settings icon
share icon
प्रश्नः

जर आमचे तारण सार्वकालिकरित्या सुरक्षित आहे, तर बायबल आम्हास धर्मत्यागाविरुद्ध कठोर ताकीद का देते?

उत्तरः


धर्मत्यागाच्या विरोधात बायबल आपल्याला अशी सक्त ताकीद देते की खरे रूपांतरण दृश्यमान फळांद्वारे मोजले जाते. यार्देन नदीत बाप्तिस्मा करणारा योहान जेव्हा लोकांना बाप्तिस्मा देत होता, तेव्हा त्याने स्वतःस नीतिमान समजणार्यांना चेतावणी दिली, “पश्चातापास योग्य असे फळ द्या” (मत्तय 3:7). येशू पर्वतावर उपदेश देत असताना जे त्याचे ऐकत होते त्यांना येशूने इशारा दिला की प्रत्येक झाड त्याच्या फळांद्वारे ओळखले जाईल (मत्तय 7:16) आणि चांगले फळ न देणारे प्रत्येक झाड कापून आगीत फेकून देण्यात येईल (मत्तय 7:19).

या चेतावणी देण्यामागील उद्देश म्हणजे काही लोक ज्याला “सुगम-विश्वास” म्हणतात त्यास विरोध करणे. दुसऱ्या शब्दांत, येशूचे अनुसरण करणे आपण ख्रिस्ती आहात असे म्हणण्यापेक्षा जास्त आहे. कोणीही ख्रिस्ताचा तारणहार असल्याचा दावा करू शकतो, परंतु जे खरोखरच तारले गेले आहेत ते दृश्यमान फळ देतील. आता, कोणी प्रश्न विचारू शकतो, “फळाचा अर्थ काय?” ख्रिस्ती फळांचे सर्वात स्पष्ट उदाहरण गलती 5:22-23 मध्ये सापडते जेथे पौल पवित्र आत्म्याच्या फळाचे वर्णन करतो: प्रेम, आनंद, शांती, संयम, दयाळूपणा, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता आणि आत्मसंयम. ख्रिस्ती फळांचे इतर प्रकार आहेत (जसे की प्रशंसा, ख्रिस्तासाठी आत्मेे जिंकणे) परंतु ही यादी आपल्याला ख्रिस्ती मनोवृत्तीचा उत्तम सारांश प्रदान करते. ख्रिस्ती जीवनात (2 पेत्र 1:5-8) प्रगती करीत असताना खरे विश्वासणारे त्यांच्या जीवनात ही वृत्ती वाढत्या प्रमाणात प्रकट करतील.

हे खरे आणि फळ देणारे शिष्य आहेत ज्यांना सार्वकालिक सुरक्षेची हमी आहे, आणि ते शेवटपर्यंत दृढ राहतील. अशी अनेक शास्त्रवचने आहेत जी हे सांगतात. रोम 8:29-30 हे दाखवून तारणाची “सोन्याची साखळी” रेखांकित करतात की ज्यांस देव अगोदरच जाणत होेता, त्यांना त्याने आधीच ठरविले, पाचारण केेलेे, नीतिमान ठरविले आणि त्यांस गौरवित केले त्यात कोणतेही नुकसान नाही. फिलिप्पै 1 आम्हास सांगते की देवाने आपल्यात ज्या कामाची सुरुवात केली आहे ते तो पूर्ण करील. इफिस 1:13-14 आम्हास शिकवते की देवाने आपल्या वारशाच्या हमीसाठी पवित्र आत्म्याचा तुमच्यावर त्याच्या ठायी शिक्का मारला आला आहे. योहान 10:29 याची पुष्टी करते की कोणीही देवाच्या मेंढरांना त्याच्या हातून हिसकावून घेऊ शकत नाही. इतरही अनेक शास्त्रवचने असे सांगतात की - खरे विश्वासणारे त्यांच्या तारणात सार्वकालिकरित्या सुरक्षित आहेत.

