settings icon
share icon
प्रश्नः

उत्तरदायित्वाचे वय - मरणानंतर बाळांचे आणि लहान मुलांचे काय होते? बायबलमध्ये मला उत्तरदायित्वाचे वय मला कोठे आढळते?

उत्तरः


“जबाबदारीचे वय” ही संकल्पना अशी आहे की मुलांचे विशिष्ट वय होईपर्यंत त्यांच्या पापांसाठी देव त्यांना जबाबदार धरत नाहीत आणि जर एखादे मूल “उत्तरदायित्वाचे वय” गाठण्यापूर्वी मरण पावला तर ते मूल देवाच्या कृपेने आणि दयेने स्वर्गात प्रवेश करील. जबाबदारीच्या वयाची संकल्पना बायबल आधारित आहे का? “निर्दोषपणाचे वय” अशी एखादी गोष्ट आहे का?

जबाबदारीच्या वयासंबंधीची चर्चा या वस्तुस्थितीत लुप्त आहे की मुले कितीही लहान असोत, निष्पाप असल्याच्या अर्थाने “निर्दोष” नसतात. बायबल आपल्याला सांगते की, जरी लहान बालकाने किंवा मुलाने वैयक्तिक पाप केले नसेल तरीही, मुले व मुले यांच्यासह, सर्व लोक वारशाने व त्यांस मिळालेल्या पापमय स्वभावामुळे देवासमोर दोषी आहेत. आपल्या वडिलांकडून मिळालेले पाप म्हणजेच वारशाने मिळालेले पाप. स्तोत्र 51:5 मध्ये, दाविदाने लिहिले, “पाहा, मी जन्माचाच पापी आहे; माझ्या आईने गर्भधारण केले तेव्हाचाच मी पातकी आहे.” दाविदाला समजले की गर्भधारणेच्या वेळीही तो पापी होता. अतिशय दुःखाची गोष्ट ही आहे की लहान मुले कधीकधी मरतात यावरून हे दिसून येते की आदामच्या पापामुळे अर्भकांवर देखील परिणाम होतो, कारण शारीरिक आणि आत्मिक मृत्यू आदामाच्या मूळ पापाचा परिणाम होता.

प्रत्येक व्यक्ती, शिशु किंवा प्रौढ देवासमोर दोषी आहे; प्रत्येक व्यक्तीने देवाच्या पावित्र्यास दुखविले आहे. देव न्यायी ठरू शकतो आणि त्याच वेळी तो व्यक्तीस नीतिमान घोषित करतो, आणि हे तेव्हा घडते जेव्हा ती व्यक्ती ख्रिस्तामधील विश्वासाने क्षमेचा स्वीकार करतो. ख्रिस्त हाच एकमेव मार्ग आहे. येशूने जे म्हटले ते योहान 14:6 मध्ये लिहिलेले आहे: ”येशूने त्याला म्हटले, मार्ग, सत्य व जीवन मीच आहे; माझ्या द्वारे आल्यावाचून पित्याकडे कोणी येत नाही.” तसेच पेत्र प्रे. कृत्ये मध्ये 4:12, ”आणि तारण दुसऱ्या कोणाकडून नाही; कारण जेणेकरून आपले तारण होईल असे दुसरे कोणतेही नाव आकाशाखाली मनुष्यांमध्ये दिलेले नाही.” तारण ही वैय्यक्तिक निवड आहे.

