settings icon
share icon
प्रश्नः

आज आमच्या जीवनात पवित्र आत्म्याची काय भूमिका आहे?

उत्तरः


देवाने मानवांना दिलेल्या सर्व कृपादानांपैकी पवित्र आत्म्याच्या उपस्थितीपेक्षा इतर काहीही मोठे नाही. आत्म्याची बरीच कार्ये, भूमिका आणि क्रिया आहेत. प्रथम, तो सर्वत्र सर्व लोकांच्या हृदयात एक काम करतो. येशूने शिष्यांना सांगितले की “तो येऊन पापाविषयी, नीतिमत्त्वाविषयी व न्याय-निवाड्याविषयी जगाची खातरी करील ” (योहान 16:7-11). प्रत्येकात “ईश्वर चेतना” असते, ते मान्य करोत किंवा नाही. ते पापी आहेत या निष्पक्ष आणि पुरेशा युक्तिवादाने पटवून देण्यासाठी आत्मा मनुष्यांच्या बुद्धीस देवाची सत्यता लागू करतो. या दृढ विश्वासाला उत्तर दिल्यास मनुष्यांना तारण मिळते.

एकदा का आपले जारण घले आणि आपण देवाचे झालो की आत्मा आपल्या अंतःकरणात कायमची वस्ती करतो आणि आपली मुले म्हणून त्याच्या दृढ करणाऱ्या, प्रमाणित करणाऱ्या आणि आश्वासनदायक शाश्वत स्थितीच्या प्रतिज्ञेची मोहर लावतो. येशू म्हणाला की तो आमचा सहायक, सांत्वना देणारा आणि मार्गदर्शक होण्यासाठी आपला आत्मा आमच्याकडे पाठवेल. “मी पित्याला विनंती करीन, मग तो तुम्हांला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल; अशासाठी की, त्याने तुमच्याबरोबर सदासर्वदा राहावे.” (योहान 14:16). “कैवारी” म्हणून येथे अनुवादित केलेल्या ग्रीक शब्दाचा अर्थ “ज्याला बाजूला बोलावण्यात आले आहे” आणि प्रोत्साहन व उत्तेजन देणाऱ्याची कल्पना यात आहे. पवित्र आत्मा विश्वासणार्यांच्या अंतःकरणात कायमस्वरूपी निवासस्थान घेईल (रोम 8:9; 1 करिंथ 6:19-20; आणि 12:13). येशूने त्याच्या अनुपस्थितीसाठी “मोबदला” म्हणून आत्मा दिला, ती कार्ये करण्यासाठी जी जर तो आमच्याबरोबर वैयक्तिकपणे राहिला असता तर त्याने केली असती.

त्या कार्यांपैकी एक म्हणजे सत्य प्रकट करणारा. आपल्यात आत्म्याचे अस्तित्व आपल्याला देवाचे वचन समजून घेण्यासाठी आणि त्याचा अर्थ सांगण्यास सक्षम करते. येशूने आपल्या शिष्यांना सांगितले “तरी तो सत्याचा आत्मा येईल तेव्हा तो तुम्हांला मार्ग दाखवून सर्व सत्यात नेईल; कारण तो आपल्या स्वतःचे सांगणार नाही; तर जे काही ऐकेल, तेच सांगेलय आणि होणाघर््या गोष्टी तुम्हांला कळवील” (योहान 16:13). तो उपासना, शिक्षण, आणि ख्रिस्ती जीवनाशी संबंधित परमेश्वराचा सर्व संकल्प आमच्या बुद्धीस प्रकट करतो.

तो अंतिम मार्गदर्शक आहे, आमच्यापुढे जातो, मार्ग दाखवतो, अडथळे दूर करतो, समज देतो आणि सर्व गोष्टी स्पष्ट करतो. आपण सर्व आत्मिक गोष्टींमध्ये ज्या मार्गाने जावे अशा मार्गाने तो आम्हाला नेतो. अशा मार्गदर्शकाशिवाय, आम्ही चुकू शकतो. त्याने प्रकट केलेल्या सत्याचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे येशू तोच आहे जे तो म्हणाला की आहे (योहान 15:26; 1 करिंथ 12:3). आत्मा ख्रिस्ताच्या परमेश्वरत्वाविषयी आणि देहधारणाविषयी, तो मशीहा असल्याचे, त्याचे दुःख आणि मृत्यू, त्याचे पुनरुत्थान आणि स्वर्गारोहण, देवाच्या उजवीकडे त्याचे गौरव प्राप्त करणे आणि सर्वांचा न्यायाधीश म्हणून त्याची भूमिका याची आपल्याला खात्री पटवतो. तो ख्रिस्ताला सर्व गोष्टींत गौरव देतो (योहान 16:14).पवित्र आत्म्याची आणखी एक भूमिका म्हणजे तो कृपादान देणारा आहे. पहिले करिंथ 12 विश्वासणार््यांना देण्यात आलेल्या आत्मिक कृपादानांचे वर्णन करते जेणेकरून आपण ख्रिस्ताचे शरीर म्हणून या पृथ्वीवर कार्य करू शकू. ही सर्व कृपादाने मोठी आणि लहान दोन्ही आत्म्याने दिली आहेत जेणेकरून आपण जगामध्ये त्याचे राजदूत होऊ, त्याने त्याची कृपा प्रगट करू आणि त्याचे गौरव करू.

आत्मा आपल्या जीवनात फळ उत्पन्न करणारा म्हणून देखील कार्य करतो. जेव्हा तो आपल्यात राहतो, तो आपल्या जीवनात त्याचे फळ कापणीचे काम सुरू करतो - प्रेम, आनंद, शांती, संयम, दयाळूपणा, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता आणि आत्मसंयम (गलतीकर 5:22-23). ही आपल्या देहाची कामे नाहीत, जी अशी फळे देण्यास असमर्थ आहेत, परंतु ती आपल्या जीवनात आत्म्याच्या उपस्थितीची उत्पादने आहेत.

देवाच्या पवित्र आत्म्याने आपल्या जीवनात वास्तव केले आहे, तो ही सर्व चमत्कारिक कार्ये करतो, तो आपल्याबरोबर कायमचा राहतो, आणि तो कधीही सोडणार नाही किंवा त्यागणार नाही, हे ज्ञान खूप आनंदाचे आणि सांत्वनाचे कारण आहे. पवित्र आत्मा आणि आमच्या जीवनात त्याच्या कार्याबद्दल या अनमोल भेटीबद्दल देवाचे आभार!

English



मराठीच्या पहिल्या पानावर वापस या

आज आमच्या जीवनात पवित्र आत्म्याची काय भूमिका आहे?
© Copyright Got Questions Ministries