धर्मत्यागाच्या विरोधात चेतावणी देणाऱ्या परिच्छेदांचे दोन प्राथमिक हेतू आहेत. प्रथम, ते खर्या विश्वासणार्यांना त्यांचे “पाचारण आणि निवड” दृढ करण्यास प्रोत्साहन देतात. पौलाने 2 करिंथ 1:13 मध्ये सांगितले आहे की आपण विश्वासात आहोत की नाही हे पाहण्यासाठी स्वतःचे परीक्षण करावे. जर खरे विश्वासणारे येशू ख्रिस्ताचे फळ देणारे अनुयायी आहेत, तर आपण तारणाचे पुरावे पाहण्यास सक्षम असले पाहिजे. ख्रिस्ती त्यांच्या आज्ञाधारकतेच्या पातळीवर आणि त्यांच्या आत्मिक कृपादानांच्या आधारे भिन्न प्रमाणात फळ देतात, परंतु सर्व ख्रिस्ती विश्वासणारे फळ देतात; आणि त्याचा पुरावा आपण आत्म-परीक्षणाद्वारे पहावा.

ख्रिस्ती व्यक्तीच्या जीवनात अशी वेळ असेल जेव्हा कोणतेही फळ दिसणार नाही. ही पाप आणि आज्ञा न पाळण्याची वेळ असेल. दीर्घकाळच्या अवज्ञेच्या काळात जे घडते ते म्हणजे देव आपल्या तारणाची हमी आमच्यापासून काढून टाकतो. म्हणूनच दाविदाने स्तोत्र 51 मध्ये त्याला “तारणाचा आनंद” परत मिळावा म्हणून प्रार्थना केली (स्तोत्र 51:12). आम्ही पापामध्ये राहतो तेव्हा आम्ही आमचा तारणाचा आनंद गमावतो. म्हणूनच बायबल आपल्याला सांगते की “तुम्ही विश्वासात आहात किंवा नाही ह्याविषयी आपली परीक्षा करा; आपली प्रतीती पाहा, येशू ख्रिस्त तुमच्या ठायी आहे असे तुम्ही स्वतःसंबंधाने समजता ना? नाहीतर तुम्ही पसंतीस उतरलेले नाही” (2 करिंथ 13:5). जेव्हा एखादा खरा ख्रिस्ती स्वतःचे परीक्षण करतो आणि पाहतो की अलीकडे त्याच्या जीवनात फळे नाहीत, तेव्हा त्याने गंभीर पश्चात्ताप केला पाहिजे आणि देवाकडे वळले पाहिजे.

धर्मत्यागाविषयीच्या परिच्छेदांमागील दुसरे कारण म्हणजे धर्मत्यागींकडे अंगुलीनिर्देश करणे जेणेकरून आपण त्यांना ओळखू शकू. धर्मत्यागी व्यक्ती म्हणजे जो आपला धार्मिक विश्वास सोडून देतो. बायबलमधून हे स्पष्ट झाले आहे की धर्मत्यागी लोक असे लोक आहेत जे येशू ख्रिस्तावर विश्वासाचा दावा करतात, परंतु त्यांनी खरोखर त्याला तारणारा म्हणून कधीही स्वीकारले नाही. मत्तय 13:1-9 (पेरणाऱ्याचा दृष्टांत) या मुद्द्याचे उत्तम वर्णन करते. त्या दृष्टांतात, एक पेरणी करणारा बी पेरतो, जे देवाच्या वचनाचे प्रतीक आहे, तो चार प्रकारच्या जमीनीवर बी पेरतो: कठोर जमीन, खडकाळ जमीन, तण उगवलेली जमीन आणि नव्याने तयार केलेली जमीन. या जमिनीद्वारे सुवार्तेसाठी चार प्रकारच्या प्रतिक्रिया दर्शविल्या आहेत. प्रथम एक शुद्ध नकार आहे, तर इतर तीन वचन स्वीकारण्याच्या विविध स्तरांचे प्रतिनिधित्व करतात. खडकाळ माती आणि तण असलेली जमीन अशा लोकांना प्रतिनिधित्व करते जे सुरुवातीला सुवार्तेला अनुकूल प्रतिसाद देतात, परंतु जेव्हा छळ होतो (खडकाळ जमीन) किंवा जगाची चिंता येते (तण असलेली माती), तेव्हापासून ते परत फिरतात. येशूने या दोन प्रकारच्या प्रतिक्रियेद्वारे हे स्पष्ट केले की जरी त्यांनी सुरुवातीला सुवार्ता स्वीकारली असली तरी त्यांना कधीही फळ आले नाही कारण बिजाने (सुवार्तेचे) अंतःकरणात कधीच प्रवेश केला नाही. केवळ चैथी जमीन, जी देवाने तयार केली होती, ती बियाणे व फळ देण्यास सक्षम होती. पुन्हा, येशू डोंगरावरील प्रवचनात म्हणतो, “मला प्रभु, प्रभु,’ म्हणणाऱ्या प्रत्येकाचा स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होणार नाही (मत्तय 7:21).

