settings icon
share icon
प्रश्नः

आपण किती काळ जगू शकतो याची वयोमर्यादा आहे का?

उत्तरः


अनेक लोक उत्पत्ती 6:3 चा अर्थ समजतात की मानवजातीसाठी 120 वर्षे ही वयोमर्यादा आहे. “तेव्हा परमेश्वर म्हणाला, “मनुष्य भ्रांत झाल्यामुळे माझ्या आत्म्याची त्याच्या ठायी सर्वकाळ सत्ता राहणार नाही; तो देहधारी आहे; तथापि मी त्याला एकशे वीस वर्षांचा काळ देईन.” तथापि, उत्पत्तीच्या ११ व्या अध्यायात अनेक लोक 120 वर्षापेक्षा अधिक वर्षे जगल्याची नोंद आहे. याचा परिणाम म्हणून, काही लोक उत्पत्ती 6:3 चा अर्थ लावतात की सर्वसाधारण नियम म्हणून, लोक 120 वर्षांपलीकडे यापुढे जगणार नाहीत. जलप्रलयानंतर, आयुष्यमान नाटकीयरित्या कमी होऊ लागले (उत्पत्ति 5ची तुलना उत्पत्ति 11 शी करा) आणि अखेरीस ते 120 च्या खाली आले (उत्पत्ति 11). उत्पत्ति 11 नंतर, आपल्याकडे एका व्यक्तीविषयी - मोशे - नोंद आहे की तो 120 वर्षे जगला, परंतु त्या वयाच्या पलीकडे कोणीही जगल्याची नोंद नाही.

तथापि, आणखी एक स्पष्टीकरण, जे संदर्भानुसार वाटते, ते हे की उत्पत्ति 6:3 ही देवाची घोषणा आहे की त्याच्या घोषणेच्या 12.0 वर्षानंतर जलप्रलय येईल. मानवतेचे दिवस संपत आहेत ते म्हणजे मानवजातीचे दिवस समाप्त होत आहेत हा या गोष्टीचा उल्लेख आहे की मानवजात जलप्रलयात स्वतःचा नाश ओढवून घेत आहे. उत्पत्ती 5:32 मध्ये नोहा 500 वर्षांचा असतांना देवाने त्याला तारू बांधण्याची आज्ञा दिली त्या वस्तुस्थितीमुळे काही लोक काही लोक असा वाद घालतात आणि जेव्हा जलप्रलय आला तेव्हा नोहा 600 वर्षांचा होता (उत्पत्ति 7:6) ज्यात फक्त 100 वर्षांचा वेळ मिळतो, 120 वर्षांचा नव्हे. तथापि, उत्पत्ति 6:3च्या देवाच्या घोषणेची वेळ दिलेली नाही. याशिवाय, उत्पत्ति 5:32 ही ती वेळ नाही जेव्हा देवाने नोहाला तारू तयार करण्याची आज्ञा दिली होती, परंतु त्याऐवजी हे ते वय होते जेव्हा तो त्याच्या तीन मुलांचा पिता झाला. हे पूर्णतः विश्वसार्ह आहे की देवाने हे ठरविले की जलप्रलय 120 वर्षांत येईल आणि नोहाला तारू बांधण्याची आज्ञा देण्यापूर्वी त्याने बरीच वर्षे वाट पाहिली. काहीही झाले तरी उत्पत्ति 5:32 आणि 7:6 मधील 100 वर्षे उत्पत्ती 6:3 मध्ये नमूद केलेल्या 120 वर्षांचे खंडन करीत नाही.

जलप्रलयाच्या कित्येक शंभर वर्षांनंतर, मोशेने घोषित केले की, “आमचे आयुष्य सत्तर वर्षे आणि शक्ती असल्यास फार तर ऐंशी वर्षे असले, तरी त्याचा डामडौल केवळ कष्टमय व दुःखमय आहे, कारण ते लवकर सरते आणि आम्ही निघून जातो” (स्तोत्र 90:10). उत्पत्ति 6:3 किंवा स्तोत्र 90:10 दोन्हीही मानवासाठी देव-नियुक्त वय मर्यादा नाहीत. उत्पत्तिद 6:3 हा जलप्रलयाच्या वेळापत्रकांचा अंदाज आहे. स्तोत्र 90:10 हे सहजपणे सर्वसाधारण नियम म्हणून सांगते की लोक 70-80 वर्षे जगतात (जे आजही सत्य आहे).

Englishमराठीच्या पहिल्या पानावर वापस या

आपण किती काळ जगू शकतो याची वयोमर्यादा आहे का?
© Copyright Got Questions Ministries