प्रश्नः
कराराच्या कोशाचे काय झाले?
उत्तरः
कराराच्या कोशाचे काय झाले हा एक प्रश्न आहे ज्याने शतकानुशतके देव परिज्ञान शास्त्रज्ञ, पवित्र शास्त्राचे विद्यार्थी आणि पुरातत्वशास्त्रज्ञांना भुरळ घातली आहे. त्याच्या कारकिर्दीच्या अठराव्या वर्षी, यहूदाचा राजा जोशीया याने यरुशलेममधील मंदिराला परत करण्याचा कराराच्या कोशाच्या काळजीवाहकांना आदेश दिला (2 इतिहास 35:1-6; 2 राजे 23:21-23). याच ठिकाणी पवित्र शास्त्रामध्ये शेवटच्या वेळी कोशाचे स्थान नमूद केले आहे. चाळीस वर्षांनंतर, बाबेलाचा राजा नबुखद्नेस्सर याने यरुशलेमवर कब्जा केला आणि मंदिरावर छापा टाकला. त्यानंतर दहा वर्षांपेक्षा कमी कालावधीमध्ये, तो परत आला आणि त्याने मंदिरात जे शिल्लक राहिले होते ते घेतले आणि नंतर त्याने मंदिर आणि शहर जाळून टाकले. तर मग कोशाचे काय झाले? नबुखदनेस्सरने ते घेऊनगेला का? ते शहरासह नष्ट झाले काय? किंवा इजिप्तचा फारो शीशक याने शलमोनाचा मुलगा रहबामच्या कारकिर्दीत मंदिरावर छापा टाकला तेव्हा जसे तो उघडपणे कोश लपवून ठेवण्यात आला तसे आताही घडले? (“उघडपणे” कारण, जर शिशक ने हा कोश घेतला होता, तर योशीयाने लेवींना तो परत करण्यास का सांगितले? जर हा कोश इजिप्तमध्ये होता- तर गमावलेल्या कोशावर हल्ला करणाऱ्यांची कथानक - लेवींनी तो ताब्यात घेतली नसता आणि तो परत हि करण्याची वेळ आली नसती.)
2 मॅकाबीजचे नॉन-कॅनोनिकल पुस्तक अहवाल देते की बाबेलच्या आक्रमणाच्या अगोदरच यिर्मयाने, “एक दैवी प्रकटीकरणानंतर प्राप्त झाल्यामुळे निवासमंडप आणि कोश त्याच्यापाठीमागे यावे असे आदेश दिले आणि ... देवाने दिलेला वारसा पाहण्यासाठी मोशे चढलेल्या डोंगरावर तो गेला. देवाचा वारसा [ नबो नामक शिखर; अनुवाद 34:1]. जेव्हा यिर्मया तेथे आला तेव्हा त्याला एका गुहेत एक खोली मिळाली ज्यामध्ये त्याने तंबू, कोश आणि धूप वेदी ठेवली; मग त्याने प्रवेशद्वार बंद केले”(2:4-5). तथापि, “त्याच्या मागोमाग आलेल्यांपैकी काही जण मार्ग चिन्हांकित करण्याच्या उद्देशाने आले, परंतु त्यांना ते सापडले नाही. जेव्हा यिर्मयाला हे कळले तेव्हा त्याने त्यांना फटकारले: 'जोपर्यंत देव आपल्या लोकांना पुन्हा एकत्र आणत नाही आणि त्यांना दया दाखवत नाही तोपर्यंत हे ठिकाण अज्ञात आहे. मग परमेश्वर या गोष्टी उघड करील, आणि परमेश्वराचे तेज मेघामध्ये दिसेल, जसे मोशेच्या काळात दिसून आले आणि जेव्हा शलमोनाने प्रार्थना केली की मंदिर गौरवाने पवित्र केले जाऊ शकते” (2:6-8) . हि दुसऱ्या कडून (2:1 पहा) मिळालेली बातमी अचूक आहे की नाही हे माहित नाही; जरी ते असले तरी जसे खाते स्वतः दावा करते, परमेश्वर परत येईपर्यंत आम्हाला हे कळणार नाही.
