settings icon
share icon
प्रश्नः

परमेश्वर चांगल्या लोकांच्या बाबतीत वाईट गोष्टी का घडू देतो?

उत्तरः


हा धर्मशास्त्रातला सर्वात कठीण प्रश्न आहे. परमेश्वर हा अमर, असीम, सर्वज्ञ, सर्वव्यापी, आणि सर्वशक्तिमान आहे. माणूस (जो अनंत असीम, सर्वज्ञ, सर्वव्यापी, किंवा सर्वशक्तिमान नाही) त्याने ईश्वरीय मार्ग पूर्णपणे समजून घ्यावे अशी अपेक्षा का केली पाहिजे? ईयोबाच्या पुस्तकात या समस्येला हाताळले गेले आहे. परमेश्वराने सैतानाला ईयोबासोबत त्याला वाट्टेल ते सर्वकाही करण्याची परवानगी दिली होती फक्त त्याला ठार मारू नको असे सांगितले. ईयोबाची प्रतिक्रिया काय होती? "त्याने मला मारुन टाकले तरी मी आशा सोडणार नाही " (ईयोब 13:15). "जे काही दिले ते परमेश्वराने दिले आणि परमेश्वराने ते परत घेतले आहे; परमेश्वराच्या नावाचे स्तवन असो"(ईयोब 1:21). ईयोबाला हे कळू शकले नाही कि परमेश्वराने अशा गोष्टी घडण्याची परवानगी का दिली, पण त्याला एक माहीत होते कि परमेश्वर चांगला आहे आणि म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवत राहिला. अशाच प्रकारे आमची देखील प्रतिक्रिया असायला पाहिजे.

चांगल्या लोकांच्या बाबतीत वाईट का घडते? बायबलातील उत्तर असे आहे की "चांगले" लोक नाहीच. बायबल एक गोष्ट स्पष्ट करतो की या जगात सर्व डागाळलेले आणि पाप संसर्गग्रस्त लोक आहेत (उपदेशक 7:20; रोमन्स 6:23; 1 योहान 1: 8). रोमन्स 3: 10-18 मध्ये "चांगले" लोकांच्या गैर-अस्तित्वाबद्दल व्याख्या दिलेली आहे: या जगात कोणीही चांगला नाही; एकही नाही कोणीही समजनारा नाही, कोणीही ईश्वराचा शोध घेत नाही. सर्व ईश्वरापासून दूर गेले आहेत, ते सर्वच वाईट आहेत; कोणीही सत्कर्म करीत नाही, अगदी एकही नाही. त्यांचा गळा म्हणजे उघडी कबर आहे; त्यांच्या जिभा खोटे बोलण्यात पटाईत आहेत . सापाचे विष त्यांच्या ओठावर असते. त्यांची तोंडे शापांनी आणि कडूपणाने भरली आहेत. त्यांचे पाय रक्तपात करण्यास नेहमी तयार असतात; नाश आणि दु: खे त्यांच्या पावलो पावली असतात आणि त्यांना शांतीचा मार्ग माहित नसतो. त्यांच्या डोळ्यांपुढे देवाचे भय नाही. "या ग्रहावर राहणारा प्रत्येक मानव या क्षणीच नरकात फेकल्या जाण्यालायक आहे. आम्ही फक्त ईश्वराच्या कृपेने आणि दयेने जिवंत आहोत. आम्ही या ग्रहावर जे अनुभव घेतो ते सर्वात भयंकर दु:खापेक्षा देखील फार कमी आहेत. वास्तविक पाहता, आम्ही अग्नीच्या तळ्यात बंदिस्त करण्यालायक आहोत.

या पेक्षा चांगला प्रश्न असेल "ईश्वर चांगल्या लोकांना वाईट गोष्टी घडण्याची अनुमती का देतो?" रोमन्स 5: 8 जाहीर करते, "पण ईश्वर आपल्यासाठी त्याच्या स्वत:च्या प्रीतीचे प्रात्यक्षिक देतो. आपण पापी असून देखील, येशूने आपल्यासाठी बलिदान दिले " या जगातील लोकांचे स्वरूप वाईट, दुष्ट, पापी असून देखील, ईश्वर अजूनही आमच्यावर प्रेम करतो. त्याने आपल्यावर भरपूर प्रेम केले आणि आपल्या पापांची शिक्षा घेऊन मृत्यू कवटाळले (रोमन्स 6:23). आपण तारणहार म्हणून येशू ख्रिस्त प्राप्त झाल्यास(योहान 3:16; रोमन्स 10: 9), आम्हाला क्षमा मिळेल आणि स्वर्गात चिरंतन निवासाचे वचन मिळेल (रोमन्स 8: 1). आमची लायकी नरकाची आहे पण येशुमध्ये विश्वास ठेवल्यास आम्हास स्वर्गात अनंतकाळचे जीवन प्राप्त होते.

होय, कधी कधी चांगल्या लोकांशी वाईट गोष्टी घडतांना दिसते. पण ईश्वर त्या गोष्टी काही विशिष्ट कारणासाठी घडण्यास अनुमती देतो. तथापि, आम्ही एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की परमेश्वर प्रेमळ, मायाळू आणि दयाळू आहे. अनेकदा काही गोष्टी घडतात ज्या आम्हाला समजत नाही. तथापि, ईश्वरीय कृपेवर संशय करण्या ऐवजी, आमची प्रतिक्रिया ईश्वरावर विश्वास ठेवण्यास असावी. "आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेवा, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नका; आपल्या सर्व मार्गांत त्याचा स्वीकार करा, आणि तो तुमचा मार्गदर्शक होईल "(नीतिसूत्रे 3: 5-6).

English



मराठीच्या पहिल्या पानावर वापस या

परमेश्वर चांगल्या लोकांच्या बाबतीत वाईट गोष्टी का घडू देतो?
© Copyright Got Questions Ministries