settings icon
share icon
प्रश्नः

बायबलच्या त्रुटीहीनतेवर विश्वास ठेवणे का महत्वाचे आहे?

उत्तरः


आम्ही अशा काळात जगत आहोत जेव्हा त्रुटीचा सामना करावा लागतो तेव्हा लोक आपले खांदे झटकतात. पिलातांप्रमाणे, असे विचारण्याऐवजी की “सत्य काय आहे?” उत्तर आधुनिक मनुष्य म्हणतो, “काहीही सत्य नाही” किंवा कदाचित “सत्य आहे, परंतु आपण ते जाणू शकत नाही.” आपल्याला खोटे बोलण्याची सवय झाली आहे आणि बायबलमध्येसुद्धा चुका आहेत या खोट्या कल्पनेत बरेच लोक निश्चिंत अनुभव करतात.

बायबलच्या त्रुटीहीनतेचा सिद्धांत अत्यंत महत्त्वाचा आहे कारण सत्य महत्त्वाचे आहे. हा मुद्दा देवाच्या स्वभावास प्रतिबिंबित करतो आणि बायबलद्वारे शिकवलेल्या सर्व गोष्टींबद्दल आपल्या समजबुद्धीचा पाया आहे. बायबलच्या त्रुटीहीनतेवर आपण पूर्णपणे विश्वास का ठेवला पाहिजे याची काही कारणे येथे आहेत:

बायबल स्वतःच परिपूर्ण असल्याचा दावा करते. “परमेश्वराची वचने शुद्ध वचने आहेत; भट्टीत सात वेळा शुद्ध करून जमिनीवरील मुशीत ओतलेल्या रुप्यासारखी ती आहेत” (स्तोत्र 12:6). “प्रभूचे नियमशास्त्र परिपूर्ण आहे” (स्तोत्र 19:7). “ईश्वराचे प्रत्येक वचन शुद्ध आहे” (नीतिसूत्रे 30:5 केजेव्ही). शुद्धता आणि परिपूर्णतेचे हे दावे निरपेक्ष विधान आहेत. लक्षात घ्या की हे देवाचे वचन “मुख्यतः” शुद्ध आहे किंवा पवित्र शास्त्र “जवळजवळ” परिपूर्ण आहे असे म्हणत नाही. बायबलमध्ये संपूर्ण परिपूर्णतेचा युक्तिवाद आहे आणि “अर्धवट परिपूर्ण” सिद्धांतांना जागाच नाही.

2. बायबल संपूर्णपणे त्याच्या स्वतःच्या यशावर अवलंबून आहे. एखाद्या मोठ्या वर्तमानपत्रात जर नियमितपणे त्रुटीं आढळून आल्या असत्या तर त्याची लवकरच बदनामी होईल. “सर्व चुका फक्त पृष्ठ तीनपर्यंत मर्यादित आहेत” असे म्हटल्याने काही फरक पडणार नाही. वर्तमानपत्र त्याच्या कोणत्याही भागावर विश्वासार्ह असावे म्हणून तर ते संपूर्ण तथ्यात्मक असले पाहिजे. त्याचप्रमाणे, बायबल भूगर्भशास्त्राविषयी बोलताना चूक करीत असेल तर त्याच्या धर्मशास्त्रांवर विश्वास का ठेवला पाहिजे? हे एकतर विश्वासार्ह दस्तावेज आहे, किंवा ते तसे नाही.

3. बायबल हे त्याच्या लेखकाचे प्रतिबिंब आहे. सर्व पुस्तके आहेत. बायबल स्वतः देवाने लिहिले होते जेव्हा त्याने मानवी लेखकांद्वारे “प्रेरणा” नावाच्या प्रक्रियेत काम केले. “प्रत्येक शास्त्रलेख परमेश्वरप्रेरित आहे” (2 तीमथ्य 3:16). 2 पेत्र 1:21 आणि यिर्मया 1:2 देखील पहा.

आपला असा विश्वास आहे की ज्याने या विश्वाची निर्मिती केली आहे तो पुस्तक लिहिण्यास सक्षम आहे. आणि परिपूर्ण देव एक परिपूर्ण पुस्तक लिहिण्यास सक्षम आहे. हा मुद्दा फक्त “बायबलमध्ये चूक आहे काय?” असा नाही, पण “देव चूक करू शकतो का?” असा आहे. बायबलमध्ये तथ्यात्मक चुका असतील तर देव सर्वज्ञ नाही आणि स्वतः चुका करण्यास सक्षम आहे. बायबलमध्ये चुकीची माहिती असेल तर देव सत्यवादी नाही तर लबाड आहे. बायबलमध्ये विरोधाभास असल्यास, देव गोंधळाचा कर्ता आहे. दुसर््या शब्दांत, जर बायबलची त्रुटीहीनता सत्य नसेल तर देव देव नाही.