अर्भकांचे आणि मुलांचे काय ज्यांना आपली वैय्यक्तिक निवड करण्याची पात्रता साध्य करता येत नाही? जबाबदारीचे वय ती कल्पना आहे की जबाबदारीच्या वयापर्यंत पोहोचण्यापूर्वी ज्यांस मरण येते ते आपोआप देवाच्या कृपेने व दयेने तारण पावतात. जबाबदारीचे वय हा विश्वास आहे की देव त्यांस सर्वांस तारण देतो जे कधीही ख्रिस्तासाठी किंवा ख्रिस्ताविरूद्ध निर्णय घेण्याची पात्रता प्राप्त करीत नाहीत. रोम 1:20 मध्ये एकवचन या विषयास संबोधित करते, ”देवाला ओळखूनसुद्धा त्यांनी देव म्हणून त्याचा गौरव केला नाही किंवा त्याचे आभार मानले नाहीत; पण ते आपल्या कल्पनांनी शून्यवत झाले आणि त्यांचे निर्बुद्ध मन अंधकाराने भरून गेले.” यानुसार, परमेश्वरासमोर मानवजातीचा दोष आंशिकरित्या या गोष्टीवर आधारित आहे की लोक देवाच्या अस्तित्वाविषयी, सार्वकालिकतेविषयी, आणि सामथ्र्याविषयी जे काही ”स्पष्टपणे पाहतात“ त्याचा ते अव्हेर करू शकतात. यामुळे हा प्रश्न उत्पन्न होतो की ज्या मुलांत ”स्पष्टपणे पाहण्याची“ किंवा देवाविषयी युक्तिसंगत विचार करण्याची बुद्धी नसते - त्यांची निरीक्षण करण्याची व तर्क करण्याची स्वाभाविक असमर्थतता त्यांस सबब देणार नाही काय?

जबाबदारीच्या वयासाठी सूचविलेले सर्वात सामान्य वय आहे तेरा वर्ष, हे या यहूदी प्रथेवर आधारित आहे की मूल वयाच्या 13 व्या वर्षी वयस्कर होते. परंतु, बायबल 13 वर्षाचे वय जबाबदारीचे वय असल्याचे प्रत्यक्ष समर्थन करीत नाही. हे प्रत्येक मुलापरत्वे वेगळे असते. जेव्हा मूल ख्रिस्तासाठी किंवा ख्रिस्ताविरूद्ध निर्णय घेण्यास समर्थ करते तेव्हा ते जबाबदारीचे वय पूर्ण करते. चाल्र्स स्पर्जन यांचे मत हे होते की ”पाच वर्षांचे मूल खरोखरच तारण प्राप्त करू शकते आणि प्रौढाप्रमाणे नवा जन्म प्राप्त करू शकते.“

वरील गोष्टी लक्षात ठेवता, या गोष्टींचा देखील विचार करा: ख्रिस्ताच्या मृत्यू सर्व मानवजातीसाठी पुरेसा आहे. 1 योहान 2:2 म्हणते की येशू ”आणि तोच आपल्या पापांबद्दल प्रायश्चित्त आहे; केवळ आपल्याच पापांबद्दल नव्हे तर सर्व जगाच्याही पापांबद्दल आहे.“ हे वचन स्पष्ट आहे की येशूचा मृत्यू सर्व पापांसाठी पुरेसा होता, किंवा त्या लोकांच्या पापांसाठी नाही जे त्याच्याजवळ विशिष्टरित्या विश्वासाने आले आहे. ख्रिस्ताच्या मृत्यू सर्व पापांसाठी पुरेसा होता ही वस्तुस्थिति या शक्यतेस मुभा देते की परमेश्वर हे देणे त्या लोकांस लागू करतो जे कधीही विश्वास करावयास समर्थ नव्हते.

काहीजण उत्तरदायित्वाचे वय आणि इस्राएल राष्ट्र आणि परमेश्वरामधील करार यांच्यात एक संबंध पाहतात ज्यात मुलाची सुंता करण्याशिवाय त्याच्यावर कुठलीही अट करारामध्ये समावेश करण्याची गरज नव्हती, ही सुंता त्याच्या जन्माच्या आठव्या दिवशी करण्यात येत असे (निर्गम 12:48-50; लेवीय 12:3).

प्रश्न उद्भवतो, ”जुन्या कराराचे सर्वसमावेशक स्वरूप चर्चला लागू होते काय?“ पेन्टेकॉस्टच्या दिवशी, पेत्र म्हणाला, “कारण हे वचन तुम्हांला, तुमच्या मुलाबाळांना व ‘जे दूर आहेत त्या सर्वांना म्हणजे जितक्यांना परमेश्वर’ आपला देव ‘स्वतःकडे बोलावील तितक्यांना’ दिले आहे. आणखी त्याने दुसऱ्या पुष्कळ गोष्टी सांगून त्यांना साक्ष दिली व बोध करून म्हटले, ह्या कुटिल पिढीपासून तुम्ही आपला बचाव करून घ्या.” (प्रेषितांची कृत्ये 2:38-39 एनएएस) येथे दिलेला मुलेबाळे (ग्रीक भाषेत टेकनाॅन) या शब्दाचा अर्थ आहे “मूल, मुलगी, मुलगा.“ प्रेषितांची कृत्ये 2:39 असे सूचित करते की भविष्यातील पिढ्यांसह पापांची क्षमा सर्वांसाठी उपलब्ध आहे (तुलना करा प्रेषितांची कृत्ये 1:8). हे कुटूंबास किंवा घराण्यास तारण शिकवित नाही. पश्चात्ताप करणार्यांच्या मुलांनाही पश्चात्ताप करावा लागला.

