प्रश्नः
संततीनियमनाविषयी बायबल काय म्हणते? ख्रिस्ती लोकांनी संततीनियमनाच्या अर्थात गर्भनिरोधाच्या साधनांचा उपयोग करणे योग्य आहे का?
उत्तरः
देवाने मानवास आज्ञा दिली होती "फलदू्रप व्हा, बहुगुणित व्हा" (उत्पत्ती 1:28). देवाकडून मुलांस जन्म देण्यासाठी आणि वाढविण्यासाठी एक स्थिर वातावरण म्हणून देवाने विवाहसंस्थेची स्थापना केली. दुःखाची गोष्ट म्हणजे आजच्या दिवसांत मुलांना कधी कधी एक उपद्रव आणि एक ओझे मानले जाते. ते लोकांच्या व्यवसायमार्गात आणि आर्थिक उद्दीष्टांच्या मार्गात अडखळण म्हणून उभे राहतात, आणि सामाजिकदृष्ट्या ते "स्वाभाविकरित्या योग्य असे जीवन जगू शकत नाहीत." बरेचदा, अशाप्रकारचा स्वार्थीपणा हा गर्भनिरोधकाच्या उपयोगाच्या मुळाशी असतो.
काही गर्भनिरोधकांच्या वापरण्यामागील स्वार्थतेच्यापिरीत, बायबल मुलांना देवाची देणगी म्हणून सांगते (उत्पत्ती 4:1; उत्पत्ती 33:5). मुले परमेश्वराने दिलेले धन आहेत (स्तोत्र 127:3-5). मुले देवाकडून आशीर्वाद आहेत (लूक 1:42). मुले वृद्धांचा मुकुट आहेत (नीतिसूत्रे 17:6). तो वांझ स्त्रीला मुले देऊन आशीर्वादित करतो (स्तोत्र 113:9; उत्पत्ती 21:1-3; 25:21-22; 30:1-2; 1 शमुवेल 1:6-8; लूक 1:7, 24-25). देव गर्भाशयात मुलांस घडवितो (स्तोत्र 139:13-16). देव मुलांच्या जन्माच्या आधीच त्यास जाणतो (यिर्मया 1:5; गलतीकरांस पत्र 1:15).
संततीनियमनाचा विशेषरित्या निषेध करणारे सर्वात जवळचे वचन आहे उत्पत्ती 38, ज्यात यहूदाची मुले एर आणि ओनान यांचा वृत्तांत आहे. एरने तामार नावाच्या एका स्त्रीशी लग्न केले, पण तो परमेश्वराच्या दृष्टीने दुष्ट होता म्हणून त्याने त्याला ठार केले, आणि तामार ही पतीवाचून आणि निपुत्रिक राहिली. अनुवाद 25:5-6 मधील देवरविवाहाच्या कायद्यानुसार, तामारचे लग्न एरचा भाऊ, ओनान याच्याशी लावण्यात आले. ओनान त्याच्या भावाच्या नावाने जन्म घेणार्या कोणत्याही मुलाला आपल्या संपत्तीचा वाटेकरी करू इच्छित नव्हता, म्हणून त्याने गर्भनिरोधाच्या सर्वात जुन्या पद्धतीचा उपयोग केला, अवरूद्ध संभोग. उत्पत्ती 38:10 म्हणते, "हे त्याचे कृत्य परमेश्वरास दुष्टपणाचे वाटल्यावरून, त्याने त्यालाही मारून टाकले." ओनानचा हेतू स्वार्थी होता: त्याने तामारला स्वतःच्या सुखभोगासाठी वापरले, परंतु त्याने आपल्या मृत भावाचा वारस उत्पन्न करण्याचे कायदेशीर कर्तव्य करण्यास नाकार दिला. हा परिच्छेद बरेचदा पुरावा म्हणून वापरला जातो की देव गर्भनिरोधकाची मान्यता देत नाही. तथापि, हे स्पष्टपणे गर्भनिरोधाचे कृत्य नव्हते ज्यामुळे प्रभुने ओनानला मारून टाकले; त्या कृतीमागे ओनानचे स्वार्थी हेतू होते ज्यामुळे असे घडले.
जसा देव मुलांकडे पाहतो त्या दृष्टीने त्यांच्याकडे पाहणे महत्वाचे आहे, जग पाहते तसे पाहणे नाही. असे म्हटल्यानंतर हे सांगता येईल की, बायबल गर्भनिरोध करण्याची मनाई करीत नाही. व्याख्येच्या दृष्टीने, गर्भनिरोध, हे गर्भधारणाच्या विरुद्ध आहे. गर्भनिरोधाचे कृत्य ते चूक आहे किंवा बरोबर हे ठरवीत नाही. आपण ओनानपासून शिकलो की, गर्भनिरोधामागील हेतू ते बरोबर आहे की चूक ते ठरवितो. जर विवाहित दाम्पत्य स्वतःस अधिक प्राप्त व्हावे म्हणून गर्भनिरोध करीत असेल, तर ते चुकीचे आहे. जर दाम्पत्य ते परिपक्व होईपर्यंत आणि आर्थिकरित्या व आध्यात्मिकरित्या आणखी तयार होईपर्यंत जर तात्पुरता गर्भनिरोधकाचा वापर करीत असेल, तर काही काळपर्यंत गर्भनिरोधकाचा उपयोग करणे कदाचित मान्य ठरेल. पुन्हा, येथे त्यामागील प्रेरणेची बाब येते.
बायबल नेहमी मुलांना जन्म देणे ही चांगली गोष्ट असल्याचे संागते. पती व पत्नीला मुले व्हावीत अशी बायबल "अपेक्षा" करते. मुलांस जन्म देता न येणे बायबलमध्ये नेहमीच दुःखाचे मानले गेले आहे. बायबलमध्ये असे कोणीही नाही ज्याने त्याला मुले नकोत अशी इच्छा व्यक्त केली. त्याचवेळी, बायबलच्या आधारे असा युक्तिवाद केला जाऊ शकत नाही की मर्यादित काळासाठी संततीनियमनाच्या साधानाचा वापर करणे चुकीचे आहे. सर्व विवाहित जोडप्यांनी त्यांनी केव्हा मुलांस जन्म देण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्यांना किती मुले ठेवण्याचा प्रयत्न करावा याबाबतीत देवाची इच्छा जाणून घेण्याचा प्रयत्न करावा.
English
संततीनियमनाविषयी बायबल काय म्हणते? ख्रिस्ती लोकांनी संततीनियमनाच्या अर्थात गर्भनिरोधाच्या साधनांचा उपयोग करणे योग्य आहे का?