अज्ञेयवाद म्हणजे काय?प्रश्नः अज्ञेयवाद म्हणजे काय?

उत्तरः
अज्ञेयवाद हा दृष्टिकोण आहे की देवाचे अस्तित्व जाणणे अथवा सिद्ध करणे अशक्य आहे. "अज्ञेय" ह्या शब्दाचा मुख्य अर्थ आहे "ज्ञानावाचून." अज्ञेयवाद नास्तिकतावादाचे बौद्धिकरित्या अधिक प्रामाणिक स्वरूप आहे. नास्तिकतावाद हा दावा करतो की देव अस्तित्वात नाही — सिद्ध न करता येणारे मत. अज्ञेयवाद हा वाद घालतो की देवाचे अस्तित्व सिद्ध किंवा असिद्ध करता येत नाही, की देव अस्तित्वात आहे किंवा नाही हे जाणणे अशक्य आहे. ह्या बाबतीत, अज्ञेयवादाचे बरोबर आहे. देवाचे अस्तित्व सिद्ध किंवा असिद्ध करता येत नाही.

बायबल आम्हास सांगते की देवाचे अस्तित्व आहे हे आपण विश्वासाने स्वीकार केले पाहिजे. इब्री लोकांस पत्र 11:6 म्हणते "आणि विश्वासावाचून त्याला 'संतोषविणे' अशक्य आहे; कारण देवाजवळ जाणाÚयाने असा विश्वास ठेवला पाहिजे की, तो आहे, आणि त्याचा शोध झटून करणाÚयांना तो प्रतिफळ देणारा आहे." देव आत्मा आहे (योहान 4:24) म्हणून त्याला पाहता किंवा स्पर्श करता येत नाही. जोवर देव स्वतःला सिद्ध करण्याची निवड करीत नाही, तोवर तो आमच्या इंद्रियांस अदृश्य राहतो (रोमकरांस पत्र 1:20). बायबल घोषणा करते की देवाचे अस्तित्व विश्वात स्पष्टपणे दिसून येते (स्तोत्र 19:1-4), निसर्गात अनुभवास येते (रोमकरांस पत्र 1:18-22), आणि आमच्या आपल्या अंतःकरणात त्याची पुष्टी होते (उपदेशक 3:11).

अज्ञेयवादी देवाच्या अस्तित्वासाठी अथवा त्याविरुद्ध कुठल्याही प्रकारचा निर्णय घ्यावयास अनिच्छुक असतात. ही शेवटी "कुंपणावर बसण्याची" स्थिती आहे. देवावर विश्वास ठेवणारे असा विश्वास धरतात की देव आहे. नास्तिकतावादी असा विश्वास धरतात की देव नाही. अज्ञेयवादी असा विश्वास धरतात की आपण देवाच्या अस्तित्वावर विश्वास किंवा अविश्वास ठेवता कामा नये, कारण दोन्ही गोष्टी जाणणे अशक्य आहे.

वादविवादाप्रीत्यर्थ, आपण देवाच्या अस्तित्वाचे स्पष्ट आणि नाकारता न येण्याजोगे पुरावे मांडू या. जर आपण देवावरील विश्वास आणि अज्ञेयवाद यांस समान पातळीवर ठेविले, तर मृत्यूनंतरच्या जीवनाच्या शक्यतेसंबंधाने विश्वास ठेवण्याबाबत कोणती गोष्ट अधिक "अर्थपूर्ण" वाटते? जर देव नाही, तर देवावर विश्वास ठेवणारे आणि अज्ञेयवादी ह्या दोघांचे इतर सर्वांसारखेच मेल्यानंतर अस्तित्व संपुष्टात येईल. जर देव आहे, तर देवावर विश्वास ठेवणारे आणि अज्ञेयवादी या दोघांना मेल्यानंतर कोणाला तरी हिशेब द्यावा लागेल. ह्या दृष्टिकोणातून, अज्ञेयवादी बनण्याऐवजी देवावर विश्वास ठेवणारे बनणे अधिक "अर्थपूर्ण" वाटते. जर दोन्ही मते सिद्ध किंवा असिद्ध करता येत नसतील, तर त्या मताचे पूर्णपणे परीक्षण करण्याचा प्रयत्न करणे शहाणपणाचे दिसते ज्याचा अंतिम परिणाम अमर्यादितरित्या व सार्वकालिकरित्या अधिक वांछनीय असेल.

शंका वाळगणे सर्वसाधारण गोष्ट आहे. ह्या जगात अनेक गोष्टी आहेत ज्या आम्हाला समजत नाहीत. बरेचदा, लोक देवाच्या अस्तित्वावर शंका धरतात कारण तो करीत असलेल्या आणि परवानगी देत असलेल्या अनेक गोष्टी त्यांना समजत नाहीत अथवा त्यांच्याशी ते सहमत नसतात. तथापि, मर्यादित मानवप्राणी म्हणून आपण अनंत देवास समजण्याची पात्रता असल्याची अपेक्षा करू नये. रोमकरांस पत्र 11:33-34 ही वचने म्हणतात, "अहाहा, देवाच्या बुद्धीची व ज्ञानाची संपत्ति किती अगाध आहे! 'त्याचे निर्णय किती गहन आणि त्याचे मार्ग किती अगम्य आहेत! प्रभुचे मन कोणी ओळखिले? आणि त्याच्या मंत्री कोण होता?'" आपण विश्वासाने देवावर विश्वास ठेवावा आणि विश्वासाने त्याच्या मार्गावर भरवंसा ठेवावा. जे त्याच्यावर विश्वास ठेवतील त्यांस अद्भुतरित्या स्वतःस प्रगट करण्यास तो तयार व इच्छिुक आहे. अनुवाद 4:29 घोषणा करते, "पण तेथून जर तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याला शरण गेलात, आणि पूर्ण जिवेभावे त्याच्या शोधास लागलात तर तो तुम्हाला पावेल.

Englishमराठीच्या पहिल्या पानावर वापस याअज्ञेयवाद म्हणजे काय?