settings icon
share icon
प्रश्नः

ख्रिस्ती मुक्ती म्हणजे काय?

उत्तरः


“ओसाडीचा अमंगळ पदार्थ” हा वाक्प्रचार मत्तय 24:15चा संदर्भ देतो: “दानीएल संदेष्ट्याच्या द्वारे सांगितलेला ‘ओसाडीचा अमंगळ पदार्थ पवित्रस्थानात’ उभा असलेला तुम्ही पाहाल - वाचकाने हे ध्यानात आणावे.“ हा दानीएल 9:27चा संदर्भ आहे, “तो पुष्कळ लोकांबरोबर एक सप्तकाचा पक्का करार करील; अर्ध सप्तकापर्यंत तो यज्ञ व अन्नबली बंद करील; उद्ध्वस्त करणारा अमंगलांच्या पंखांवर आरूढ होऊन येईल व ठरलेल्या समाप्तीपर्यंत उद्ध्वस्त करणार्‍यावर कोपाचा वर्षाव होईल.” ई.पू. 167 मध्ये एन्टिओकस एपिफेनस नावाच्या ग्रीक राज्यकर्त्याने यरूशलेमातील यहूदी मंदिरात होमार्पणाच्या वेदीवर ज्यूस देवतासाठी वेदी स्थापन केली. त्याने यरूशलेमातील मंदिरातील वेदीवर डुकराचे बलिदान केले. या घटनेस ओसाडीचा अमंगळ पदार्थ म्हणून ओळखले जाते.

मत्तय 24:15 मध्ये, येशू आधीच घडलेल्या वर वर्णन करण्यात आलेल्या ओसाडीच्या अमंगळ पदार्थाच्या घटनेच्या 200 वर्षानंतर बोलत होता. म्हणून, येशूने ही भविष्यवाणी केली असावी की भविष्यात कधीतरी यरूशलेमातील यहूदी मंदिरात दुसरा ओसाडीचा अमंगल पदार्थ स्थापन केला जाईल. बायबलच्या बहुतेक भविष्यवाणीचे व्याख्याकार असा विश्वास धरतात की येशू ख्रिस्तविरोधकाचा उल्लेख करीत होता जो एन्टिओकस एपिफेनसने केलेल्या कृत्यासमान कृत्य करील. याची पुष्टी या तथ्याने होते की दानीएल 9:27 मध्ये दानीएलाने जे भाकित केले होते त्यापैकी काही ई.पू. 167 मध्ये एन्टिओकस एपिफेनसद्वारे घडले. एन्टिओकसने इस्राएलसोबत सात वर्षांचा करार केला नाही. शेवटच्या काळी, ख्रिस्तविरोधक सात वर्षांकरिता इस्राएलासोबत करार करील आणि नंतर यरूशलेमातील यहूदी मंदिरात ओसाडीच्या अमंगळ पदार्थासमान काही तरी करून तो त्या कराराचे उल्लंघन करील.

भविष्यातील ओसाडीचा अमंगळ पदार्थ काहीही का असेना, तो कोणाच्याही मनात ही शंका ठेवणार नाही की असे करणारा व्यक्ती ख्रिस्तविरोधक म्हणून सांगण्यात आला आहे. प्रकटीकरण 13:14 त्याचे वर्णन करतांना सांगते की तो कुठल्यातरी प्रकारची मूर्ति तयार करील जिची उपासना करण्यासाठी सर्वांस भाग पाडील. जिवंत देवाच्या मंदिरास ख्रिस्तविरोधकाच्या उपासनेचे स्थान बनविणे खरोखर “अमंगळपणा” आहे. जे जिवंत आहेत आणि क्लेशसमयी टिकून असतील, त्यांनी सावध असावे आणि ओळखावे की ही घटना क्लेशकाळाचा साढे तीन वर्षांचा भयंकर समयाचा आरंभ होय आणि प्रभू येशूचे येणे अगदी जवळ आहे. “तुम्ही तर होणार्‍या ह्या सर्व गोष्टी चुकवण्यास व मनुष्याच्या पुत्रासमोर उभे राहण्यास समर्थ व्हावे म्हणून सर्व प्रसंगी प्रार्थना करत जागृत राहा” (लूक 21:36).

Englishमराठीच्या पहिल्या पानावर वापस या

ख्रिस्ती मुक्ती म्हणजे काय?
© Copyright Got Questions Ministries