settings icon
share icon
प्रश्नः

आत्म्यामध्ये चालण्याचा काय अर्थ आहे?

उत्तरः


विश्वासणाऱ्यामध्ये ख्रिस्ताच्या आत्म्याचे वास्तव्य आहे, कैवारी आत्मा जो पित्याकडून येतो (योहान 15:26). पवित्र आत्मा विश्वासणाऱ्यास प्रार्थनेमध्ये मदत करतो (यहूदा 1:20) आणि ”हा आत्मा पवित्रजनांसाठी देवाच्या मर्जीप्रमाणे मध्यस्थी करतो“ (रोम. 8:27). तसेच तो विश्वासणाऱ्यास नीतिमत्वाकडे नेतो (गलती. 5:16-18) आणि त्यास शरण जाणार्यांमध्ये आपले फळ उत्पन्न करतो (गलती. 5:22-23). विश्वासणाऱ्याने देवाच्या इच्छेच्या अधीन व्हावे आणि आत्म्यामध्ये चालावे.

बायबलमध्ये ”चालणे“ हे व्यवहारिक रोजच्या जीवनाचे रूपक आहे. ख्रिस्ती जीवन हा एक प्रवास आहे, आणि आम्हास त्या चालावयाचे आहे - आम्हास प्रगतीकडे सातत्याने वाढत जावयाचे आहे. सर्व विश्वासणार्यांसाठी बायबलचे मानक हे आहे की ते आत्म्यामध्ये चालतात. ”आपण जर आत्म्याच्या सामथ्र्याने जगतो, तर आपण आत्म्याच्या प्रेरणेने चालावे“ (गलती. 5:25, केजेवी; तुलना करा रोम. 8:14), आणि आपण दररोज आत्म्यामध्ये जगत रहावे (योहान 3:6).

आत्म्याने चालण्याचा अर्थ म्हणजे आपण त्याच्या नियंत्रणाधीन होतो, आपण त्याच्या मार्गदर्शनाचे अनुसरण करतो आणि आम्ही त्याला आमच्यावर आपला प्रभाव टाकण्यास परवानगी देतो. आत्म्याने चालणे त्याला विरोध करणे किंवा त्याला खिन्न करणे या विरुद्ध आहे (इफिस. 4:30).

गलती 5 विश्वासणाऱ्यात पवित्र आत्म्याच्या कार्याचे परीक्षण करतो. संदर्भ हा मोशेच्या नियमापासून स्वातंत्र्य आहे (गलती. 5:1).. जे आत्म्याने चालतात ते “ विश्वासाने नीतिमत्त्वाची आशा धरून वाट” पाहतात (वचन 5) आणि नियमशास्त्रातून मुक्त आहेत (वचन 18). तसेच, जे आत्म्यात चालतात ते “देहवासना पूर्ण करणार नाहीत” (वचन 16). देह - पापाच्या सामर्थ्याखाली असलेला आमचा पातकी स्वभाव - आत्म्याचा थेट विरोध करतो (वचन 17). जेव्हा देहाचे प्रभुत्व असते, तेव्हा त्याचे परिणाम स्पष्ट असतात (वचन 19-21). परंतु जेव्हा आत्मा नियंत्रण घेतो, तेव्हा तो नियमशास्त्राच्या कठोरपणावाचून आपल्यात ईश्वरीय गुण उत्पन्न करतो (वचन 22-23). विश्वासणार््यांनी “त्यांनी विकार व वासना ह्यांच्यासह देहस्वभाव वधस्तंभावर खिळला आहे.” (वचन 24), आणि आता आपण आत्म्याने चालतो (वचन 25).

जे आत्म्याने चालतात ते त्याच्याबरोबर आणि आत्म्याने उत्पन्न केलेले फळ देणाऱ्यासोबत एक होतात. म्हणून, जे आत्म्यात चालतात ते प्रीतीत चालतात-ते देवावर आणि आपल्या सोबत्यावर प्रेम करतात. जे लोक आत्म्याने चालतात ते आनंदात चालतात - देवाने जे केले आहे, जे तो करीत आहे, करणार आहे, त्यात ते आनंद प्रगट करतात. जे आत्म्याने चालतात ते शांतीने चालतात - ते चिंतामुक्त जगतात आणि चिंता करण्यास नकार देतात (फिलिप्पै 4:6). जे लोक आत्म्याने चालतात ते धैर्याने चालतात - ते “लाँग फ्यूज” असलेले म्हणून ओळखले जातात आणि संतप्त होत नाहीत. जे आत्म्याने चालतात ते दयाळूपणाने चालतात - ते इतरांच्या गरजा प्रेमळपणे लक्षात घेतात. जे आत्म्यात चालतात ते चांगुलपणाने चालतात - त्यांच्या कृती सद्गुण आणि पवित्रता दर्शवितात. जे आत्म्याने चालतात ते विश्वासूपणाने चालतात आणि ते देव व वचन यावर स्थिर विश्वास ठेवतात. जे लोक आत्म्याने चालतात ते सौम्यतेने चालतात - त्यांच्या जीवनाची वैशिष्ट्ये आहेत नम्रता, कृपा आणि देवाचे उपकार मानणे. जे आत्म्यात चालतात ते आत्मसंयमाने चालतात - ते सौम्यता, संयम आणि देहाला “नाही” म्हणण्याची क्षमता दर्शवतात. जे आत्म्यात चालतात ते विचार, शब्द आणि कृतीत मार्गदर्शन करण्यासाठी पवित्र आत्म्यावर अवलंबून असतात (रोम 6:11-14). ते दररोज, क्षणोक्षणी पवित्रता दाखवतात, जसे येशूने केले जेव्हा “येशू पवित्र आत्म्याने परिपूर्ण असा यार्देनेपासून परतला, आणि त्याला आत्म्याने चाळीस दिवस रानात नेले; तेथे सैतानाने त्याची परीक्षा केली“ (लूक 4:1).

आत्म्याने चालणे म्हणजे आत्म्याने भरले जाणे आणि आत्म्याने भरण्याचे काही परिणाम म्हणजे कृतज्ञता, गाणे आणि आनंद (इफिस 5:18-20; कलस्सै 3:16). जे आत्म्यात चालतात ते आत्म्याच्या मार्गदर्शनाचे अनुसरण करतात. त्यांनी “ख्रिस्ताच्या वचनास आपल्यात भरपूर राहू” देतात (कलस्सै 3:16, इ.एस. व्ही.) आणि आत्मा देवाच्या वचनाचा उपयोग “सद्बोध, दोष दाखवणे, सुधारणूक, नीतिशिक्षण ह्यांकरता” करतो (२ तीमथ्य 3:16) . त्यांच्या जीवनाचा संपूर्ण मार्ग सुवार्तेच्या नियमानुसार जगला जातोे, कारण आत्मा त्यांना आज्ञाधारकपणाकडे वळवितो. जेव्हा आपण आत्म्याने चालतो, तेव्हा आपल्याला आढळून येते की देहाची पापी भूक आपल्यावर पुन्हा सत्ता गाजवित नाही.

Englishमराठीच्या पहिल्या पानावर वापस या

आत्म्यामध्ये चालण्याचा काय अर्थ आहे?
© Copyright Got Questions Ministries