settings icon
share icon
प्रश्नः

पवित्र शास्त्र जबाबदारीच्या महत्वाविषयी काय म्हणते?

उत्तरः


या जगामध्ये पुष्कळ मोह अगोदरच आहे आणि आणखीन जास्त तयार करण्यासाठी सैतान जास्त काम करीत आहे. अशा प्रलोभनाला सामोरे जाताना, अनेक ख्रिस्ती लोक आध्यात्मिक युद्ध करताना येणाऱ्या बोजासह प्रार्थना करण्यासाठी आणि त्यांना मदत करण्यासाठी “जबाबदार जोडीदार” शोधतात. जेव्हा आपण प्रलोभनांना सामोरे जात असतो तेव्हा भाऊ किंवा बहीण असणे चांगले आहे. राजा दावीद त्या सायंकाळी एकटाच होता ज्यावेळी सैतानाने त्याला बाथशेबा (2 शमुवेल 11) बरोबर व्यभिचारासाठी प्रलोभित केले. पवित्र शास्त्र आपल्याला सांगते की आपले झगडणे रक्तमांसाबरोबर नव्हे, तर सत्तांबरोबर, अधिकार्‍यांबरोबर, सध्याच्या काळोखातील जगाच्या अधिपतींबरोबर, आकाशातल्या दुरात्म्यांबरोबर आहे (इफिस. 6:12).

आपण अंधाराच्या शक्तींविरूद्धच्या लढाईमध्ये आहोत हे जाणून, आपणास आपल्या आजूबाजूस शक्य असेल तितकी मदत एकत्र करण्यास आवश्यक आहे आणि यामध्ये स्वतःला दुसऱ्या विश्वासयोग्य व्यक्तीला जबाबदार बनवण्याचा समावेश असू शकतो जो आपल्याला या लढ्यात प्रोत्साहित करू शकेल. पौल आपल्याला सांगतो की या लढाईसाठी देवाने पुरवलेल्या सर्व शक्तीने आपण सुसज्ज असले पाहिजे: “ह्या कारणास्तव तुम्हांला वाईट दिवसांत प्रतिकार करता यावा व सर्वकाही केल्यावर टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्रसामग्री घ्या” (इफिस 6:13). आम्हाला खात्री आहे की मोह येईल. आपण तयार असले पाहिजे.

सैतानाला आपल्या कमकुवतपणाची जाणीव आहे आणि आपण केंव्हा असुरक्षित आहोत हे त्याला माहित आहे. विवाहित जोडपे कधी भांडत आहे आणि कदाचित दुसरे कोणीतरी आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकते आणि सहानुभूती दाखवू शकते असे केंव्हा वाटते हे त्याला माहित आहे. मुलाला त्याच्या आईवडिलांनी कधी शिक्षा केली आहे आणि कदाचित त्याला तिरस्कारीत वाटेत असेल हे त्याला ठाऊक आहे. कामाच्या ठिकाणी गोष्टी ठीक नाहीत आणि घरी जाताना बार कुठे आहे हे त्याला माहित आहे. आम्हाला मदत कुठे मिळेल? आम्हाला देवाच्या दृष्टीने जे योग्य आहे ते करायचे आहे, तरीही आम्ही कमकुवत आहोत. आपण काय करावे?

नीतिसूत्रे 27:17 असे म्हणते कि, “तिखे तिख्याला पाणीदार करते, तसा मनुष्य आपल्या मित्रांचा चेहरा पाणीदार करतो.” मित्राचा चेहरा म्हणजे प्रोत्साहन किंवा नैतिक समर्थनाचा प्रकटीकरण किंवा अभिव्यक्ती आहे. तुम्ही कसे आहात हे विचारण्यासाठी शेवटच्या वेळी तुमच्या मित्राने कधी तुम्हाला दूरध्वनी अर्थात कॉल केला होता? तुम्ही कधी शेवटच्या वेळी मैत्रिणीला दूरध्वनी अर्थात फोन केला आणि तिला विचारले की तिला काही बोलण्याची गरज आहे काय? मित्राकडून प्रोत्साहन आणि नैतिक पाठिंबा हे कधीकधी सैतानाविरुद्ध लढाई लढताना गहाळ असलेला घटक असू शकतो. एकमेकांना जबाबदार असण्यामुळे ते गहाळ घटक प्रदान केले जाऊ शकतात.

इब्रीच्या लेखक याचा सारांश देत असे म्हणाले कि, “प्रीती व सत्कर्मे करण्यास उत्तेजन येईल असे एकमेकांकडे लक्ष देऊ. आपण कित्येकांच्या चालीप्रमाणे आपले एकत्र मिळणे न सोडता एकमेकांना बोध करावा, आणि तो दिवस जसजसा जवळ येत असल्याचे तुम्हांला दिसते तसतसा तो अधिक करावा.” (इब्री. 10:24-25). ख्रिस्ताचे शरीर एकमेकांशी जोडलेले गेले आहे आणि एकमेकांची बांधणी करणे हे आपले कर्तव्य आहे. तसेच, याकोब जबाबदारीचा अर्थ सांगताना म्हणतो, “तुम्ही निरोगी व्हावे म्हणून आपली पातके एकमेकांजवळ कबूल करून एकमेकांसाठी प्रार्थना करा. नीतिमानाची प्रार्थना कार्य करण्यात फार प्रबळ असते” (याकोब. 5:16).

पापावर मात करण्यासाठी लढाईमध्ये जबाबदारी उपयुक्त ठरू शकते. एक जबाबदार भागीदार तुम्हाला प्रोत्साहित करण्यासाठी, तुम्हाला फटकारण्यासाठी, तुम्हाला शिकवण्यासाठी, तुमच्याबरोबर आनंद करण्यासाठी आणि तुमच्याबरोबर रडण्यासाठी तुमच्यासोबत असू शकतो. प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीला जबाबदार भागीदार असण्याचा विचार केला पाहिजे ज्यांच्याशी तो प्रार्थना करू शकतो, बोलू शकतो, विश्वास ठेवू शकतो आणि कबूल करू शकतो .

Englishमराठीच्या पहिल्या पानावर वापस या

पवित्र शास्त्र जबाबदारीच्या महत्वाविषयी काय म्हणते?
© Copyright Got Questions Ministries