settings icon
share icon
प्रश्नः

बापतिस्म्याची योग्य पद्धत काय आहे?

उत्तरः


या प्रश्नाचे सर्वात सोपे उत्तर “बाप्तिस्मा” या शब्दाच्या अर्थात सापडते. हा ग्रीक शब्दापासून आला आहे ज्याचा अर्थ आहे “पाण्यात बुडवणे”. म्हणून, शिंपडण्याद्वारे किंवा ओतण्याद्वारे बाप्तिस्मा एक विरोधाभास आहे, स्वतःचा विरोध करणारा. शिंपडण्याद्वारे बाप्तिस्म्याचा अर्थ असा होतो की “एखाद्यावर पाणी शिंपडून त्याला बुडवणे.” बाप्तिस्म्याच्या अंतर्निहित परिभाषेनुसार पाण्यात विसर्जन करण्याची, बुडविण्याची कृती असणे आवश्यक आहे.

बाप्तिस्मा ख्रिस्ताचा मृत्यू, दफन आणि पुनरुत्थान यात विश्वासणार्‍याचे तादात्म्य दर्शवितो. “किंवा आपण जितक्यांनी ख्रिस्त येशूमध्ये बाप्तिस्मा घेतला तितक्यांनी त्याच्या मरणात बाप्तिस्मा घेतला, ह्याविषयी तुम्ही अजाण आहात काय? तर मग आपण त्या मरणातील बाप्तिस्म्याने त्याच्याबरोबर पुरले गेलो; ह्यासाठी की, ज्याप्रमाणे ख्रिस्त पित्याच्या गौरवाने मेलेल्यांतून उठला त्याचप्रमाणे आपणही नवीन प्रकारच्या जीवनात चालावे” (रोम 6:3-4). पाण्यात बुडविण्याची कृती ख्रिस्ताबरोबर मरण्याची आणि दफन होण्याची कृती चित्रित करते. पाण्यातून बाहेर पडण्याची क्रिया ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचे वर्णन करते. परिणामतः, बुडविण्याद्वारे बापतिस्मा, बाप्तिस्मा घेण्याची एकमेव पद्धत आहे जी ख्रिस्ताबरोबर पुरले जाणे आणि त्याच्याबरोबर जिवंत उठविले जाणे हे दर्शविते. शिशूच्या बाप्तिस्म्याच्या बायबल विपरीत प्रथेचा परिणाम म्हणून शिंपडणे आणि/किंवा ओतणे याद्वारे बाप्तिस्मा प्रत्यक्षात आला.

बुडवून बापतिस्मा ही ख्रिस्ताबरोबर एक होण्याची सर्वात बायबल आधारित पद्धत असली तरीही ती तारणाची पूर्वपात्रता नाही. त्याऐवजी हे आज्ञाधारकपणाचे कार्य आहे, ख्रिस्तावरील विश्वासाची जाहीर घोषणा आणि त्याच्याशी एक होणे आहे. बाप्तिस्मा म्हणजे आपण आपले जुने आयुष्य सोडून एक नवीन उत्पत्ती (2 करिंथ 5:17) बनल्याचे चित्र आहे. बुडवून घेतलेला बाप्तिस्मा ही एकमेव पद्धत आहे जी या क्रांतिकारक बदलाचे पूर्णपणे वर्णन करतो.

English



मराठीच्या पहिल्या पानावर वापस या

बापतिस्म्याची योग्य पद्धत काय आहे?
© Copyright Got Questions Ministries