settings icon
share icon
प्रश्नः

आत्म्याच्या प्रभावाने खाली पडणे बायबलनुसार आहे का?

उत्तरः


सामान्यतः “आत्म्याच्या प्रभावाने खाली पडणे” तेव्हा होते जेव्हा एखादा सेवक एखाद्यावर हात ठेवतो, आणि ती व्यक्ती जमीनीवर कोसळतेे, असे समजा की पवित्र आत्म्याच्या सामथ्र्याच्या प्रभावाने. जे लोक आत्म्याच्या प्रभावाद्वारे पडण्याचा सराव करतात ते बायबलमधील परिच्छेद वापरतात ज्यात लोक लिहिले आहे की तो “मृतप्रायः” झाला (प्रकटीकरण 1:17) किंवा ते आपल्या तोंडावर पडले (यहेज्केल 1:28; दानीएल 8:17-18; 10:7-9) . तथापि, या बायबलमधील तोंडावर पडणे आणि आत्म्याच्या प्रभावाने पडणे यात बरेच विरोधाभास आहेत.

1. बायबलमध्ये खाली पडणे ही व्यक्तीची प्रतिक्रिया तेव्हा घडली जेव्हा त्याने दृश्यात किंवा सामान्यापलीकडी एखादी घटना पाहिली, जसे ख्रिस्ताच्या रूपांतरणावर (मत्तय 17:6). बायबलमध्ये नसलेल्या आत्म्याच्या प्रभावाखाली पडण्याचा अभ्यास करणारी व्यक्ती दुसर्याच्या स्पर्शाने किंवा व्यक्तीच्या हाताच्या हालचालीस प्रतिसाद म्हणून खाली पडते..

2. बायबलमधील उदाहरणे फारच कमी होती, आणि ते अगदी थोडक्या लोकांच्या जीवनात क्वचितच घडले होते. आत्म्याच्या प्रभावाखाली पडण्याच्या घटनेत, खाली पडणे ही वारंवार होणारी घटना आहे आणि असा अनुभव आहे जो अनेकांसोबत घडतो.

3. बायबलमधील उदाहरणांत लोक त्यांच्या तोंडावर पडतात, ते काय किंवा कोणाला पाहतात त्या भयविस्मयाने. आत्म्याच्या प्रभावाखाली पडण्याच्या या नकली दानात ते मागे पडतात, वक्त्याच्या हात हालविण्यास प्रतिसाद म्हणून किंवा मंडळीच्या पुढार्याच्या स्पर्शाचा (किंवा धक्का लागण्याचा) परिणाम म्हणून.

आमचा असा दावा नाही की आत्म्याच्या प्रभावाखाली पडण्याची सर्वच उदाहरणे खोटी नसतात किंवा स्पर्श अथवा धक्क्यामुळे पडणे नसते. अनेक लोग दावा करतात की त्यांनी ऊर्जेचा किंवा एका शक्तीचा अनुभव केला ज्यामुळे ते मागे पडले. तथापि, या कल्पनेस बायबलमध्ये कोणताही आधार नाही. होय, त्यात ऊर्जा किंवा शक्तीचा समावेश असे शकतो, परंतु असे असल्यास मोठी शक्यता आहे की देवाकडून नसावे आणि पवित्र आत्म्याच्या कार्याचा परिणाम नाही.

दुःखाची गोष्ट ही आहे की आमच्या जीवनाद्वारे ख्रिस्ताच्या गौरवाच्या हेतूसाठी आत्मा आम्हास जे व्यावहारिक फळ देतो त्याचा पाठपुरावा करण्याऐवजी लोक अशा नकली बनावट चमत्कारांकडे पाहतात ज्याद्वारे कोणतेही आत्मिक फळ उत्पन्न होत नाही (गलती 5:22-23). आत्म्याने भरलेले असल्याचा पुरावा अशा बनावटी गोष्टींद्वारे दर्शविला जात नाही, तर देवाच्या वचनाने अशा प्रकारे ओसंडून वाहणाऱ्या जीवनाद्वारे ते अशाप्रकारे प्रगट होते की ते देवाची स्तुती, आभार आणि आज्ञाधारकपणाने ओसंडून वाहू लागते.

Englishमराठीच्या पहिल्या पानावर वापस या

आत्म्याच्या प्रभावाने खाली पडणे बायबलनुसार आहे का?
© Copyright Got Questions Ministries