हरवलेल्या कराराच्या ठावठिकाणाविषयीच्या इतर सिद्धांतांमध्ये रब्बी श्लोमो गोरेन आणि येहुदा गेट्झ यांचा दावा आहे की ते मंदिराच्या डोंगराच्या खाली लपलेले आहे, जे नबुखदनेस्सर चोरून नेण्याआधीच तेथे पुरले गेले होते. दुर्दैवाने, मंदिराचा डोंगर आता डोम ऑफ द रॉक या इस्लामिक पवित्र स्थळाचे घर आहे आणि स्थानिक मुस्लिम समाजाने ते उत्खनन करण्यास परवानगी नाकारली आहे. त्यामुळे रॅबिस गोरेन आणि गेट्झ बरोबर आहेत हे आम्हाला माहित नाही.
एक्सप्लोरर वेंडिल जोन्स, इतरांचा असा विश्वास आहे की डेड सी गुंडाळीमध्ये सापडलेली कलाकृती, कुमरान लेणी 3 चा रहस्यमय “कॉपर स्क्रोल” हा खरंच एक खजिना नकाशा आहे ज्याचा तपशील बाबेल येण्याआधी मंदिरातून घेतलेल्या अनेक मौल्यवान खजिनांचा तपशील आहे. हे खरे आहे की नाही हे पाहणे बाकी आहे, कारण गुंडाळीमध्ये सूचीबद्ध सर्व आवश्यक भौगोलिक खुणा अद्याप कोणीही शोधू शकले नाही. रूचक गोष्ट म्हणजे, काही विद्वानांचा असा अंदाज आहे की कॉपर स्क्रोल प्रत्यक्षात 2 मक्काबी 2:1 आणि 4 मध्ये नमूद केलेली नोंद असू शकतो, ज्यामध्ये यिर्मयाचा कोश लपवल्याचे वर्णन आहे. जरी हा एक रूचक अंदाज असला तरी तो असमर्थित आहे.
“द इकॉनॉमिस्ट” साठी पूर्व आफ्रिकेचे बातमीदार ग्रॅहम हॅनकॉक यांनी 1992 मध्ये द साईन अॅन्ड सील: कराराच्या हरवलेल्या कोशाचा शोध, नावाचे एक पुस्तक प्रकाशित केले, ज्यामध्ये त्यांनी असा युक्तिवाद केला होता की हा कोश इथिओपियाचे प्राचीन शहर अक्सुममधील सेंट मेरी ऑफ झिऑन चर्चमध्ये ठेवण्यात आला होता. बी.ए.एस.ई. इन्स्टिट्यूटचे एक्सप्लोरर रॉबर्ट कॉर्नुक यांचा देखील असा विश्वास आहे की कोश आता हि अक्सममध्ये असू शकतो. मात्र, अद्याप कोणालाही ते तेथे सापडले नाही. त्याचप्रमाणे, पुरातत्त्वशास्त्रज्ञ मायकेल सँडर्सचा असा विश्वास आहे की हा कोश इस्त्रायली दजहर्या गावातील प्राचीन इजिप्त मंदिरात लपवलेला असेल, परंतु त्याला तो अद्याप सापडलेला नाही.
एक संशयास्पद आयरिश परंपरा सांगते की हा कोश बेटामधील ताराच्या टेकडीखाली दफन केलेला आहे. काही विद्वानांचा असा विश्वास आहे की हे आयरिश “इंद्रधनुष्याच्या शेवटी सोन्याचे भांडे” या दंतकथेचा स्रोत आहे. रॉन व्याट आणि टॉम क्रॉटसर यांचे दावे कमी विश्वासार्ह आहेत, व्याट यांनी कलव्हरी पर्वताखाली दफन केलेल्या कराराचा कोश पाहिल्याचा दावा केला आहे आणि क्रॉट्झरने नेबो पर्वता जवळील पिसगा पर्वतावर पाहिल्याचा दावा केला आहे. पुरातत्त्व समुदायाद्वारे या दोघांनाही कमी सन्मानाने मानले जाते आणि कोणत्याही पुराव्यासह या दाव्यांना पुष्टी देऊ शकले नाही.
सरतेशेवटी, कोश देवाशिवाय सर्वांसाठी हरवलेला आहे. वर सादर करण्यात आल्यासारख्या रूचक सिद्धांतांची सृंखला सुरू आहे, परंतु कोश अद्याप सापडलेला नाही. 2 मॅकाबीजचे लेखक कदाचित बरोबर असतील; जोपर्यंत परमेश्वर स्वतः परत येत नाही तोपर्यंत हरवलेल्या कराराच्या कोशाचे काय घडले हे आम्हाला कदाचित कळणार नाही.
English
कराराच्या कोशाचे काय झाले?