धर्मत्यागाविरुद्ध चेतावणी देणे हे बायबलसाठी असामान्य वाटत असेल आणि त्याचवेळी हे म्हणणे की खरा विश्वासणारा कधीही धर्मत्याग करणार नाही. तथापि पवित्र शास्त्र हेच म्हणते. 1 योहान 2:19 विशिष्टरित्या सांगते की जे धर्मत्याग करतात, ते हे दाखवून देतात कि ते खरे विश्वासणारे नाहीत. म्हणून धर्मत्यागाविरुद्ध बायबलचा इशारा त्या लोकांसाठी चेतावणी असली पाहिजे जे विश्वासाचा खरोखर स्वीकार न करता “विश्वासात” असल्याचा दावा करतात. इब्री 6:4-6 आणि इब्री 10:26-29 अशा प्रकारची पवित्र शास्त्रातील वचने ”पाखंडी विश्वासणार्यांना ही चेतावनी आहे की त्यांना आत्मपरीक्षण करण्याची आणि हे जाणून घेण्याची गरज आहे की जर ते धर्मत्याग करण्याचा विचार करीत असतील तर ते खरोखर तारण पावलेले नाहीत. मत्तय 7:22-23 हे दर्शविते की “पाखंडी विश्वासणारा” ज्यांचा परमेश्वर अव्हेर करतो, त्यांनी आपला विश्वास गमाविला आहे म्हणून त्यांचा अव्हेर करण्यात येत नाही तर या तथ्यामुळे कारण देवाने त्यांना कधीही जाणले नाही.

बरेच लोक आहेत जे येशूसमान बनावयास तयार आहेत. सार्वकालिक जीवन आणि आशीर्वाद कोणाला नको आहे? तथापि, शिष्यत्वाची किंमत मोजण्यासाठी येशू आपल्याला चेतावणी देतो (लूक 9:23-२6, 14:25-33). खर्या विश्वासणा्यांनी त्या किंमती मोजल्या आहेत, परंतु धर्मत्यागींनी नाही. धर्मत्यागी लोक असे लोक आहेत जे जेव्हा विश्वास सोडून जातात तेव्हा त्यांचा पुरावा देतात की ते कधीही तारण पावले नाहीत (1 योहान २:19)). धर्मत्यागीपणा तारण गमावणे नव्हे, तर खरोखर तारण कधीच मिळाले नसल्याचे दर्शक आहे.

English



मराठीच्या पहिल्या पानावर वापस या

जर आमचे तारण सार्वकालिकरित्या सुरक्षित आहे, तर बायबल आम्हास धर्मत्यागाविरुद्ध कठोर ताकीद का देते?
© Copyright Got Questions Ministries