प्रश्नः
पवित्र आत्म्याद्वारे मी कसे भरावे?
उत्तरः
पवित्र आत्म्याने भरणे हे समजून घेण्यासाठी योहान 14:16 हे एक महत्व पूर्ण वचन आहे, येशून आम्हाला अभिवचन दिले आहे की आत्मा विश्वासनाऱ्यांमध्ये वास करेन व ते त्याचे राहण्याचे ठिकाण असे होईल. पवित्र आत्म्याचे वास्तव्य करणे व सदा सर्वकाळ साठी राहणे यामधील फरक स्पष्ट करणे महत्वाचे आहे. पवित्र आत्म्याचे कायमचे वास्तव्य काही निवडेल्या लोकांपुरते मर्यादीत नाही. परंतू सर्व विश्वासनाऱ्या व्यक्तींसाठी आहे. पवित्र शास्त्र असे काही वचने आहेत जे की, याबद्दल मान्यता देतात. पहिले , पवित्र आत्मा असे एक दान आहे की, ख्रिस्तामध्ये सर्व विश्वासनाऱ्यांना काहीही आपवादाशिवाय देण्यात आले. त्यामध्ये ख्रिस्तावर विश्वास ठेवण्याव्यतिरिक्त इतर कुठलीही अट ठेवण्यात आली नाही. (योहान 7:37-39). दुसरे , पवित्र आत्महा आम्हाला तारणाच्या वेळी प्राप्त होतो. (इफीस 1:13). गलती 3:2 या पत्रात देखील सारखेच सत्य आहे, पवित्र आत्म्याचे प्राप्ती ख्रिस्तावर विश्वास ठेवल्यानंतर झाली. तिसरे , पवित्र आत्मा विश्वासनाऱ्यांमध्ये कायमस्वरुपी राहतो, पवित्र आत्मा विश्वासनाऱ्यांना तारण म्हणून देण्यात आला आणि ख्रिस्तामध्ये भविष्यातील देवाची महिमा प्रगट करण्यासाठी दिला आहे. (II करिंथ 1:22; इफिस 4:30).
इफिस करास पत्र 5:18 वचनातील संदर्भामध्ये पवित्र आत्म्याने भरणे हे वेगळेपणा दर्शविते. पवित्र आत्म्यासाठी आम्ही पूर्णपणे समर्पित असावेत. म्हणजे तो आमच्यामध्ये वस्ती करेल व या अर्थाने तो आम्हास भरेल. रोम 8:9 आणि इफिस 1:13-14 वचनामध्ये म्हटले आहे की तो सर्व विश्वासनाऱ्यांमध्ये वास करतो, परंतू आम्ही त्याला दु:खीत सुध्दा करु शकतो (इफिस 4:30), आणि तो आमच्यामध्ये असतांनाही त्याच्या कार्याला आम्ही विझवू शकतो (I थ्रेसलोनी 5:19). जेव्हा आम्ही असे होऊ देतो तेव्हा आमच्याद्वारे किंवा आमच्यामध्ये पवित्र आत्म्याच्या कार्याचा आणि सामर्थ्याचा अनुभव करु शकत नाही, पवित्र आत्म्याने परिपूर्ण होणे. याचा अर्थ हा आहे की, त्याने आमच्या जीवनामध्ये प्रत्येक भागावर अधिकार ठेवण्यासाठी, पुढारेपण करण्यासाठी पूर्णपणे त्याच्या स्वाधीन स्वत:ला देणे. तेव्हा त्याची सामर्थ्य आमच्यामध्ये उपयोगात आणली जाते. तेव्हा आम्ही जे काही करु ते देवामध्ये पुष्कळ फलवंत होत जाते. आत्याने परिपूर्ण होणे हे बाहेरील कार्याने लागू होत नाही. तो आमच्या अध्यात्मिक विचारावर व उद्देशांवर लागू होते. स्त्रोत्र संहिता 19:14 मध्ये म्हटले आहे, “हे परमेश्वर माझ्या दुर्गा, माझ्या उध्दारका ,माझ्या तोंडचे शब्द माझ्या मनचे विचार तुला मान्य असोत.”
पाप पवित्र आत्म्याने भरण्यासाठी बाधा टाकू शकतो ,परंतू आज्ञा पालनाद्वारे पवित्र आत्म्याची परिपूर्णता बनून राहू शकते. इफिस 5:18 त्याने आम्हाला पवित्र आत्म्याने भरण्याची आज्ञान दिली आहे ,मात्र ,पवित्र आत्म्याने भरण्यासाठी प्रार्थनाच करीत राहू नये. तर कार्यालाही पूर्ण करण्यासाठी पूर्ण करावे. केवळ देवाच्या आज्ञाने आम्ही आज्ञाधारकपणा व आमच्या मधील आत्म्याला कार्य करण्यास स्वतंत्रता प्रगट करते. कारण अजूनही आम्ही पापाने ग्रस्त असे आहोत. म्हणून सर्वकाळ आत्म्याने परिपूर्ण राहणे अश्यक्य आहे. जेव्हा आमच्याकडून पाप होते. तेव्हा तुरंत आम्ही देवाकडे जाऊन कबूल करुन सोडून दयावे. आणि पुन्हा आत्म्याने- भरणे व आत्म्याद्वारे -चालण्यासाठी नविन सुरूवात करण्यासाठी स्वत:ला समर्पन करवे.
English
पवित्र आत्म्याद्वारे मी कसे भरावे?