बापतिस्म्याद्वारे नवा जन्म म्हणजे काय?


प्रश्नः बापतिस्म्याद्वारे नवा जन्म म्हणजे काय?

उत्तरः
बाप्तिस्म्याद्वारे नवा जन्म हा विश्वास आहे की तारण प्राप्त करण्यासाठी व्यक्तीस बाप्तिस्मा घेणे आवश्यक आहे. आमचा वाद हा आहे की बाप्तिस्मा हा ख्रिस्ती व्यक्तीसाठी आज्ञाधारकपणाचे महत्त्वाचे पाऊल आहे, पण बाप्तिस्मा हा तारणासाठी आवश्यक आहे या गोष्टीचा आपण नाकार करतो. आमचा असा पक्का विश्वास आहे की प्रत्येक व्यक्तीने बुडवून पाण्याचा बाप्तिस्मा घेतला पाहिजे. बाप्तिस्मा ख्रिस्ताचा मृत्यू, त्याचे गाडले जाणे आणि पुनरुत्थान यात विश्वासणाऱ्याची समानता दर्शवितो. रोम 6:3-4 घोषणा करते की, “किंवा आपण जितक्यांनी ख्रिस्त येशूमध्ये बाप्तिस्मा घेतला तितक्यांनी त्याच्या मरणात बाप्तिस्मा घेतला, ह्याविषयी तुम्ही अजाण आहात काय? तर मग आपण त्या मरणातील बाप्तिस्म्याने त्याच्याबरोबर पुरले गेलोय ह्यासाठी की, ज्याप्रमाणे ख्रिस्त पित्याच्या गौरवाने मेलेल्यांतून उठला त्याचप्रमाणे आपणही नवीन प्रकारच्या जीवनात चालावे.” पाण्यात बुडविण्याची कृती ख्रिस्तासोबत मरणे व गाडले जाणे समजाविते. पाण्यातून बाहेर पडण्याची कृती ख्रिस्ताच्या पुनरूत्थानाचे चित्रण आहे.

तारणासाठी येशू ख्रिस्तावरील विश्वासाव्यतिरिक्त कशाचीही आवश्यकता एक कर्मावर आधारित तारण आहे. सुवार्तेमध्ये काहीही जोडणे म्हणजे असे म्हणणे आहे की येशूचा वधस्तंभावरचा मृत्यू हा आपले तारण विकत घेण्यासाठी पुरेसा नव्हता. आपले तारण मिळविण्यासाठी बाप्तिस्मा घेणे आवश्यक आहे असे म्हणणे म्हणजे आपणास तारण मिळविण्यासाठी ख्रिस्ताच्या मृत्यूत आपली स्वतःची चांगली कामे आणि आज्ञाधारकपणा जोडला पाहिजे. केवळ येशूच्या मृत्यूने आपल्या पापांची किंमत चुकविली (रोम 5:8; 2 करिंथ 5:21). आमच्या पापांसाठी येशूच्या मृत्यूने दिलेली किंमत “विश्वासाने” आमच्या “खात्यात” जोडली गेली आहे (योहान 3:16; प्रेषितांची कृत्ये 16:31; इफिस 2:8-9). म्हणूनच, तारणानंतर बाप्तिस्मा हे आज्ञापालनाची ही एक महत्त्वाची पायरी आहे परंतु तारणासाठी ती अट असू शकत नाही.

होय, अशी काही वचने आहेत जी बाप्तिस्म्यास तारणासाठी आवश्यक असल्याचे सूचित करतात. तथापि, बायबलमध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की केवळ विश्वासाने तारण प्राप्त झाले आहे (योहान 3:16; इफिस 2:8-9; तीत 3:5), त्या वचनांचे भिन्न अर्थ असू शकतात. पवित्र शास्त्र शास्त्रवचनाचे खंडन करीत नाही. बायबलच्या काळात, ज्या व्यक्तीने एका धर्मातून दुसऱ्या धर्मात प्रवेश केला त्या व्यक्तीची ओळख म्हणून बापतिस्मा दिला जात असे. बाप्तिस्मा म्हणजे निर्णय घेण्याचे साधन होते. जे बाप्तिस्मा घेण्यास नकार देत ते खरोखर विश्वास ठेवत नाहीत असे म्हटले जाई. म्हणून, प्रेषितांच्या आणि आरंभीच्या शिष्यांच्या मनात, बाप्तिस्मा न घेणार््या विश्वासणार्यांची कल्पना ऐकिवात नव्हती. जेव्हा एखादा व्यक्ती ख्रिस्तावर विश्वास ठेवल्याचा दावा करीत असे, परंतु सार्वजनिकपणे आपला विश्वास जाहीर करण्यास लाजत असे त्यावरून असे दिसून येई की त्याला खरा विश्वास नसल्याचे दर्शवित असे.

