्तीमधील दोन वेगळे अमूर्त पैलू समजतात, म्हणून ते असे गृहीत धरतात की एकाठायी पवित्र आत्मा वास करू शकतो आणि दुसरा दुरात्म्यांच्या शक्तींद्वारे पछाडला जाऊ शकतो. ही शिकवण चुकीची आहे कारण यासाठी कोणतेही बायबल संदर्भ दिलेले नाहीत की ज्यांच्याठायी पवित्र आत्मा वसतो ते त्याच वेळी दुरात्म्याने पछाडले जाऊ शकतात.

English



मराठीच्या पहिल्या पानावर वापस या

आमचे दोन भाग आहेत अथवा तीन? आम्ही शरीर, प्राण आणि आत्मा आहोत — किंवा शरीर, प्राणात्मा आहोत?
© Copyright Got Questions Ministries