settings icon
share icon
प्रश्नः

येशू हा ईश्वराचा पुत्र आहे याचा अर्थ काय आहे?

उत्तरः


येशू वडील आणि मुलगा या अर्थाने ईश्वराचा पुत्र नाही. ईश्वराने लग्न केले नाही आणि त्याला मुलगा झाला नाही. ईश्वराचे मरीयाशी मिलन झाले नाही आणि त्यांच्यातून मुलाची निर्मिती झाली नाही. येशू ईश्वराचा पुत्र आहे याच अर्थ मानवी स्वरूपात ईश्वराचा पुत्र (योहान 1: 1, 14) आहे. येशू ईश्वराचा पुत्र असून पवित्र आत्म्याने मरीया मध्ये त्याला जन्माला घातले आहे. लूक 1:35 घोषित करते, "आणि देवदूताने उत्तर दिले," पवित्र आत्म्याचा तुझ्यावर संचार होईल, आणि सर्वोच्च परमेश्वरचे तुझ्यावर सावली पडेल. जे पवित्र बाळ जन्मास येईल त्याला ईश्वराचा पुत्र मानले जाईल."

यहूदी पुढार्या समोर चाचणीच्या दरम्यान, मुख्य याजकाने येशूला एक प्रश्न विचारला, "जिवंत देवाच्या शपथ घेऊन सांग: तू ख्रिस्त आहे, ईश्वराचा पुत्र असशील तर आम्हाला सांग" (मत्तय 26:63). "तुम्ही म्हणता त्याप्रमाणे माझे उत्तर होय, आहे, 'येशूने उत्तर दिले. 'पण मी तुम्हा सर्व लोकांना सांगतो: ह्यापुढे भविष्यात मनुष्याच्या पुत्राला तुम्ही सामर्थ्यवान ईश्वराच्या उजवीकडे बसलेले व आकाशातील ढगातून येताना पाहाल "(मत्तय 26:64). यहूदी लोकांनी येशू वर देवाच्या नालस्तीचा आरोप केला(मत्तय 26: 65-66). नंतर, पंतय पिलातासमोर तकादा धरला "आम्हां सर्वांचे नियमशास्त्र आहे, आणि तो ईश्वराचा पुत्र असल्याचा दावा केला की, कायद्यानुसार त्याला मरावे लागेल” (योहान 19: 7). ईश्वराचा पुत्र असण्याचा दावा केल्यास मृत्यू दंड का? आणि त्यामुळे ईश्वराची कोणती निंदा झाली. यहूदी पुढारी येशूचे वाक्यांश म्हणजे नक्की काय ते समजले "ईश्वराचा पुत्र आहेस." ईश्वराचा पुत्र असणे म्हणजे ईश्वरा समान असणे. ईश्वराचा पुत्र म्हणून असल्याचा दावा करणे त्यांना ईश्वराची नालस्ती केल्या सारखी वाटत होती लेवीय 24:15 प्रमाणे जीव लोकांनी येशूच्या मृत्यूची मागणी केली. इब्री लोकांस 1: 3 या विषयी अतिशय स्पष्टपणे सांगते , "पुत्राला ईश्वरीय गौरवाचे तेज आणि त्याच्या स्वभावाचे तंतोतंत प्रतिनिधित्व आहे."

आणखी एक उदाहरण योहान 17:12 मध्ये आढळू शकते यहूदा चे "विनाशा चा मुलगा" म्हणून वर्णन करण्यात आले आहे यहूदा शिमोनाचा मुलगा होता असे आपल्याला सांगते. "विनाश मुलगा" म्हणून यहूदाचे वर्णन करून जॉन 17:12 आपल्याला काय सांगते आणि त्याचा अर्थ काय? शब्द विनाश अर्थ "नाश, विनाश,आणि वाया जाणे आहे." यहूदा शब्दशः मुलगा नाही तर " नाश, विनाश आणि वाया गेलेला," आहे शिवाय तीच यहूदाच्या 'जीवनाची ओळख होती. यहूदा विनाशाचे एक प्रकटीकरण होता. याच प्रकारे, येशू हा ईश्वराचा पुत्र आहे. ईश्वराचा पुत्र देव आहे. येशू हा ईश्वराचा सार आहे हे स्पष्ट केले आहे (योहान 1: 1, 14).

English



मराठीच्या पहिल्या पानावर वापस या

येशू हा ईश्वराचा पुत्र आहे याचा अर्थ काय आहे?
© Copyright Got Questions Ministries