जर तारणासाठी बाप्तिस्मा करणे आवश्यक आहे तर पौलाने असे का म्हटले असते की, “क्रिस्प व गायस ह्यांच्याशिवाय तुमच्यापैकी कोणाचाही बाप्तिस्मा मी केला नाही, म्हणून मी देवाचे आभार मानतो” (1 करिंथ 1:14)? त्याने असे का म्हटले असेल की, “कारण ख्रिस्ताने मला बाप्तिस्मा करण्यास नव्हे तर सुवार्ता सांगण्यास पाठवले; पण ख्रिस्ताचा वधस्तंभ व्यर्थ होऊ नये म्हणून ती वाक्चातुर्याने सांगण्यास पाठवले नाही” (1 करिंथ 1:17)? हे खरे आहे की या परिच्छेदात पौलाने करिंथच्या मंडळीला फूट पडण्याविरूद्ध वाद घातला होता. तथापि, जर तारणासाठी बापतिस्मा आवश्यक असेल तर पौल असे कसे म्हणू शकेल की, “...तुमच्यापैकी कोणाचाही बाप्तिस्मा मी केला नाही, म्हणून मी देवाचे आभार मानतो” “कारण ख्रिस्ताने मला बाप्तिस्मा करण्यास ...पाठवले नाही?” जर बापतिस्मा तारणासाठी आवश्यक असता, तर पौल अक्षरशः म्हणाला असता, “मी देवाचे आभार मानतो की तुमचे तारण झाले नाही.“ आणि “देवाने मला तारण देण्यासाठी पाठविले नाही...”

पौलाचे अशाप्रकारचे विधान करणे अत्यंत हास्यास्पद ठरेेल. पुढे, जेव्हा पौल सुवार्तेची (2 करिंथ 15:1-8) सविस्तर रूपरेषा मांडतो तेव्हा तो बाप्तिस्म्याचा उल्लेख करण्याकडे दुर्लक्ष का करतो? जर तारणासाठी बाप्तिस्मा घेणे आवश्यक असेल तर सुवार्तेच्या कोणत्याही सादरीकरणामध्ये बाप्तिस्म्याचा उल्लेख नसावा कसे असू शकेल?

बाप्तिस्म्याद्वारे नवा जन्म ही बायबलसंबंधी संकल्पना नाही. बाप्तिस्मा पापापासून वाचवित नाही परंतु वाईट विवेकापासून वाचवितो. १ पेत्र 3:21 मध्ये, पेत्राने स्पष्टपणे शिकवले की बाप्तिस्मा म्हणजे शारीरिक शुध्दीकरणाची औपचारिक कृती नव्हती, तर देवाप्रत चांगल्या विवेकाचे अभिवचन आहे. बाप्तिस्मा म्हणजे ख्रिस्तावर तारणारा म्हणून विश्वास ठेवणाऱ्याच्या अंतःकरणात आणि जीवनात जे काही आधीच घडले आहे त्याचे प्रतीक आहे (रोम 6:3-5; गलती 3:27; कलस्सै 2:12). बाप्तिस्मा हेे आज्ञाधारकपणाचे पाऊल आहे जे प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीने उचलणे आवश्यक आहे. बाप्तिस्मा म्हणजे तारणाची अट असू शकत नाही. त्यास असे ठरविणे हा येशू ख्रिस्ताच्या मृत्यू आणि पुनरुत्थानाच्या पर्याप्ततेवर हल्ला आहे.

English
मराठीच्या पहिल्या पानावर वापस या
बापतिस्म्याद्वारे नवा जन्म म्हणजे काय?