आद्यदिव्यदूत कोण आहेत?


प्रश्नः आद्यदिव्यदूत कोण आहेत?

उत्तरः
आद्यदिव्यदूत हा शब्द बायबलच्या फक्त दोन वचनात आढळतो. 1 थेस्सल 4:16 म्हणते, “कारण आज्ञाध्वनी, आद्यदिव्यदूताची वाणी व देवाच्या तुतारीचा नाद होत असता प्रभू स्वतः स्वर्गातून उतरेल; आणि ख्रिस्तामध्ये जे मेलेले आहेत ते पहिल्याने उठतील. नंतर जिवंत उरलेले आपण त्यांच्याबरोबर प्रभूला सामोरे होण्यासाठी मेघांरूढ असे अंतराळात घेतले जाऊ, आणि तसेच सदासर्वदा प्रभूजवळ राहू..” दुसरे वचन आहे यहूदा 1:9, “आद्य देवदूत मीखाएल ह्याने जेव्हा मोशेच्या शरीरासंबंधाने सैतानाला विरोध करून त्याच्याशी वाद घातला, तेव्हा त्याला दोषी ठरवून त्याची निंदा करण्यास तो धजला नाही; तर “प्रभू तुला धमकावो” एवढेच तो म्हणाला.” पवित्र शास्त्रात आद्यदिव्यदूत म्हणून केवळ मीखाएलाचे नाव दिलेले आहे.

आद्यदिव्यदूत हा शब्द ग्रीक शब्दावरून आला आहे, आर्च एन्जेलॉस म्हणजे “मुख्य देवदूत”. हा आकर्कॉन (“मुख्य” किंवा “शासक”) आणि एन्जेलॉस (“देवदूत” किंवा “संदेशदाता”) वरून तयार केलेला एक संयुक्त शब्द आहे. बायबलमध्ये कित्येक ठिकाणी असे सूचित केले आहे की देवदूतांमध्ये नेतृत्त्वाचा पदानुक्रम आहे आणि मुख्य देवदूत इतर देवदूतांचा नेता आहे.

सर्व देवदूतांप्रमाणेच आद्यदिव्यदूत परमेश्वराद्वारे निर्मित वैयक्तिक प्राणी आहेत. त्यांच्याजवळ बुद्धिमत्ता, सामर्थ्य आणि वैभव आहे. ते शारीरिकपेक्षा आत्मिक स्वभावाचे आहेत. आद्यदिव्यदूत देवाची सेवा करतात आणि त्याचे हेतू पूर्ण करतात.

आद्यदिव्यदूत मीखाएललचा संदर्भ घेताना यहूदा 1 हा निश्चित किंवा डिफिनिट आर्टिकल द चा उपयोग करतो, ज्याद्वारे मीखाएल हा एकमेव आद्यदिव्यदूत असल्याचे दिसून येेते. तथापि, दानीएल 10:13 मध्ये मीखाएलचे वर्णन “मुख्य अधिपतींपैकी एक” असे आहे. हे बहुधा एकापेक्षा जास्त आद्यदिव्यदूत असल्याचे दर्शविते कारण हे मीखाएलला इतर “मुख्य अधिपतींच्या” सारख्याच स्तरावर बसवते. म्हणूनच, अनेक आद्यदिव्यदूत आहेत हे शक्य असले तरीही, इतर देवदूतांना आद्यदिव्यदूत म्हणून घोषित करून, देवाच्या वचनाचे अनुमान लावणे चांगले नाही. जरी अनेक आद्यदिव्यदूत असले, तरी त्यांच्यापैकी मीखाएल प्रमुख आहे असे दिसते.

दानीएल 10:21 मध्ये एक देवदूत मीखाएल आद्यदिव्यदूताचे वर्णन “तुमचा अधिपती” असे करतो. दूत दानीएलशी बोलत असल्याने आणि दानीएल यहूदी असल्याने, आपण मीखाएलहा यहूदी लोकांची देखरेख करतो असा अर्थ आपण देवदूताच्या म्हणण्याचा अर्थ लावू शकतो. दानीएल 12:1 मीखाएलला “तुझ्या लोकांचा कैवार घेणारा मोठा अधिपती” असे म्हणून या स्पष्टीकरणाची पुष्टी करते. कदाचित इतर आद्यदिव्यदूतांना इतर राष्ट्रांचे संरक्षण करण्याचे काम देण्यात आले असेल, परंतु पवित्रशास्त्र त्यांची नावे देत नाही. पतीत देवदूतांजवळ “मुलूख” असल्याचे दिसते, कारण दानीएलमध्ये आत्मिक “ग्रीसचा अधिपती” आणि आत्मिक “पारसाचा अधिपती” असा उल्लेख आहे ले दानीएलला निरोप देणार््या पवित्र देवदूताला विरोध करतात (दानीएल 10:20).

दानीएल 10 मध्ये पाहिल्याप्रमाणे आद्यदिव्यदूताचे एक कर्तव्य म्हणजे आत्मिक युद्धात गुंतणे होय. 1 थेस्सल 4 मध्ये, आद्यदिव्यदूत ख्रिस्ताच्या त्याच्या मंडळीसाठी परत येण्यात सहभागी आहे. यहूदा 1:9 मध्ये आपण आद्यदिव्यदूत मीखाएलास सैतानाशी भांडताना आपण पाहतो. आद्यदिव्यदूताचे सामथ्र्य आणि वैभव असलेल्या मीखाएलाने प्रभूला सैतानाला धमकाविण्याची विनंती केली. हे सैतान किती सामर्थ्यवान आहे, तसेच मीखाएल देवाच्या सामर्थ्यावर किती अवलंबून आहे हे दाखवते, जर आद्यदिव्यदूत आपल्या मदतीसाठी परमेश्वराकडे पाहत असेल तर आपण किती काही केले पाहिजे?

English
मराठीच्या पहिल्या पानावर वापस या
आद्यदिव्यदूत कोण आहेत?