4. बायबल आमची पारख करते, आम्ही नाही. “कारण देवाचे वचन...मनातील विचार व हेतू ह्यांचे परीक्षक असे आहे” (इब्री लोकांस 4:12). “मन” आणि “वचन” यांच्यातील संबंध पहा. वचन परीक्षण करते; मनाचे परीक्षण केले जात आहे. कोणत्याही कारणास्तव वचनाचे काही भाग वगळणे म्हणजे ही प्रक्रिया उलट करणे होय. आम्ही परीक्षक होतो आणि वचन आपल्या “उत्कृष्ट अंतर्दृष्टी” पुढे सादर केले जातेे. तरीही देव म्हणतो, “हे मानवा, देवाला उलटून बोलणारा तू कोण?” (रोम 9:20).

5. बायबलचा संदेश संपूर्णपणे स्वीकारला पाहिजे. हे शिकवणींचे मिश्रण नाही जे निवडण्यासाठी आपण मोकळे आहोत. देव त्यांच्यावर प्रेम करतो असे म्हणणारी वचने अनेक लोकांना आवडतात, पण देव पाप्यांचा न्याय करील असे म्हणणे त्यांना आवडत नाही. परंतु बायबलमध्ये आपल्याला काय आवडते ते आम्ही निवडू शकत नाही आणि बाकीचे टाकून देऊ शकत नाही. उदाहरणार्थ, जर नरकाबद्दल बायबल चुकीचे असेल, तर स्वर्गाविषयी - किंवा इतर कशाबद्दलही ते बरोबर आहे असे कोण म्हणू शकेल? बायबलमध्ये सृष्टीविषयीचे तपशील योग्य न मिळाल्यास तारणाविषयीच्या तपशिलांवरही विश्वास ठेवला जाऊ शकत नाही. जर योनाची गोष्ट एक मिथक असेल तर कदाचित येशूची गोष्ट देखील आहे. याउलट, देव जे बोलला आहे ते तो बोलला आणि बायबलमध्ये देव कोण आहे याबद्दलचे संपूर्ण चित्र दिले आहे. “हे परमेश्वरा, तुझे वचन स्वर्गात सर्वकाळ स्थिर आहे” (स्तोत्र 119:89).

6. विश्वास आणि सराव यासाठी बायबल हा आपला एकमेव नियम आहे. जर ते विश्वासार्ह नसेल तर आपण आपला विश्वास कशावर आधारित आहे? येशू आपल्या विश्वासाची मागणी करतो, आणि यामध्ये तो आपल्या वचनात जे म्हणतो त्यावर विश्वास ठेवणे येते. योहान 6:67-69 एक सुंदर परिच्छेद आहे. येशूचे अनुसरण करण्याचा दावा करणार्या अनेकांना येशूने नुकतेच जातांना पाहिले होते. मग तो बारा प्रेषितांकडे वळून विचारतो, “तुमचीही निघून जाण्याची इच्छा आहे काय?” यावर पेत्राने इतरांच्या वतीने उत्तर दिले, “प्रभूजी, आम्ही कोणाकडे जाणार? सार्वकालिक जीवनाची वचने आपणाजवळ आहेत.“ परमेश्वरावर आणि त्याच्या जीवनाच्या वचनांवर आपणही असाच विश्वास ठेवू या.

आम्ही येथे जे काही सादर केले आहे त्यास खर्या विद्वत्तेचा नकार म्हणून घेऊ नये. बायबलच्या त्रुटीहीनतेचा अर्थ असा नाही की आपण आपल्या मनाचा वापर करणे थांबवले पाहिजे किंवा आंधळेपणाने बायबल जे म्हणत आहे ते स्वीकारले पाहिजे. आम्हाला वचनाचा अभ्यास करण्याची आज्ञा देण्यात आली आहे (2 तीमथ्य 2:15) आणि जे लोक त्याचा शोध घेतात त्यांची प्रशंसा करण्यात आली आहे (प्रेषितांची कृत्ये 17:11). तसेच, आम्ही ओळखतो की बायबलमध्ये अवघड परिच्छेद आहेत, तसेच त्याचा अर्थ लावण्याविषयी प्रामाणिक मतभेद आहेत. आमचे ध्येय श्रद्धापूर्वक आणि प्रार्थनापूर्वक पवित्र शास्त्राकडे जाणे हे आहे आणि जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट समजली नाही तेव्हा आपण आग्रहाने प्रार्थना करतो, अधिक अभ्यास करतो आणि - जर उत्तर अद्याप मिळत नसेल तर - देवाच्या परिपूर्ण वचनाच्या समक्षतेत नम्रपणे आपण आपल्या स्वतःच्या मर्यादा कबूल करतो.

English
मराठीच्या पहिल्या पानावर वापस या

बायबलच्या त्रुटीहीनतेवर विश्वास ठेवणे का महत्वाचे आहे?
© Copyright Got Questions Ministries