इतर विषयांच्या तुलनेत या विषयासमान आणखी एक उतारा आहे जो आहे 2 शमुवेल 12:21-23. या वचनांचा संदर्भ असा आहे की राजा दाविदाने बथशेबाशी व्यभिचार केला, परिणामी गर्भधारणा झाली. प्रभुने नाथान संदेष्ट्याला दाविदाला हे कळवण्यासाठी पाठवले की, त्याच्या पापामुळे, तो मुलाला ठार करील. यावर दाविदाने शोक करून मुलासाठी प्रार्थना केली. पण एकदा मुलाला मेल्यानंतर, दाविदाचा शोक संपला. हे ऐकून दाविदाच्या सेवकांना आश्चर्य वाटले. ते राजा दाविदाला म्हणाले, ”आपण हे असे काय केले? मूल जिवंत होते तोवर आपण त्याच्यासाठी उपास व शोक केला, पण ते मरण पावताच आपण उठून भोजन केले?” त्याने उत्तर दिले, “मूल जिवंत होते तोवर मी उपास केला व रुदन केले. मला वाटले, न जाणो, कदाचित परमेश्वर माझ्यावर कृपा करील व मूल जिवंत राहील; पण आता ते मरण पावले तर मी आता का उपास करावा? माझ्याने थोडेच त्याला परत आणवेल? मी त्याच्याकडे जाईन, पण ते माझ्याकडे परत येणार नाही.” दाविदाची प्रतिक्रिया हे दर्शविते की जे विश्वास करू शकत नाही ते प्रभूमध्ये सुरक्षित आहेत. दाविदाने म्हटले की तो मुलाकडे जाऊ शकतो, पण तो मुलास परत आणू शकत नाही. तसेच, तितकेच महत्वाचे हे आहे की, दाविदाला या ज्ञानामुळे सांत्वन मिळाले. दुसऱ्या शब्दात, असे वाटते की दावीद म्हणत होता की तो आपल्या बाळाला जरी परत आणू शकत नसला, तरीही तो त्यास भेटेल (स्वर्गात).

जरीही हे शक्य आहे की देव पापासाठी ख्रिस्ताचा देणे त्या लोकांस लागू करतो जे विश्वास करू शकत नाहीत, पण बायबल विशिष्टरित्या असे म्हणत नाही की तो हे करतो. म्हणून, हा असा विषय आहे ज्याच्याविषयी आपण आग्रही किंवा सिद्धांतवादी कामा असता कामा नये. ख्रिस्ताच्या मृत्यू देवाद्वारे त्या लोकांस लागू करणे जे विश्वास करू शकत नाही, त्याच्या प्रेमाची व दयेशी सुसंगत वाटेल. हे आमचे मत आहे की देव पापासाठी ख्रिस्ताचे देणे अर्भकांस लागू करतो आणि त्या लोकांस जे मानसिकरित्या अपंग आहे कारण आपली पापमय दशा समजण्यासाठी आणि तारणाची आपली गरज समजण्यासाठी ते मानसिकरित्या सक्षम नाहीत, पण पुन्हा असा आपण अट्टाहास करू शकत नाही. परमेश्वर जे काही करतो ते नेहमीच योग्य आणि चांगले असते आणि तो मुलांस आमच्यापेक्षा अधिक प्रीती करतो.

English



मराठीच्या पहिल्या पानावर वापस या

उत्तरदायित्वाचे वय - मरणानंतर बाळांचे आणि लहान मुलांचे काय होते? बायबलमध्ये मला उत्तरदायित्वाचे वय मला कोठे आढळते?
© Copyright Got Questions Ministries